Skip to main content

असा अविचार करू नको

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 08/02/2012 11:40 या दिवशी प्रकाशित केले.
[फरहाद शहजाद यांची मेहदी हसन यांनी गायलेली 'तनहा तनहा मत सोचा कर' ही गझल ऐकताना सुचलेले मुक्तक] निर्जन एकांती असे रे, भलते विचार करू नको जीवावर बेतेल मित्रा, असा अविचार करू नको खूप झाले क्षणभरासाठी, लाभली मुग्ध प्रीती तुला रे खोटी खरी याची आता, शहानिशा तू करू नको डसणे जिचा 'धर्म' आहे, डंख ती मारून गेली साहणे हे तुझे प्राक्तन, भोगताना विव्हळू नको एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको जळो वांझ पश्चातबुद्धी, ऐक माझे जरा 'मुक्या' तू डाव नव्याने मांड आता, उगाच ते तू टाळू नको
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 5970
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

हरलास जरी बाजी जराशी ,सर्वस्व पणाला लावूनी कैफात धुन्द रहा जुगार्या, रूक्ष हिशेबी गुंतू नको भन्नाट ........................ लय भारी !! ______/\______ घ्या आमचा.

हा अनुवाद नजरचुकीने 'काव्य' ऐवजी 'साहित्य' सदराखाली पोस्ट झालेला आहे. :-(

"एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली" क्या बात है....क्या बात है....!!!!! मस्तच......

आवडली!

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको
जबरदस्त ..

फारच छान!.... मनाला भावली.... :)

भावानुवाद म्हणून फार सुंदर.

वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)

वर बहुगुणी यांनी मुळ गझल दिलीच आहे,ती ऐकुन नंतर सावकाश प्रतिक्रीया देणारे.अत्ता घाईत असल्यामुळे फक्त छान जमलिये एवढेच म्हणतो. :-)

एकाकी पाडते तुला ना, भरमध्यान्ही सावली वर्म आकळले तुला रे, उगाच आता झुरू नको ...... वाह क्या बात है !

छान! अनंत फंदींचा 'बिकट वाट वहिवाट नसावी' हा फटका आठवला!