Skip to main content

वासोटा किल्ला

लेखक चाकरमानि यांनी गुरुवार, 09/02/2012 09:39 या दिवशी प्रकाशित केले.
महाबळेश्वर च्या खालच्या बाजुस तापोळा लेक आहे या लेक च्या पलिकडे आहे वासोटा किल्ला

वाचने 16466
प्रतिक्रिया 61

प्रतिक्रिया

In reply to by अन्या दातार

+१. सहमत आहे. फोटो फारच आवडले. पिकासावर टाकले आहेत का फ्लिकरवर? फ्लिकरवर असतील तर गणेशाला दिसायचे नाहीत मात्र.

In reply to by अन्या दातार

श्री. अन्या दातार, तुम्ही, फक्त फोटो क्र, ५,९,१०,१६ व २६ हे फोटो आवडले असं बोलुन बाकीच्या फोटोंवर अन्याय करता आहात ? मी आताच श्री. गणेशा यांचे बरोबर फोटो क्र. ३,४,१३, आणि ४२ मधल्या विशिष्ट प्रकाशरचना आणि अँगल बद्दल एक तास चर्चा केली. विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये वासोटा किल्यावरुन जो प्रतापगडाचा व्ह्यु दिसतो तो पाहुन धडकी भरते उरात. त्यानंतर फोटो क्र. ४२ किल्याच्या बालेकिल्याच्या पुर्व दक्षिणेस असलेल्या बुरुजाच्या खोदीव टाक्यांच्या पाण्यामधल्या दोन सोनेरी मासोळ्यांच्या विशिष्ट अवस्थेतला फोटो असल्याने निसर्ग नियम कोणत्याच जीवास चुकले नाहीत या वास्तवाची कल्पना स्पष्ट होते. असो, आपल्या प्रतिसादावरुन आपली सौंदर्य विषयक विचार पद्धती काहीशी वेगळी असल्याचे लक्षात येते.

In reply to by ५० फक्त

विशेषतः फोटो क्र. १३ मध्ये वासोटा किल्यावरुन जो प्रतापगडाचा व्ह्यु दिसतो तो पाहुन धडकी भरते उरात.> अहो ५० राव, त्याच फोटोच्या उजव्या कोपर्‍यात बघाना! मला लाल किल्लापण दिसत आहे, दिसतोय का तुम्हाला?

In reply to by ५० फक्त

त्यानंतर फोटो क्र. ४२ किल्याच्या बालेकिल्याच्या पुर्व दक्षिणेस असलेल्या बुरुजाच्या खोदीव टाक्यांच्या पाण्यामधल्या दोन सोनेरी मासोळ्यांच्या विशिष्ट अवस्थेतला फोटो असल्याने निसर्ग नियम कोणत्याच जीवास चुकले नाहीत या वास्तवाची कल्पना स्पष्ट होते.
हहपुवा! अजुन येउद्यात हो वासोटा वाले!! पुलेशु! फोटो क्र. १५ मध्ये नक्की कशाचा फोटो काढायचा होता? ती सुबक ठेंगणी कोण? गाईड होती का?

In reply to by ५० फक्त

....अहो त्यापेक्षा १४ क्र. चा फोटू बघा ना राव...कसला क्लोज व्ह्यू आहे महाबळेश्वर पठाराचा आणि त्या पठाराच्या ते ते बघा तिकडं त्या पोईन्टकड ते कपल काय करतंय...१४ नंबर च्या फोटो मध्ये १४ फेब्रुवारी चा डेमो देत असावेत ! या फोटोतले बारकावे वाखाणण्याजोगे आहेत...या फोटू साठी वेगळा धागा असायलाच हवा !

धाग्यासाठी घेतलेले परीश्रम बघून डोळे पाणावले... :)

महाबळेश्वर च्या खालच्या बाजुस तापोळा लेक आहे या लेक च्या पलिकडे आहे वासोटा किल्ला
माहितीबद्दल आभारी आहे. छायाचित्रे आणि वर्णन, दोन्हीही सुरेखच :)

In reply to by किसन शिंदे

हे म्हणजे, बार मध्ये डॉक्टरला बियर पिताना पाहुन विचारल्यासारखं झालं ? , काय आहे किसन देवा, हा प्रतिसाद प्रत्यक्ष गविंनी नसेल दिला, त्यांनी टंकनिकेला सांगितलं असेल, ' हे बघ बै, हे चार धागे आणि हे चार प्रतिसाद, देउन टाक, आता झाली तिची थोडी चुक, करतील गवि इंसेंटिव्ह कट पगार दिवसाचा, हो किनई ओ गवि ?

खालील प्रश्नांची उत्तरे द्या. बाकी महाबळेश्वर काय / कोण आहे? त्याची खालची बाजू म्हणजे नक्की कुठली बाजू? बाजू म्हणजे हात सुद्धा असतो. खालचा हात म्हणजे नक्की कुठला अवयव? तापोळा म्हणजे काय/ कोण? लेक म्हणजे मुलगी. कुणाची मुलगी? तापोळा लेक म्हणजे तापोळा मुलगी का? लेकच्या पलिकडे आहे वासोटा किल्ला ! वासोटा म्हणजे उलटा कासोटा का? किल्ला म्हणजे मोठी किल्ली का?

हा तुमचा पहीला लेख आहे . फोटो टाकण्यासाठी फ्लिकर/पिकासाचा वापर करावा. ते नेमके कसे करावे याबाबत बरीच चर्चा आपल्या संस्थळावर झाली आहे त्याचा वापर करावा. सोबत थोडेसे वर्णन वगैरे लिहून चांगला लेख तयार होईल. अवांतर : श्रीमंत प्रतिनिधींचा किल्ला अजिंक्य वासोटा तेलीण मारी सोटा बापू गोखल्या सांभाळ कासोटा तो हाच किल्ला आहे का ?

In reply to by रामदास

श्रीमंत प्रतिनिधींचा किल्ला अजिंक्य वासोटा तेलीण मारी सोटा बापू गोखल्या सांभाळ कासोटा
वरील काव्यात्मक ओळी फारच सुरेख आहेत. आवडल्या.. :) आम्ही आमच्या आगामी कवितेत तेलीण, सोटा आणि कासोटा या शब्दांचा अवश्य वापर करू.. :)

In reply to by प्यारे१

मुळात कविताच का करु????
वरेल प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ शकत नाही कारण ते आम्हाला माहीत नाही..! :) बाय द वे, आम्ही आपल्या प्रश्न विचारण्याच्या हक्काचा आदर करतो, आपणही आमच्या कविता करण्याच्या हक्काचा आदर करावा असे वाटते. सदर कविता आपल्याला आवडेल, न आवडेल, कळेल, न कळेल याबाबतचे आपले मतप्रदर्शन अर्थातच स्वागतार्ह आहे. लोकशाहीचा विजय असो.. नावडलेले कावळे आवडलेले शहाळे रातराणीच्या अंधारात हुडहुडणारे हिंदोळे..! या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. :)

व्वा...! काय सोटा काढलाय हो...! वि-हंगम दृष्य आहे हो या किल्ल्याचं...फक्त फोटोंची किल्ली हरवलेली दिसतीये ;-)

हा सर्वोत्तम आहे असे म्हणावे लागेल.... थोड्या शुद्धलेखनाच्या चूका सोडल्या तर भट्टी मस्त जमली आहे... आणखी येऊ देत... पु.ले.शु.... ता.क. - आशा आहे पुढिल लिखाण दृष्य लिपीचा वापर करून कराल....

In reply to by अमृत

मी तर अजुनही तेथपर्यंत पोचु नै शकलो... पुस्तकात कमीत कमी पान दुमडुन ठेवता येते, पुस्तक मोठे अन वाचण्याजोगे असेल तर... पण इथं काय करायचं? मी १० फटु बघतो, थोडंसं निवांत होतो, एखादा ग्लास पाणी पितो अन मग पुन्हा धागा वाचाया लागतो... अख्खा दिवस जाणार वाटतं हा धागा वाचण्यात... असो, छान माहिती... हळुहळु संपुर्ण धागा वाचुन काढेन... बाकी, अन्याशी किंचित सहमत....

In reply to by इरसाल

ते कासव नै का हळुहळु चालत जातं अन शर्यत जिंकतं... तसंच मी संपुर्ण धागा वाचुन काढेन... अन संपादक मंडळ मला या पराक्रमाबद्दल बक्षिस पण देइल...

In reply to by इरसाल

तुला बक्षीस म्हणून काही माणणिय मिफाकरणींनी अशुद्ध लिहीलेलं शुद्ध करण्याचा अधिकार देणार आहेत असे ऐकून आहे ;) आमच्याही शुभेच्चा!!

In reply to by मी-सौरभ

तुला बक्षीस म्हणून काही माणणिय मिफाकरणींनी अशुद्ध लिहीलेलं शुद्ध करण्याचा अधिकार देणार आहेत > हे म्हणजे "भीक (आपलं.... बक्षिस!) नको पण कुत्र आवर" म्हणी सारखी गत झाली.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

महाराष्ट्राचे हे उत्तुंग वैभव बघून ड्वाले पानावले
मंग चस्मा पुसून घ्या. अजून बरचं काही पहायच्य तुमाला. :)

In reply to by मी-सौरभ

अहो! डोळे मिटले हो! अगदी कायमचे! आता काय दिसेल ते तुम्हीच बघून घ्या! आमच्याच्याने आता हे सहन नाही होणार! ;)

असे जिवघेणे फोट्टु कप्युटरवर बघण्यापरिस.... Smiley

चाकरमानी ! सदस्यं कालावधी 3 वर्षे 26 आठवडे अवघड आहे राव !!!!

In reply to by मराठे

असा एक धागा यावा मधून मधून म्हणजे दुपारचा वेळ कसा छाsssssन जातो.
म्हणजे धाग्यातील फटु पाहुन हपिसातला सगळा शीण(थकवा) कसा बाजुला सारल्या जातो... असंच म्हणायचंय ना मराठे तुम्हाला...

फोटो दिसत नसल्यामुळे जळफळाट होतोय !

हे सगळेच्या सगळे फोटो खरे तर मीच काढले होते, पण तिथेच कुठेतरी एका शेतात घुसून ;) स्त्रॉबेरी वेचताना, माझा कॅमेरा हरवला. :( अत्ता कळतंय कुठे गेला ते. पकडा पकडा पकडा... माझे फोटू चोरलेत....... :P

वासोटा किल्ला निवांतपणी पाहीन म्हटलं म्हणून धागा उघडला नव्हता. डोळ्याचे पारणे फिटले. :) -दिलीप बिरुटे

फार पूर्वी मी वासोट्यावर गेलो होतो.सुरेख किल्ला आहे. बघता क्षणी प्रेमात पड़तो.

234, 245, 728 नम्रतल्या फटुत काय हाय त्ये. फोटू नम्र 454, 988,1540 अन 54326 टाकल्या बद्दल तीव्र निषेढ. वो सम्पादक्स म्णढळ, जरा लक्ष्य द्या कि वो.

234 आणि 728 मध्ये मला वाटत त्या जळवा आहेत ह्या जळवा वासोटा जंगल पार करतांना कधि अंगाला चिकटतात कळतच नाहि.

In reply to by होबासराव

जळवा? पिळव्या रंगाच्या? बाब्बो.

In reply to by बाबा योगिराज

योगिराज त्या पिवळ्या रक्त पिण्यापुर्वि असतात हो...मला तरि फोटोत त्या काळपट दिसताहेत. तुम्हि मॉनिटर एकदा रिस्टार्ट करा बघु.