Skip to main content

एक कविता..

लेखक कॉमन मॅन यांनी बुधवार, 08/02/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
रसरशित टिकटिकी चमचमीत पावली खलपलीत खल्पली मिटमिटीत कावली.. अस्खलीत बाहुली टुकटुकीत साउली नात्यागोत्यांची नाउली आडमुठ्यांची माउली खरखरीत भिंगरी झणझणीत टिंगरी अभ्यागतांच्या मंदिरी कडकडीत किरकिरी तळतळीत मिरमिरी जळजळीत किंकिणी नभनळीत बाजरी लवलवीत पालवी..! -- कॉमॅ. रचना - २७ जानेवारी, २००८.
लेखनविषय:

वाचने 4196
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

......

अळी मिळी, गुप चिळी, तोंडावर बोट, गालावर खळी, बळी तो बळी, कान पण पिळी, बंदुकीची नळी, अडकली जाळी, पुरणाची पोळी, दे आता टाळी... टिकली कपाळी, तंग तंग चोळी, पोरगी भोळी, घेउन गेला कोळी, इतकी दिली हाळी, आला नै वाळी, बंदुकीची नळी, अडकली जाळी, पुरणाची पोळी, दे आता टाळी... ह्या कवितेला, गणपतीराया, तुझ्या पडतो मी पाया ह्या चालीवर वाचावे...

बडबड गीतातले शब्द जरा कळण्यासारखे-लक्षात राहतील असे तरी असतात. हे काय म्हणावे ब्वा?

In reply to by अन्या दातार

अन्या हे बडबडगीत नसून; जास्त झाल्यानंतरची बड्बड असावी अशी मला शंका आहे ;)

In reply to by मी-सौरभ

जास्त झाल्यानंतरची बड्बड असावी अशी मला शंका आहे
सौरभजी, आपली शंका रास्त वाटते, परंतु सुदैवाने तसे नाही! :) अनियमित उमासे अशिक्षित उसासे खाल्याघरचे सामोसे सोकावलेले..! या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. :)

In reply to by कॉमन मॅन

अनियमित उमासे :puzzled: अशिक्षित(?) उसासे...(म्हणजे काय होsssss..?) खाल्याघरचे सामोसे...( राम राम राम राम...!) सोकावलेले..!.... जरा या चार ओळींचा अर्थही समजाऊन सांगा हो...कॉमन मॅन

In reply to by कॉमन मॅन

मा. कॉ.मॅ. जी
परंतु सुदैवाने तसे नाही!
यात सुदैव ते काय??? तसे असते तर आम्ही या कवितेला समजून तरी घेतले असते आता तर वेगळिच शंका येत आहे... (रास्त शंकेखोर) सौरभ जाऊ द्या: ह्या कविते (किंवा जे काय आहे ते) विषयी 'गणेशाचे' विचार ऐकण्यास उत्सुक आहे...

In reply to by कॉमन मॅन

अनियमित उमासे पण तुमचे तर नियमित येत असतात कि.... :) अशिक्षित उसासे अर्धशिक्षित अस म्हणायच आहे का तुम्हाला.. ;) खाल्याघरचे सामोसे सोकावलेले..! हे मिसळ्पाव केंद्र आहे , उगाच जिलब्या ,सामोसे,ढोकळे असल काही विकु नका इथे.

अनियमित उमासे अशिक्षित उसासे खाल्याघरचे सामोसे सोकावलेले..! या आमच्या आगामी कवितेतील काही ओ़ळी आहेत. मिपावर लवकरच प्रकाशित करू.. Smile आँ. म्हणजे ही झलक होती???????? :O :-O :shock: पळावे आता इथुन Facebook smileys