✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लग्नाआधी आणि लग्नानंतर!

द
दादा कोंडके यांनी
Fri, 02/03/2012 - 15:48  ·  लेख
लेख
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं. अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला. हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत. पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्‍या मूली पण बघितल्या आहेत. या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न, १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41489 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

अगदी अगदी!

रेवती
Fri, 02/03/2012 - 23:55 नवीन
अगदी अगदी!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२

प्रतिसाद पूर्णपणे पटला

रेवती
Fri, 02/03/2012 - 23:40 नवीन
@ गवि, प्रतिसाद पूर्णपणे पटला नाही. घरकामाची किंमत घरच्यांनी केली तर होते. आम्ही निदान या पिढीत तरी बदलणार नाही (किंवा किंचित बदलू) हे एकदा ठरवून घेतले की मग पुढे बोलायलाच नको. तुम्ही असे वागताय असं माझं म्हणणं नाही, हेतूही सर्वसामान्यपणे काय होते ते सांगण्याचा असेल पण जग वेगात बदलत असताना त्याचे फायदे घेत रहायचं आणि मानसिकता मात्र बदलायला जरा वेळ हवा हे म्हणताना दुटप्पीपणा (अश्या नवर्‍यांचा, तुम्हाला काही म्हणत नाहिये) जाणवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

इथे कमावणारा "तो" असेल आणि ती

अप्पा जोगळेकर
Sat, 02/04/2012 - 09:51 नवीन
इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते. अगदी अगदी. शिवाय 'तो' नेहमी कमावणारा असलाच पाहिजे असे गॄहीतक समाजात आहेच. या संदर्भात 'ऐसी अक्षरे' या संस्थळावर तुम्ही उदाहरण दिले होते त्याची आठवण झाली. शिक्षण झाल्यावर काहीच न करता उनाडक्या करणार्‍या मुलाला उडाणटप्पू म्हणतात. काहीच न करणार्‍या मुलीला 'लग्नाची' आहे असे म्हटले जाते. शिवाय अलीकडच्या काळात मुलाचे स्वतःचे मालकीचे घर असावे अशी मागणी करुन निराळ्याच पद्धतीने वधूपक्षाकडून हुंडा मागण्याची प्रथा चालू झाली आहे ती वेगळीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

तेच तर मे म्हणतेय...

पिलीयन रायडर
Fri, 02/03/2012 - 17:06 नवीन
'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते'
जिथे गरज आहे तिथे पैसा जावा...
आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.
खरं तर जर तिला शक्य असेल (स्वतःचा संसार सांभाळुन...(कदाचित तिच्या नवर्याचा तेवढा पगार नसेल तर...)) तर तिने माहेरी मदत करायला हवी... पण असं होण्याची शक्यता आपल्या समाजात फार फार कमी आहे... पण नाहीच आहे असही नाही.. माझ्या माहितीतील एका आजीना त्यांच्या एकुलत्या एक मुलीने त्यांच्या इच्छेखातर भावा-बहीणी जवळ घर घेउन दिले आहे.. ती त्यांना घर खर्च पण देते..आणि आजीनी पण एक मुलगी सोबत रहायला ठेवुन (पेईंग गेस्ट) थोडासा खर्च उचलला आहे... आणि मी एक असाही मुलगा पाहीला आहे ज्याला स्वतःला आई-वडील्-बहीण्-भाऊ कोणीही नसताना एका चांगल्या मुलीचे स्थळ "तिला वडिल नाहीत फक्त आई आहे..म्हण्जे आइचा खर्च मलाच करावा लागेल" ह्या कारणा साठी नाकारले... शेवटी हे सगळं ज्याची त्याची मतं, संस्कार आणि परिस्थिती ह्यावर अवलंबुन आहे..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

+१११११११११११११११ अगदी

निवेदिता-ताई
Fri, 02/03/2012 - 22:33 नवीन
+१११११११११११११११ अगदी बरोब्बर...सहमत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

माझेहि २ प्रश्न..

Pearl
Fri, 02/03/2012 - 16:41 नवीन
या प्रश्नांवरचे माझे विचार टंकेनच. पण तूर्तास अजून माझ्याही २ प्रश्नाबद्दल पण मत जाणून घ्यायला आवडेल की, १)लग्नानंतर मित्र(नवरा मुलगा) त्याचे आई-वडिल (आय मीन त्यांची कार, इतर सुखसोयी वगैरे) किंवा आई-वडिलांच्या घरावर जो खर्च करेल त्याआधी प्रत्येक वेळी बायकोला विचारेल आणि तिला योग्य जस्टीफिकेशन वाटले तरच तो खर्च करेल का? २) वरील प्रश्नाचे उत्तर जर 'नाही. तो न विचारता खर्च करेल असे असेल तर' तसेच त्याच्या बायकोने केले तर चालेल का?
  • Log in or register to post comments

लग्नानंतर कुठलीही गोष्ट

मनीषा
Fri, 02/03/2012 - 17:02 नवीन
लग्नानंतर कुठलीही गोष्ट एकमेकांना विचारूनच किंवा सांगुनच केली पाहिजे असा लिखित कायदा अथवा नियम नसला तरी तसेच वागणे अपेक्षित आहे... दोघांकडून. नाहीतर लग्न, संसार, घर या स्गळ्यांना काहीच अर्थ रहात नाही. आणि प्रत्येकवेळी तुझं - माझं करणं अजिबात योग्य नाही, त्यामुळे सुसंवाद रहात नाही. वर एका प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे जिथे जशी गरज असेल त्या प्रमाणे वागावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

उत्तरे

दादा कोंडके
Fri, 02/03/2012 - 17:41 नवीन
लग्नानंतर परिस्थिती वेगळी असेल. पण अगदी कशातच काही नसताना असल्या रि़जीड अटी घातल्यावर नाती कशी जुळतील? वरती मनीषाने म्हणल्या सारखं लग्नानंतर लिखीत कायदे वगैरे करता येतच नाहीत. काही प्रश्न विचार विनिमय, चर्चा, सामजस्य वगैरेंनीच सोडवायला हवेत. पण त्यासाठी आधी नाती जुळायला हवीत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

आपल्या गरजा व इतरांकडून काही

स्वातीविशु
Fri, 02/03/2012 - 16:48 नवीन
आपल्या गरजा व इतरांकडून काही मिळण्याच्या अपेक्षा कमी ठेवल्यास असे अनेक प्रश्न सुट्तील असे वाटते.....
  • Log in or register to post comments

मुलीने तिच्या पगाराचे काय

विजुभाऊ
Fri, 02/03/2012 - 17:18 नवीन
मुलीने तिच्या पगाराचे काय करावे हे सर्वस्वी ठरवण्याचा हक्क तिचाच आहे. तिने वडिलांची जबाबदारी घेतली यात चूक काहीच नाही. तिने तिचा सर्वच्या सर्व पगार वडिलांना दिलातरी ते योग्यच आहे. सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे
  • Log in or register to post comments

मायो... मायो...

वपाडाव
Fri, 02/03/2012 - 18:29 नवीन
सासर कडच्यानी सून म्हणजे हक्काची पगार कमवून आणणारी स्वैपाकीण असे समजणे हा अप्पलपोटेप्णा आहे..
पाशवी शक्त्तंची त्रिवार माफी मागुन.... विजुभौ... ह्या वाक्यावर लैच घाण हसलो मी...काफीचा कप चक्क फुटता फुटता वाचला... अन काफीचे डाग माझ्या पांढर्‍या शर्टावर पडलेत... एवढं होउनही मला ही प्रतिक्रिया टंकावी वाटली यातच सर्व आले... पुन्हा एकदा माफी मागतो... अन चर्चेचा आणंड लुटतो...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सहमत

तिमा
Sat, 02/04/2012 - 19:36 नवीन
विजुभाऊंशी सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

प्रत्येकाचे विचार.. वागणे...

गणेशा
Fri, 02/03/2012 - 17:30 नवीन
प्रत्येकाचे विचार.. वागणे... कर्तव्य विभागणी, वेगवेगळी असतात .. म्हणुन लग्न करताना आपल्या विचारांसारखेच मिळालेल्या व्यक्तीशी शक्यतो लग्न करावे ... मग ते पैसे देण्याबद्दल असुद्या.. सामाजिकतेच्या भावनेने असु द्या नाहि तर आणखिन काही.. बाकी अजुन तरी आमच्या येथे, मुलीकडुन पैसे घेत नाहीत.. आणि घेतले तरी ते तसेच किंवा त्या पेक्षा जास्त परत दिले जातात .. आता ही परंपरा चुकीची आहे की बरोबर ह्यात वाद घालण्याचे कारण नाहीच.. सुनेकडुन ही गरज नसताना पैसे घेतले जात नाहित जर मुलगा गरज भागवण्यास समर्थ असेन तर.. पण त्यांच्या संसारास गरज असेन तर त्यासाठी ते दोघे भागिदारी करतात. वयक्तीक विचारायचे झाले तर, दोघांचे पैसे दोघांनी योग्य पद्धतीने वापरावे.. मुलीला घरी द्यावे लागत असतील पैसे तर देवु द्यावे .. त्यात विशेष काही नाही. पण गरज नसताना उगाच कर्तव्याच्या नावाखाली जर कोणी देत असेल तर ते योग्य नाही.. जेथे गरज तेथे कर्तव्य
  • Log in or register to post comments

गरज...

साबु
Fri, 02/03/2012 - 17:46 नवीन
+१ - माझ्या मते सासर्-माहेर ह्या पेक्षा गरज जिथे आहे तिथे व गरज जेवढी आहे तेवढा पैसा द्यावा...
  • Log in or register to post comments

छान चर्चा

पैसा
Fri, 02/03/2012 - 17:53 नवीन
मूळ लेखातल्या एक दोन मुद्द्यांकडे माझं जरा जास्त लक्ष गेलं, एक तर घराचं कर्ज कमीत कमी १५ वर्षं तर वाहनाचं ७ वर्षं असतं. त्यामुळे १/२ वर्षं थांबावं की कर्ज फिटेपर्यंत थांबावं हे क्लिअर असलं पाहिजे. नंतर कुरबुरी होता नये. दुसरं म्हणजे लेखातल्या उदाहरणात लग्न ठरण्यापूर्वी मोडलं हे चांगलं झालं कारण दोघांच्या विचारात खूप तफावत दिसते आहे. अशा परिस्थितीत हे लग्न यशस्वी झालं नसतं. जेव्हा ज्याना गरज असेल, तेव्हा आपल्या माणसानी उपयोगी पडावं नाहीतर त्या नात्याला काय अर्थ आहे? मग ते नातेवाईक नवर्‍याचे असोत, किंवा बायकोचे. अनेकदा आईवडील मुलाला किंवा मुलीला घर विकत घेण्यासाठी आर्थिक मदत करतातच. ते जर आपल्याला चूक वाटत नसेल तर मुलीने आईवडिलांना मदत करण्यातही चूक वाटू नये. शेवटी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि सामंजस्याने निर्णय व्हायला हवा. कोणीच कोणाला गृहीत धरू नये. मानवी नात्यांमधे अनेकदा पैसे हे फक्त निमित्त असतं आणि दुसरे परक्या माणसाला लक्षात न येण्यासारखे बारीक कंगोरे असतात. वर्चस्व कोणाचं याच्याशी गाडी येऊन थांबते. प्रत्येकाने त्या परिस्थितीत आपण किंवा आपले आईवडील असतील तर आपल्याला कसं वाटेल याचा विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा.
  • Log in or register to post comments

दादा कोंडकेजी तुमचा मित्र

अप्रतिम
Fri, 02/03/2012 - 18:35 नवीन
दादा कोंडकेजी तुमचा मित्र म्हणजे पुरुषी मनोवृत्तीचा उत्तम उदाहरण आहे...त्याच्या भावी पत्नीने २ वर्षासाठी माहेरी पैसे देण्यामध्ये त्याला काही आक्षेप घेण्याचे कारण नव्हते...मुलगी लग्न करून घर सोडून आली म्हणजे तिला आई-वडील नाहीत असे नाही...तिने जर २ वर्षे सोडा पण आयुष्यभर जरी स्वत:च्या पैश्याने पालकांना पोसण्याचे ठरवले तरी कुणाला काय प्रॉब्लेम असावा? तेवढ्यावरून लग्न मोडणे म्हणजे कहर आहे...पत्निने कमावलेल्या पैशांचा विनियोग कसा करावा हे तिलाच ठरवू द्यावे...
  • Log in or register to post comments

खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन

५० फक्त
Fri, 02/03/2012 - 18:43 नवीन
खरंतर हा खर्च घरासाठी कमी अन त्यातल्या माणसांसाठी जास्त असतो, अपवाद, माहेरच्या घराच्या कर्जाचे हफ्ते भरत असाल तर, पण मग त्या घरात राहतं कोण हा प्रश्न येतोच ? प्रत्येकानं ' आपलं' घर कुठलं ते ठरवावं अन त्या घरासाठी खर्च करावा आणि मग संकट समयी त्याच घराकडं धावत जावं, किंबहुना जे घर आणि त्यातली माणसं आपल्याला आपल्या चुकांसहित आत घेईल, आपण आपल्या चुकांनी ओढवुन घेतलेल्या संकटात सुद्धा आपल्या मागं ठाम उभी राहतील त्याच घरासाठी अन त्याच माणसांसाठी खर्च करावा. नव-याला त्याचं घर असतंच आणि एकच असतं, त्याला त्याच्यासाठी खर्च करणं भागच आहे किंवा त्याचं ते कर्तव्यच आहे. पण बायकोला मात्र पर्याय आहे, एक माहेरचं घर अन एक सासरचं घर, यातल्या एका घरामधला हक्क /हिस्सा सोडुन ती लग्नानंतर दुस-या घरी येते, जे तिचं असतं किंवा तिचं आहे असं तिला वाटतं, कारण या घरात तिला सत्ता मिळण्याचा चान्स जास्त असतो, माहेरी भाउ असल्यास तिथं सत्ता मिळण्याची शक्यता कमीच. आता या वेळी तिच्या माहेरच्या घरावर तिच्यासाठी खर्च करण्याची / तिला संरक्षण देण्याची किंवा तिची काळजी घेण्याची जी संपुर्ण आर्थिक/ सामाजिक/ वैद्यकीय जबाबदारी लग्नापुर्वी असते ती नसते किंवा कमी झालेली असते. आता ही किती कमी होते , केली जाते किंवा झटकली जाते हे प्रत्येक केसमध्ये वेगळं असतं. म्हणजे या जबाबदारीची किंमत ती मुलगी आपल्या पगारातुन / किंवा घरकाम करुन (नोकरी करत नसेल तर) माहेरच्या घराला देत असते, मग लग्नानंतर ह्या जबाबदा-या जे घर घेतं त्या घरासाठी खर्च केला पाहिजे किंवा त्या घरासाठी घरकाम केलं पाहिजे, मग ते माहेरचं असो वा सासरचं. हा शुद्ध व्यवहाराचा ' एक हात दो एक हात लो ' असा भाग आहे. एकुणच लग्न हा दोघांनाही एकत्र जगण्यासाठी किंवा राहण्यासाठी कराव्या लागणा-या रुक्ष व्यवहाराचा भाग आधी आणि कोमल भावनांचा खेळ नंतर आहे हे क्रुर वास्तव समजुन घेतलं तर हे असे भावनांमधुन निर्माण होउन सरळ सोप्या व्यवहाराला गुंतागुंतीचे बनवणारे प्रश्न उभेच राहात नाहीत.
  • Log in or register to post comments

कड कड कड !!

वपाडाव
Fri, 02/03/2012 - 18:48 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बरर...

Pearl
Fri, 02/03/2012 - 19:54 नवीन
>> प्रत्येकानं ' आपलं' घर कुठलं ते ठरवावं अन त्या घरासाठी खर्च करावा आणि मग संकट समयी त्याच घराकडं धावत जावं, >> बरर... हा नवीन फंडा आहे माझ्यासाठी.. म्हणजे लग्न झाल्यावर ज्या आई-वडिलांनी लहानपणापासून सांभाळल, वाढवलं, शिकवलं, जपलं त्यांना, ज्या घरात आपण वाढलो ते फक्त लग्न झालं म्हणून परकं मानायचं. केवळ आपल्याला त्यांची (आर्थिक/वैद्यकीय) गरज/उपयोग नाही म्हणून. आणि त्यांना आपली गरज वाटतं असेल त्याचं काय. आणि हो आणि आपल्याला त्यांची (आणि आपली त्यांना) इमोशनल गरज नेहमीच जाणवणार त्याचं काय भाउ. आणि जगात सर्व दाम्पत्यांना १ तरी मुलगा असतोच, हा थंब रूल मानून चालला आहात भाउ आपण. जगात अशीही कुटूंब असंख्य आहेत ज्यांना फक्त १ मुलगी किंवा फक्त मुलीच आहेत. १) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही. नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. २) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. ३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. म्हणजे जे घर आपले मानून त्याला तन मन धन दिले त्यावर शेवटी सूनेचा काहीच हक्क नाही, असे कसे बुवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

कॉलिंग युयुत्सु...

वपाडाव
Fri, 02/03/2012 - 20:16 नवीन
तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही.
नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे... कमीत कमी सासरी ही आशा तरी आहे की काहीतरी पतिच्या नावावर होइल, त्याअर्थी पत्निच्या (सुनेच्या)... पण लग्न झाल्या झाल्याच माहेरच्या सर्व बंधनातुन मुक्त झाल्या कारणाने तिकडच्या प्रॉपर्टीवर (सेवा करा न करा) हक्कदेखील दाखवता येत नाही... अनलेस ती प्रॉपर्टी तिच्या स्वत:च्या मालकीची आहे... (लग्नाआधी जर तिने घेतली असेल तर, कारण सहसा बाप आपली प्रॉपर्टी पोरीच्या नव्हे तर बायकोच्या नावे करतो.) फारच गंभीर विषय आहे... कॉलिंग युयुत्सु... -वपुत्सु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही

किचेन
Fri, 02/03/2012 - 22:45 नवीन
नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे तसं नाहीये. सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाही.नातू किवा नात असेल तर त्यांना ती मालमत्ता मिळू शकते.पण सुनेला नाही. पण माहेरी सेवा करा न करा, आई वडिलांच्या मालमत्तेत मुलीचा ५०% अधिकार असतोच.जर आई वडिलांनी आपल्या हयातीत ती मालमत्ता मुलाच्या नावावर केली असेल तर मात्र मुलीला हक्क दाखवता येत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

नवर्‍याचा हक्क असेल तर तिचाही चान्स आहे..

उदय
Sun, 02/05/2012 - 22:33 नवीन
सासू सासर्यांनी मालमत्ता मुलाच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतिल तर नवरा गेल्यावर सुनेला अधिकार सांगता येत नाही
सासू सासर्यांनी मालमत्ता मुलीच्या नावावर केली नसेल,आणि सासु सासरे हयात असतील तर बायको गेल्यावर जावयाला अधिकार सांगता येत नाही, हे पण खरे आहे ना? स्वकष्टाने कमावलेली मालमत्ता मी मृत्यूपत्र करून कोणालाही देऊ शकतो. फक्त माझ्या मुलाला किंवा फक्त मुलीला किंवा दोघांना किंवा एखाद्या अनाथाश्रमाला. मृत्यूपत्र नसेल तर मुलगा आणी मुलगी आपला वारसाहक्क सांगू शकतील. वडिलोपार्जित मालमत्ता असेल तर नातवंडांना मालमत्ता मिळेल, मग ती वडिलांच्या बाजुने असु दे किंवा आईच्या बाजुने. एकंदरीत, मालमत्तेच्या वाटणीत सुनेवर/मुलीवर अन्याय होत आहे, असे म्हणता येणार नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

१) मूलीला भाउ नसेल आणि ती

५० फक्त
Fri, 02/03/2012 - 23:04 नवीन
१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही. नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. - लागतेच आणि जर मुलगी एकुलती एक असेल, आणि तिच्या माहेरची इस्टेट मिळणार असेल तर तिचा नवरा अशा कामात आडकाठी न आणता मदत करेल. दुरदृष्टी म्हणतात त्याला. २) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. - करावी, पण उद्या या बहिणी शिकुन मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या, त्यांची लग्नं झाली, आणि नंतर मोठ्या बहिणीला अडचण आली तर त्यांनी पण तिच्या केलेल्या कामाची मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी. ३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. - मी म्हणतो, ज्या मुलामध्ये लग्नाआधी काही वस्तु, फर्निचर, टिवी, फ्रिज अशा बेसिक गरजेच्या वस्तु घेण्याची लायकी नाही किंवा लायकी असुन त्यानं घेतलेल्या नाहीत, त्याच्याशी लग्न कराच कशाला ? कारण माझ्या माहितीप्रमाणे आज काल मुली लग्न ठरवताना घर कसं आहे यासोबत घरात काय काय आहे , कसं आहे हे सगळं पाहतात. उगा रिकाम्या प्लॅटमध्ये नाही जात कुणी राहायला. आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

बरा आहे प्रतिसाद.

आनंदी गोपाळ
Sun, 02/05/2012 - 20:59 नवीन
पण फक्त प्रतिवाद म्हणून लिहिल्यासारखा वाटला.
आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका.
कोणती ओळ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

+१

टुकुल
Fri, 02/03/2012 - 22:02 नवीन
मला पण असच वाटत होत, आणी तुम्ही ते योग्य शब्दात माडंल. जाता जाता : सध्या माझा एक जवळचा मित्र याच परिस्थितीतुन जात आहे, दोघेहि नोकरी करतात एकडे, घराचा पुर्ण खर्च माझ्या मित्राच्या खात्यातुन (तिच्या शॉपिंगचा सुद्धा), महिना संपता संपता खात्यात खुळखुळाट आणी बायकोचा पगार ति काय करते सांगत नाही. आताच तिच्या भावाने खुपच महागडी दुचाकी घेतली आणी हा म्हणतोय कि तिनेच त्याला घेवुन दिली. आता या परिस्थितीत काय करावे हे ना त्याला ना मला कळत आहे.. अजुन थोडा विचार केल्यास अस दिसतय कि सध्या काही ठिकाणी नवर्या मुलांना जास्त तडजोड करावी लागतेय टिकवुन ठेवायला आणी त्यांच्या बायका ह्या विचारांचा गैरफायदा घेत आहेत. --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

बायका ह्या विचारांचा गैरफायदा

रेवती
Fri, 02/03/2012 - 22:08 नवीन
बायका ह्या विचारांचा गैरफायदा घेत आहेत. काही प्रमाणात सत्य आहे हे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

पूर्वी याच्या उलट होत होत.जग

किचेन
Fri, 02/03/2012 - 23:09 नवीन
पूर्वी याच्या उलट होत होत.जग बदलतंय तर.चांगल आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टुकुल

छान!

चित्रा
Fri, 02/03/2012 - 18:58 नवीन
उत्तम चर्चाविषय :) माझी मते: १. मुलाने लग्न नको ठरवले ते बरेच झाले. दोघांच्याही डोक्याची कटकट (आणि त्यामुळे इतरांची कटकट) मिटली. २. लग्नाआधी पगारावरून एवढी विस्तृत बोलणी होतात, हे मला फार बरे वाटले. त्यात दोन्ही बाजूंना बोलण्याची लाज बाळगण्याची गरज वाटत नाही हे फार छान. अपेक्षेपेक्षा घरात कमी पैसे आल्याने मनाचा कोंडमारा होऊन जगण्यापेक्षा अशी आधीच व्यवस्था लावलेली बरी. ३. पण, लग्न हे अधिक पैसे घरात येण्याची एक व्यवस्था आहे हे इतके स्पष्ट उघडेवाघडे बघून जरासे वाईटही वाटले. त्यातही मुख्य म्हणजे शारिरीक आणि मानसिक पातळीवर काहीच संबंध जुळलेला नाही असे वाटते. एवढी व्यापारी डील्स होणे बरे का वाईट यावर एक निबंध लिहीता येईल असे वाटले. ४. लवकरात लवकर "लिव-इन" रिलेशन्स मध्यमवर्गातही येणार यात शंका नाही.
  • Log in or register to post comments

>>लवकरात लवकर "लिव-इन"

रम्या
Tue, 02/07/2012 - 11:12 नवीन
>>लवकरात लवकर "लिव-इन" रिलेशन्स मध्यमवर्गातही येणार यात शंका ना>> अगदी सहमत! मला वाटतं जगातील बदलत्या मुल्यांनुसार लग्न संस्थेत बदल करायचे म्हटल्यास आपण लिव्ह इन रिलेशन्स वरच येऊन पोहोचू. अवांतर : च्यायला अशा चर्चे मध्ये सगळे पती/पुरुषांच्या विरोधात लढायला आल्यासारखे का बोंबलतात काही कळत नाही. लग्नाआधी मुलाकडे स्वतःचं २ बीएचके फ्लॅट असावा, गाडी असावी अशा अपेक्षा कराव्यात. त्यासाठी मुलाने स्वतःच्या ढुंगणाला चिमटे काढून डाऊन पेमेंट करण्यालायक पैसे जमवावेत, घराचे हप्ते भरावेत. लग्नानंतर मात्र या सगळ्या गोष्टींवर अर्धांगिनी म्हणून पत्नीला समान हक्क द्यावा. पण त्याच वेळी पत्नीने काही संसारात काही खर्च उचलावा अशी अपेक्षा करावी तर म्हणावं तिने कमावलेल्या पैशाचा विनियोग कसा करावा हे तिनेच ठरवावं. च्यायला अजबच आहे सगळं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चित्रा

आला रे आला! पाशवी धागा

रेवती
Fri, 02/03/2012 - 20:42 नवीन
आला रे आला! पाशवी धागा आला. हा प्रश्न खरा आहे आजकाल पण आपण प्रगतीशील म्हणवत फारच मर्यादित विचार करतोय. प्रत्येक जोडप्याचे आर्थिक गणित आणि कौटुंबिक प्रश्न वरवर दिसायला सारखे पण तितकेच वेगळे असणार. आपापली समजूत, सामाजिक, आर्थिक परिस्थिती ई. गोष्टी आहेतच.
  • Log in or register to post comments

माझ्याकडून ठरलेल्या एका

किचेन
Fri, 02/03/2012 - 21:09 नवीन
माझ्याकडून ठरलेल्या एका लग्नामध्ये मुलीनी मुलाना अट घातली होती, लग्नानंतर ती तिच्या पगारातले ५ हजार दर महा आईला देईल जोपर्यंत भाऊ कमवायला लागत नाही तोपर्यंत.अर्थात हि गोष्ट फक्त त्या दोघांमध्ये होती.इतर कोणालाही याची कल्पना नव्हती(मलासुद्धा).जेव्हा नंतर हि गोष्ट जाहीर झाली तेव्हा सासूने तिच्या पगारातला निम्मा पगार (१२,५००) माहेरी द्यावा असे सुचवले.ह्या मुलीला वडील नव्हते. पण फक्त एकच...बाकी काही उपवर मुली मात्र हुंडा, अमुक तमुक तोळे सोन आणि धुमधडाक्यात लग्न वगैरे अशा कारणांमुळे नापसंत केल्या जातायत. पूर्वी हि जाईल सासरी, हिच्या लग्नासाठी पैसा कुठून आणणार अशी कारण देऊन मुळीच शिक्षण लवकर थांबवायचे.आता परिस्थिती बदलतीये.पालक मुलींनाही हौशीनी शिकवतायत.अगदी लोन वगैरे घेऊन.उपवर वाधुलादेखील कर्तव्याची जाणीव असते.आई वडिलांची जबाबदारी जसा मुलगा सांभाळतो तसाच मुलीने देखील संभाळल पाहिजे. हि जाणीव उपवर मुलाला देखील असली पाहिजे.
  • Log in or register to post comments

सहमत आहे

दादा कोंडके
Sat, 02/04/2012 - 01:37 नवीन
तेच तर ना. ह्या असल्या पैशाच्या गोष्टी नातं निर्माण झाल्यावर सामजस्यानं ठरवायच्या असतात. त्यात कर्तव्य असावं उपकार नको. आपुलकी असावी फक्त व्यवहार नको. लग्न वगैरे ठरायच्या आधीच ह्या असल्या अटी कसल्या घालता? मूलगा-मूलगी दोघंही सारखे वगैरे ठिक आहे पण सध्या समाजात काय स्तिथी आहे, त्याच्या कलेनं घ्यायला नको का? बदल हळू-हळू होतीलच. 'पहिल्यांदा सगळं क्लिअर असलेलंअ बरं' ह्याचा खूपदा अतिरेक होतो. "तूझा कोणी गर्लफ्रेंड/बॉयफ्रेंड होती/होता का?" किंवा "मी लग्नानंतर घरी पगार देणार, पटलं तर बघ" ही त्याचीच उदाहरणं. अश्या नाजूक वेळेला सुरुवातीलाच एकघाव दोन तुकडे करून चालत नसतं. उगिचच कुणीतरी कान भरवून दिलेली असतात अशा लोकांचे की , हा तसा निघाला, ती तशी निघाली. वास्तविक काही गोष्टींचे अंदाज बांधायचे असतात, काही गोष्टी अप्रत्यक्षपणे काढून घ्यायच्या असतात, काही गोष्टी थोड्या दिवसानंतर विचारायच्या असतात. हे सगळं व्हायला काही दिवस जाउ द्यावे लागतात. आणि पहिल्या भेटीत पुढे जाउ द्यायचंकी नाही एव्हडा अंदाज आला तरी पूरे आहे, आणि येतोच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

खर आहे.जस काही आपण लग्न करत

किचेन
Sun, 02/05/2012 - 13:52 नवीन
खर आहे.जस काही आपण लग्न करत नाहीयेत तर आपली जमीन विकतोय.हा भाव आहे जमल तर घे नाहीतर सोड.पण जमीन विकल्यानंतर पाणी लागणार आहे, पिक येणार आहे का, का कसलं आरक्षण येईल याबाबत विचारच करत नाही.आता वरच्या उदाहरणात समजा मुलगी भाऊ कमावता व्हायच्या आत आई झाली तर मग घरी पैसे कोण देणार?ती तिचा निम्मा पगार देईल अस ठरलं होत.पण पगारच बंद झाल्यावर काय नवरा देणार त्या वाटचे पैसे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

सेन्सिबल व सुंदर.

आनंदी गोपाळ
Sun, 02/05/2012 - 21:02 नवीन
वरील तिन्ही प्रतिसाद सुंदर. किचेन ताई व कोंडके दादा यांनी लिहिलेले. पुढे वाचतो आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

काय वाटेल ते करु दे, पण सुखी संसार होऊ दे रे देवा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 02/03/2012 - 21:41 नवीन
च्यायला, चर्चा प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. वाचतोय. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का

अजितजी
Fri, 02/03/2012 - 23:34 नवीन
मुलीनी घरी माहेरी पगार द्यावा का ---इथे हे गृहीत तत्व दिसत आहे कि मुलगे त्यांच्या आई वडिलांना नेहमी पगार देतात---इथे किती मुलगे आई वडिलांना पैसे देतात? मुलाचे आई वडील आजकाल मुलावर भार टाकत नाहीत ---अजीतजी
  • Log in or register to post comments

तेच म्हणायचं.लग्न झाल कि

किचेन
Sun, 02/05/2012 - 13:59 नवीन
तेच म्हणायचं.लग्न झाल कि नवर्याचा पगार नवरा-बायकोचा एकत्र असतो.आई वडिलांकडे तो सहसा जात नाही.मग मुलीचा पगार का माहेरी जावा?शिक्षणच बोलायचं झाल तर, नवऱ्याच्या शिक्षणासाठी केलेला खर्च हे कर्तव्य, आणि बायकोच्या शिक्षणावर केलेला खर्च हे उपकार.स्त्री मुक्ती, किवा स्त्री पुरुष समानता वगैरे मध्ये पुरुष भरडला जातोय.भगवान कारे तो रामलीला... सारखी अवस्था झालीये.आयला साधी बसमध्ये पण जागा नाही.लग्नाच्या वेळेसही ह्या बायका वेठीस धरतात. पुरुष म्हण्जे समजलात काय? कोणीही यावं आणि टपली मारून जावं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अजितजी

भगवान कारे तो रामलीला... हो

रेवती
Sun, 02/05/2012 - 21:14 नवीन
भगवान कारे तो रामलीला... हो ना! आणि आम्ही करू तर कॅरॅक्टर ढीला?;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

१) मूलीला भाउ नसेल आणि ती

Pearl
Sat, 02/04/2012 - 00:46 नवीन
१) मूलीला भाउ नसेल आणि ती एकूलती एक असेल तर, तिचे घर कोणते. तिने आईवडिलांना भावनिक आधार द्यावा की नाही. त्यांना गरज पडेल तेव्हा धावून जावे की नाही. त्यांच्या घराला आपले घर मानून (?) त्यांचे वय जास्त असल्याने घराच्या कामांना (काही मेंटेनन्स असेल किंवा अन्य काही [धावपळीची] कामे ज्यामध्ये त्यांना मदत लागेल) मदतीला जावे की नाही. नोटः तुर्तास या उदाहरणात असे समजू की money-power आईवडिल पूरवतील. पण man-power तर लागतेच ना. - लागतेच आणि जर मुलगी एकुलती एक असेल, आणि तिच्या माहेरची इस्टेट मिळणार असेल तर तिचा नवरा अशा कामात आडकाठी न आणता मदत करेल. दुरदृष्टी म्हणतात त्याला. >> प्रत्येक जण प्रत्येक गोश्ट करताना हा फायद्या तोट्याचा तराजू घेउन बसला तर खरचं जगणचं अवघड होइल. [मला वाटतं प्रत्येक गोश्टीतली व्यापारी/हिशेबी व्रुत्तीमुळेच आज मुलगी-अपत्य कोणालाही नको असते. तुमचंच गणित मांडून बघा ना तोटाच तोटा आहे. सुशिक्षित लोकही जर असा विचार करत असतील तर अशिक्षित किंवा आर्थिक दुर्बल लोकांची काय कथा. असो तो एक वेगळाच विशय आहे. आणि जाउ दे इथे विषयांतर नको. ] तुम्ही नवर्‍याच्या बाबतीत बोलताना म्हणता की 'नव-याला त्याचं घर असतंच आणि एकच असतं, त्याला त्याच्यासाठी खर्च करणं भागच आहे किंवा त्याचं ते कर्तव्यच आहे.' तेव्हा मात्र तुम्ही त्याला कर्तव्य वगैरे म्हणता. तेव्हा तुम्ही नवर्‍याच्या आई-वडिलांची काही इस्टेट आहे का, ती मिळणार आहे का याचा विचार न करता कर्तव्य म्हणून त्यांच्यासाठी करणार आणि बायकोच्या आई-वडिलांसाठी ( खर्च तर सोडाच. या उदाहरणात खर्च धरलेलाच नाहिये) मदतीला जाताना मात्र आपल्याला किती फायदा होणार याचा विचार करून आणि फायदा होणार असेल तरच नवरे जातील असं म्हणणं मला तरी दुटप्पीपणाचं वाटतं. बायको एकुलती एक अपत्य असेल तिच्या आई-वडिलांची तर तिच्या आई-वडिलांना मदत करण हे पण तिच कर्तव्यच नाही का. २) मूलीला भाउ नसेल आणि बहीणीच असतील ज्या अजून शिकताहेत आणि समजा मुलगी नोकरी करत आहे तर तिने माहेरच्याना आर्थिक मदत करावी की नाही. - करावी, पण उद्या या बहिणी शिकुन मोठ्या झाल्या नोकरीला लागल्या, त्यांची लग्नं झाली, आणि नंतर मोठ्या बहिणीला अडचण आली तर त्यांनी पण तिच्या केलेल्या कामाची मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी. >> आपल्याला मदत करणार्‍याबद्दल प्रत्येकाने मदतीची आठवण ठेवुन तिला मदत करावी, हे बरोबरच आहे. पण समजा तुम्ही तुमच्या बहीण/भावाला मदत करताना तसे सांगता किंवा तसा करार करता का. नाही ना. तुम्हाला मदत करणे कर्तव्य वाटते म्हणून करता आणि तुम्हाला निश्चितच वाटते की तुमच्या बहिणीने/भावाने त्याची आठवण ठेवावी. पण पुढे जाउन तुमचा भाउ/बहिण त्याची जाण ठेवेल की नाही हे त्या व्यक्तिवर ठरते. त्याचप्रमाणे बायकोने तिच्या बहिणीला मदत करणे कर्तव्य वाटते म्हणून केले तर काय बिघडले. आता बहीणीने त्याची जाणीव ठेवावी. पण ती तसे करेल की नाही हे त्या व्यक्तिवर ठरते. ३) आणि समजा एखाद्या मुलीने सासरचेच घर आपले मानून तिथे आपल्या नोकरीतले पैसे खर्च केले (वस्तू, फर्निचर, टीवी, फ्रीज, बाजारहाट ... etc etc) ... आणि हे घर सासर्‍यांच्या नावावर आहे. तर असा कायदा का आहे की सासर्‍यांच्या घरावर सुनेचा काही अधिकार नाही. - मी म्हणतो, ज्या मुलामध्ये लग्नाआधी काही वस्तु, फर्निचर, टिवी, फ्रिज अशा बेसिक गरजेच्या वस्तु घेण्याची लायकी नाही किंवा लायकी असुन त्यानं घेतलेल्या नाहीत, त्याच्याशी लग्न कराच कशाला ? कारण माझ्या माहितीप्रमाणे आज काल मुली लग्न ठरवताना घर कसं आहे यासोबत घरात काय काय आहे , कसं आहे हे सगळं पाहतात. उगा रिकाम्या प्लॅटमध्ये नाही जात कुणी राहायला. >>आता तुम्ही माझं म्हणणं शब्दशः घेत आहात. फर्निचर नवे घेतले जाउ शकते. टिवी, फ्रिज पण जुने असतील तर नवे खरेदी केले जाउ शकतात. तरीही त्याऐवजी आपण मायक्रोवेव, डिशवॉशर, ए.सी. अशा वस्तु घेतल्या म्हणू. आणि एक नम्र विनंती, - माझ्या प्रतिसादातली एक ओळ विनासंदर्भ बाहेर काढुन त्याचा विपर्यास करु नका. >> मान्य आहे की मी तुमच्या प्रतिसादातली एक ओळ बाहेर काढली पण १) एक तर ती विनासंदर्भ मुळीच नाहिये. तुमचा पूर्ण प्रतिसाद त्या ओळीवर बेतला आहे म्हणू किंवा त्या ओळीशी संबधित आहे म्हणू. त्यामूळे मी काही विपर्यास केला आहे असे मला मुळीच वाटत नाही. २)दुसरं असं की मी ती ओळ घेण्यामागे माझा एकच उद्देश होता की माझा प्रतिसाद तुमच्या प्रतिसादावर दिलेला आहे हे कळाव यासाठी फक्त रेफरन्स म्हणून मी ती ओळ वापरली. कारण माझा प्रतिसाद मोठा होता आणि तो टंकेपर्यंत दुसर्‍या कोणी प्रतिसाद टाकला तर क्न्फ्युजन होउ नये एवढाच साधा उद्देश होता. बाकी काही नाही.
  • Log in or register to post comments

मुद्दा क्र. १ - तुमचा मुद्दा

५० फक्त
Sat, 02/04/2012 - 07:25 नवीन
मुद्दा क्र. १ - तुमचा मुद्दा मान्य, पण हे आजचंच नाही तर कालचं पण कटु सत्य आहे, वास्तव आहे. ही परिस्थिती जर बदललेली असती तर हे असे पैशावरुन सुरु होणारे प्रश्न उपस्थितच झाले नसते. मुद्दा क्र.२ - माझा पहिला प्रतिसाद पुन्हा वाचा, नव-याला पक्षी पुरुषाला हा चॉईस ह्या समाज पद्धतीनंच ठेवलेला नाही, जसे या समाज पद्धतीनं त्याला तथाकथित अनिर्बंध अधिकार दिले त्याबरोबरच जवळपास तेवढीच कर्तव्यं पण त्याच्या गळ्यात मारलेली आहेत, तिथं त्यानं त्याच्या भावा बहीणिंना मदत करताना करार - मदाराचा प्रश्नच येत नाही, तिथं पर्याय नाहीत. पण बायकोच्या पक्षी स्त्रीच्या बाबतीत आहेत किंवा लग्नानंतर तयार होतात किंवा काही चाणाक्ष बायका आपलं आर्थिक स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी ह्या मार्गाचा अवलंब करतात. मुद्दा क्र. ३ - तुमचं म्हणणं शब्दश्: घेण्यामागचा हेतु थोडासा विनोदनिर्मिती होता, तो असफल झाला असे म्हणावे लागेल. कायद्याबद्दल बोलायचं झालं तर माझी तेवढी समज नाही. मुद्दा क्र. ४ - आपण ती एकच ओळ कॉपी पेस्ट केल्यानं विपर्यास झाला असं माझं मत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

मुली कमवायला लागल्या तर इतका गदारोळ?

श्रेयाताई
Sat, 02/04/2012 - 01:00 नवीन
मुली कमवायला लागल्या त्याला पुष्क़ळ वर्ष झाली. त्या पैशावर कुणाचा हक्क यावरून गदारोळ माजले. पुरुषाची कमाई जशी प्रथम स्वत:साठी आणि नंतर त्याच्या स्वतःच्या कुटुंबासाठी तसेच स्त्रियांचेही! माहेर वा सासर सगळे नंतर..! तिला कशाला प्राथम्य क्रम दयावासा वाटतो ते महत्त्वाचे. कारण चैन आणि गरज या दोन वेगळ्या आणि व्यक्तिसापेक्ष बदलणार्‍या संकल्पना आहेत. माहेरच्या वा सासरच्यांना तिने गाडीचे हप्ते भरावे असे वाटत असेल, गाडी जर तिची आणि केवळ तिचीच असेल तर ते ठीक आहे. अन्यथा कुणाच्या हौशी-मौजी भागवण्यापेक्षा ती स्वतःसाठी पैसे साठवेल.
  • Log in or register to post comments

जॉईंट अकाऊंट ..

शेखर काळे
Sat, 02/04/2012 - 07:08 नवीन
लग्न झाल्याबरोबर, किंवा ठरवतांनाच जॉईंट अकाऊंट काढायचे, मुलगा व मुलगी, दोघांनीही ठरवायला पाहिजे. त्यातून किती खर्च होतो हे दोघांनाही कळते, त्यामुळे लपवाछपवीचा प्रश्नच यायला नको. आतातर ऑनलाईन बँक अकाऊंट कधीही पाहता येतो.
  • Log in or register to post comments

कायदाच हवा

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 02/04/2012 - 08:13 नवीन
मुलगा असेल की मुलगी जर पालकांच्या मालमत्तेत वाटा हवा असेल तर खर्चातही वाटा उचललाच पाहिजे असा कायदाच हवा. कायद्याप्रमाणे मुलींना पालकांच्या मालमत्तेत बरोबरीचा वाटा असतो. अर्थात त्यात तक्रार करण्यासारखे काहीच नाही. पण त्याच न्यायाने खर्चात आपलाही वाटा देणे ही पण त्यांची नैतिक जबाबदारी असते. कर्जाने घेतलेल्या घराचे हप्ते फेडताना सर्वच भावंडांना (भाऊ/बहिण) तो देणे बंधनकारक हवे. डोक्यावर कर्ज असताना छदाम द्यायचा नाही आणि पालक गेल्यानंतर नुसता आपला वाटा मागायला येणे हे कितपत समर्थनीय आहे? अर्थात हे मुलगा आणि मुलगी दोघांनाही तितकेच लागू होते. (अवांतरः पालकांच्या मालमत्तेत वाटा मुलींना देण्यात काहीच चूक नाही. पण मग वृध्द आई-वडिलांना सांभाळायची जबाबदारी पण घ्यायला हवी. हे सरसकट विधान नाही पण माझ्या पाहण्यात किमान ३-४ केसेस (आमच्या कुटुंबात किंवा ओळखीच्यांमध्ये) आल्या आहेत. मुलीचे लग्न झाल्यानंतर आई मुलीला धाऊन धाऊन मदत करणार पण त्या आईचे हातपाय चालेनासे झाले की मात्र आई नकोशी होणार आणि मग तिला सांभाळणे ही भावाची जबाबदारी! परत मालमत्तेत वाटा मागायला मात्र सगळ्यांच्या पुढे. आणि परत यांना कोणी काही बोलायचे नाही!!)
  • Log in or register to post comments

विषय

नितिन थत्ते
Sat, 02/04/2012 - 10:08 नवीन
शीर्षक वाचून कसल्या औषधाच्या जाहिरातीचा धागा असावा असे वाटले होते. :)
  • Log in or register to post comments

मलाही

पुण्याचे वटवाघूळ
Sat, 02/04/2012 - 10:18 नवीन
मलाही अगदी थत्तेचाचांसारखेच वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

"कामाच्या" औषधाच्या

टवाळ कार्टा
Sat, 02/04/2012 - 20:52 नवीन
"कामाच्या" औषधाच्या ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

सर्व पत्रव्यवहार गुप्त ठेवण्यात येईल,

आनंदी गोपाळ
Sun, 02/05/2012 - 21:08 नवीन
अशी ओळ त्या जाहिरातींत असते. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

<<त्यामुळे बायकांनी घरी बसून

वैशाली माने
Sat, 02/04/2012 - 13:12 नवीन
<<त्यामुळे बायकांनी घरी बसून घरकामाची किंमत होत नाही म्हणत राहण्यापेक्षा नोकरी करावी हे जास्त बरं. आता नोकरी करुनही घरकाम करावंच लागेल असं म्हटलं जाईल आणि ते खरंही आहे. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण निदान सुरु तरी करा प्रयत्न.. गवि..काकांशी सहमत याच विचारांतुनच मी नोकरी करु लागले.
  • Log in or register to post comments

पण त्या मूलीचा भाउही नुकताच

JAGOMOHANPYARE
Sat, 02/04/2012 - 16:19 नवीन
पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> त्या भावाची बायको नक्कीच नोकरी करणारी नसणार... आई वडिलांच्यापेक्षाही असे स्वतःच्या घरातल्या लोकाना नोकरी करु न देणारेच अशा पगाराचे हिस्से मागत रहातात.. अजिबात देऊ नये... लग्न मोडले हे बरे झाले...
  • Log in or register to post comments

लाईफ टाईम

मयुरपिंपळे
Sat, 02/04/2012 - 18:04 नवीन
लाईफ टाईम जरी तीने घरी मदत केली तरी काय हरकत आहे. Image removed.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा