✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्नाआधी आणि लग्नानंतर!

द
दादा कोंडके यांनी
Fri, 02/03/2012 - 15:48  ·  लेख
लेख
परवाच एक मित्र लग्नाच्या फायनल बोलणीसाठी गावाला जाउन आला. लग्न अगदी ठरल्यातच जमा होतं म्हणून आल्यावर मी त्याच्याकडे पार्टी मागितली पण तो म्हणाला ऐनवेळी बोलणी फिसकटली. थोडसं खोदून विचारल्यावर कळलं की त्या मुलगीला :) लग्नानंतर एक दिड वर्षेतरी तीचा पगार तीच्या घरी द्यायचा होता. हुंड्याचा वगैरे तर प्रश्नच नव्हता आणि माझा मित्रपण पगार न-देण्याबद्दल आग्रही नव्हता. पण त्या मूलीचा भाउही नुकताच इंजिनीअर होउन नोकरीला लागला होता आणि तीचा पगार कारचे हप्ते भरायला द्यावा लागणार होता. जे माझ्या मित्राच्या मते योग्य जस्टीफिकेशन नव्हतं. अजुन एक उदाहरण माझ्या ओळखीचं आहे. अश्याच कुठल्याश्या छोट्या कंपनीत नोकरी करणारी मुलीचा पगार बारा हजार होता. तीला आयटीत नोकरी लागल्यामूळे तीचा पगार एकदम पंण्णास हजार झाला. त्याच्या जोरावर त्यांनी नवीन घर (तीच्या वडिलांच्या नावावर) घेतलं, कार घेतली. एका वर्षात वडील रिटायर झाले, लहान भावंडांची शिक्षणं चालू. म्हणून ती कर्ज फेडेपर्यंत तीला पगार मग घरी देणं आलं. हिच्या लग्नाचे प्रयत्न चालूच होते पण त्या अटी मूळं खूपशा स्थळांकडून नकार आला. हीच उदाहरणं नाही, पण ह्या दोन-चार वर्षात खूप मित्रांना अशा अटी ऐकायला मिळाल्यात आणि मैत्रिणींनी अटी घातल्या आहेत. पुर्वी (म्हणजे अपने जमानमे) मूलीचे पैसे आईवडील घ्यायला अवघडत असत. अगदीच घेतले तर तुझ्याच लग्नाला होतील म्हणून बँकेत ठेवत असत. पण आता मूलींच्या शिक्षणाबाबतही जागरूक असणारे पालक मुलीच्या लग्नाआधी आणि लग्नानंतरही पैसे अगदी हक्काने घेतात असं दिसतं. अगदी गरज पडली तर मदत करणं वेगळं किंवा हेल्थ इंश्युअरन्सचे पैसे भरणं वगैरे समजू शकतो, पण सरसकट लग्नानंतर अर्धापगार किंवा पूर्ण पगार घरी देणार्‍या मूली पण बघितल्या आहेत. या अनुषंगानं मला काही पडलेले काही प्रश्न, १. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? या बद्दल मिपाकरांना काय वाटतं?
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
41488 वाचन

💬 प्रतिसाद (127)

प्रतिक्रिया

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण

गवि
Fri, 02/03/2012 - 16:03 नवीन
१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत?
दिलेली उदाहरणं आणि एकूण वस्तुस्थिती पाहता फक्त १-२ वर्षांचा प्रश्न आणि त्यानंतर कर्ज फिटलं, हप्ते संपले, गरज मिटली असं होणार आहे असं वाटत नाहीये. बाकी मुलीने तिच्या घरी अर्धा पगार दिला तर काय प्रॉब्लेम आहे बुवा?? फारतर तिने सासरी घरचा किमान खर्च स्वतः उचलून बाकीचा सर्व पगार माहेरी कायमच दिला तरी तिची मर्जी.. आणि ते योग्यही आहे. मुलाचा चालतो पण मुलीचा पगार घेण्यात मात्र काही लज्जास्पद आहे का?
  • Log in or register to post comments

आर्थिक गरजा

सस्नेह
Fri, 02/03/2012 - 16:59 नवीन
मुली॑नी सुद्धा थोडा पगार सासरी व काही थोडा माहेरी द्यायला हरकत नाही. मुलगा जर आई वडील व बायको दोघा॑चा खर्च चालवीत असेल तर मुलीने चालवायला काय हरकत आहे ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

हम्म .......प्रश्न फार गहन

पियुशा
Fri, 02/03/2012 - 16:05 नवीन
हम्म .......प्रश्न फार गहन आणी" डोक्याला शॉट्ट देणारा आहे " (ह्.घ्या.) जाणकार / माहितागार / सुज्ञ मि .पा. कराच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत :) (नोकरी करणारी पियु )
  • Log in or register to post comments

या

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 02/03/2012 - 16:10 नवीन
जाणकार / माहितागार / सुज्ञ या पैकी तुम्ही काहिच नाही कां? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@ मि.का. आम्हाला आमचे डो़क्के

पियुशा
Fri, 02/03/2012 - 16:15 नवीन
@ मि.का. आम्हाला आमचे डो़क्के खर्ची घालायचे नाही ( आधीच अक्कल कमी आहे ) ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

अजुन

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 02/03/2012 - 16:40 नवीन
डो़क्के खर्ची घालायचे नाही
अजुन एक जोक सांगा ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

दिवसाला एकच जोक

वपाडाव
Fri, 02/03/2012 - 18:18 नवीन
अजुन एक जोक सांगा ना!
दिवसाला एकच जोक ऐकण्याची सवय करुन घे... तिला जास्त जोक्स येत नाहीत... अन आजच २ सांगितले तर उद्या काय सांगेल ती...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

@अजुन एक जोक सांगा ना!

अत्रुप्त आत्मा
Fri, 02/03/2012 - 23:43 नवीन
Image removed. @अजुन एक जोक सांगा ना! Image removed. मि....का. ?... मेलो हसून हसून Image removed. सांगा ना..?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मिसळलेला काव्यप्रेमी

@ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त

पियुशा
Sun, 02/05/2012 - 11:35 नवीन
@ व.प्या.,मि.का अन अत्रुप्त आत्मा काय चालवलय रे ? ;) अजुन जोक येत नै ब्बास आता ;) तुम्हाला तिघानाही तोफेच्या तोण्डी देउ का रे ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

वप्या अणि मिकाला तोफेच्या

प्रचेतस
Sun, 02/05/2012 - 12:41 नवीन
वप्या अणि मिकाला तोफेच्या तोंडी देऊ शकाल, पण आत्म्याला देऊन काय साध्य होणार आहे? आत्मा अमर आहे. नैनं छिन्दन्ति शस्त्राणी नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः।।
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

पण त्या आत्म्याला बोट

किचेन
Sun, 02/05/2012 - 13:42 नवीन
पण त्या आत्म्याला बोट नसतात.तुमच्या ह्या प्रतिक्रीयातरी थांबतील. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ओ ताई तो आत्मा आहे आणी ते

पक पक पक
Sun, 02/05/2012 - 14:24 नवीन
ओ ताई तो आत्मा आहे आणी ते सुद्धा अत्रुप्त :crazy: असे आत्मे काहीही करु शकतात .त्यांच्या बोट नसण्यावर जाउ नका. आम्हि अनुभव घेतलेला आहे त्यांच्या नसलेल्या बोटांचा. :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

असे आत्मे काहीही करु शकतात

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/05/2012 - 15:07 नवीन
असे आत्मे काहीही करु शकतात .ह्ही ह्हा ह्हा हा... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

@पण त्या आत्म्याला बोट नसतात.

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/05/2012 - 15:25 नवीन
@पण त्या आत्म्याला बोट नसतात. >>> Image removed. अगं किच्चु तै...बोट नै गं... बोटं... आणी मला बोटे नाहीच आहेत,,, आत्म्याला देहच नसतो,मग बोटे कुठची...? मी हे लिहिताना कंप्युटरच्या हार्डडिस्क मधेच प्रवेश केलेला असतो...त्यामुळे तर मुक्त संचार करु शकतो... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

@-तुम्हाला तिघानाही तोफेच्या

अत्रुप्त आत्मा
Sun, 02/05/2012 - 15:36 नवीन
@-तुम्हाला तिघानाही तोफेच्या तोण्डी देउ का रे ? >>>अग्गं बाबौ... पियु चिडली,,, पळा...पळा...पळा... Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मा. अहिंसावादी मिपाकरांना न

५० फक्त
Mon, 02/06/2012 - 07:34 नवीन
मा. अहिंसावादी मिपाकरांना न मर विनंती, सदर मिपाकर मा. पियुषाताई यांचा सामुहिक बधकांड आरंभण्याचा उघड उघड मनोदय पाहुन आपले दयार्द हृदय अजुन द्रवले कसे नाही, का या बिचा-या वधस्तंभाकडे पक्षी तोफमुखाक्डे ओढुन नेल्या जाणा-या इतर मिपाकरांबाबत आपल्या मनात काही आस्था नाही असे समजावे की काय ? हे भगवान निलकांता , हे प्रत्यक्ष जग कृर व निष्ठुर आहे याची जाणिव होतीच पण तीच कृरता आणि हिंसात्मक जाणिवा जर या आभासी जगात प्रलयंकारी स्पंदने उत्पन करु लागल्या तर आम्हा सारख्या ससका असणा-या लोकांनी कुठे जावे, गिरनार पर्वतावर की काय ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ ५० फक्तमला वाट्त कि नै

पियुशा
Mon, 02/06/2012 - 10:12 नवीन
@ ५० फक्त हे भगवान निलकांता __/\__ माझा पण णमस्कार सान्गा त्याना ;) ५० राव , मला वाट्त कि नै ,कि नै,कि नै , माझा ,व.प्या.चा ,अत्रुप्त आत्मा अन पक पक पक या सर्व माननिय सदस्याचा " बाजार ऊठ्वनार वाट्ट्ता आपण ;) पण आमच्याकडे M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank आहे म्हणल ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

एक ससका मिपाकर म्हणुन

५० फक्त
Mon, 02/06/2012 - 10:41 नवीन
एक ससका मिपाकर म्हणुन प्रामाणिक शंका विचारतो - M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank - हे हे सगळं चालवण्यासाठी लागणारे लायसन आपल्याकडे आहे काय ? असल्यास आणि नगरहुन निघताना, सगळ्या टायरमधली हवा, ऑईल, हेडलाईटचे बल्ब् वगैरे वगैरे चेक करुन निघा, पुण्यात अशा चिल्लर वाहनांची दुरुस्ती केली जात नाही, आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात. म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ? अवांतर - दुस्-या परिच्छेदातला कंस मागच्या किंवा पुढच्या, ज्या हव्या त्या शब्दाला लागु करुन घेउ शकता, आमची हरकत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

अहो ५०, इकडं, तिकडं कशाला

प्रचेतस
Mon, 02/06/2012 - 10:51 नवीन
अहो ५०, इकडं, तिकडं कशाला पळता, नगरलाच पळा की. तिथे भुईकोट किल्ला आहे, त्याच्याभोवती खंदक आहे. तिथे हे टँक वैग्रे नाही येऊ शकणार.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

@ ५० फक्तआणि हो शक्यतो लकडी

पियुशा
Mon, 02/06/2012 - 10:55 नवीन
@ ५० फक्त आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात. तुम्ही त्याची काळ्जी करु नका, तसही MH-16 पाहीले ना MH-12 वाले " नगरचे सनकी लोक्स" आल्येत म्हणुन आपोआप साइड देत्तातच्च ;) म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ? ते तुमच तुम्ही बघुन घ्या काय तयारी करायची ते , पलायन करायचे का सामना करायचा ;) " तह " करणार का? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

" तह " करणार का? भुईकोट

अन्या दातार
Mon, 02/06/2012 - 10:56 नवीन
" तह " करणार का?
भुईकोट किल्ल्यावर पोचल्यानंतर विचार करुन कळवतील बहुदा ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

" तह " करणार का? ओ लेडी

पक पक पक
Mon, 02/06/2012 - 13:05 नवीन
" तह " करणार का? ओ लेडी औरंग्झेब ,तह करायला समोर यावे लागते ,आम्ही पळुन जायच्या विचारात आहोत...... ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

>>>ओ लेडी औरंग्झेब लेडी

यकु
Mon, 02/06/2012 - 14:13 नवीन
>>>ओ लेडी औरंग्झेब लेडी औरंगझेब नाय रे.. बडी साहेबा ! चिकाच्या पडद्याआडून बोलत असते ती ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

लेडी औरंग्झेब ??????य. कु अन

पियुशा
Mon, 02/06/2012 - 15:08 नवीन
लेडी औरंग्झेब ?????? " द्येवा हे काय एकतेय मी ;) उचल ,मला नाही ह्या दोघाना ;) य. कु अन पक पक पक रणगाडा तुमच्याच दिशेने वळ्वते आता ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यकु

@लेडी औरंग्झेब ?????? वरती

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/06/2012 - 15:50 नवीन
@लेडी औरंग्झेब ?????? Image removed. वरती अनेकांनी लेडी औरंगजेब म्हटल्यामुळे आमच्या अंतःचक्षूंपुढे पियुशा बैं चे चित्र, कुठल्याश्या हिंदी शिनुमातल्या... सैनिकी पोशाखातल्या... पाठिला धनुष्यबाण लावलेल्या... घोड्यावर बसलेल्या... नगरहुन पुण्याच्या दिशेने येणार्‍या....(हुश्श...सुटलो एकदाचा वर्णनातून ;-) ) हेमा मालिनी सारखे आले आणी बेजान हसू आलं Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हेमा मालिनी सारखे अह्हा

गणेशा
Mon, 02/06/2012 - 16:23 नवीन
हेमा मालिनी सारखे
अह्हा .. बाकी वप्या नी जीम लावली पाहिजे राव .. धर्मेंद्र च्या तोडीस उतरेल नक्की तो ... आणि हा रणगड्याला वळवण्यासाठी मदतनीस नाय म्हणत मी .. बरका ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मला फुलानदेविच्या वेशात पियू

किचेन
Mon, 02/06/2012 - 17:01 नवीन
मला फुलानदेविच्या वेशात पियू दिसली.ak ४७ घेऊन ;) .( पिवशीच्या मनामध्ये ..बघतेच आता ह्या सगळ्यांना सारखे सारखे माझ्यावा शुद्धलेखनाची खिल्ली उडवतायत काय....एकेकाची अशी अवस्था करीन कि शुद्धलेखन काय लेखन करायच्या लायकीचा राहणार नाही.हि हि हा हा हा...मला डोक नाही काय...हसायला येतंय न..आता असे एक एक विनोद सांगेल न हसन विसराल रडायला लागाल.भिग मागाल माझ्याकडे , पियुताई तू लिहितेस तेच शुध्द ,पण आम्हाला विनोद सांगू नकोस.हि हि हा हा हा .)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

एक आवाहन

मी-सौरभ
Mon, 02/06/2012 - 17:12 नवीन
ज्या ज्या लोकांना पियु दिसत्ये त्यांनी ती कशी दिसते हे सांगावे अशी नम्र विनंती आहे. @वप्या: तू उगाच डू. आयडी डू. आयडी असं म्हंतोस लेका; लोकांना दिसत्ये ती ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

@माझ्यावा शुद्धलेखनाची @आता

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/06/2012 - 17:20 नवीन
@माझ्यावा शुद्धलेखनाची @आता असे एक एक विनोद सांगेल न हसन विसराल रडायला लागाल. @भिग मागाल माझ्याकडे , @पियुताई तू लिहितेस तेच शुध्द ,पण आम्हाला विनोद सांगू नकोस. (?) Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

(No subject)

वपाडाव
Mon, 02/06/2012 - 17:38 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ किचेन तु माझीच्च शिष्या

पियुशा
Tue, 02/07/2012 - 10:11 नवीन
@ किचेन तु माझीच्च शिष्या आहेस हे पुन्हा एकदा तुझ्या लेखनाने सिद्ध केले ग बै ;) कित्ती ह्सवशील ? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

निजामशाही अन अदिल्शाही एकत्र

पक पक पक
Tue, 02/07/2012 - 11:54 नवीन
निजामशाही अन अदिल्शाही एकत्र झाल्या सारख वाटु लागलय ;) ...आता पळाच :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@निजामशाही अन अदिल्शाही

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/07/2012 - 13:48 नवीन
@निजामशाही अन अदिल्शाही एकत्र झाल्या सारख वाटु लागलय >>> Image removed. चुकून ऐति-हासिक सत्य बाहेर पडलय...हे देवा...!याचा वर्तमानाशी तर संमंध नाही ना..? ;-) अवांतर-कॉलिंग वल्ली... निजामशाही व अदिलशाहीचा अंमल असलेली महाराष्ट्रातली गावे कोणती हो...? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

अहमदनगरचाच निजाम हो.

प्रचेतस
Tue, 02/07/2012 - 13:49 नवीन
अहमदनगरचाच निजाम हो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ ५० फक्त आणि हो शक्यतो लकडी

५० फक्त
Tue, 02/07/2012 - 08:21 नवीन
@ ५० फक्त आणि हो शक्यतो लकडी पुलावरुन येउ नका . आणि प्रवासात खिडकीतुन (असेल तर) डोकं बाहेर काढु नका, हायवेला बाकी गाड्या फार फास्ट असतात. तुम्ही त्याची काळ्जी करु नका, तसही MH-16 पाहीले ना MH-12 वाले " नगरचे सनकी लोक्स" आल्येत म्हणुन आपोआप साइड देत्तातच्च - माहिती साठी धन्यवाद, मुळ लेखाला अनुसरुन तुम्ही जर आमच्या कर्जाचे हफ्ते भरणार असाल तर आम्ही सुद्धा एक एमएच १६ चा एक टँक विकत घेउ असा विचार आहे . पण टँक शक्यतो सिएनजीवर चालणारा बघा , तुम्ही काय पेट्रोलचे पैसे नाय देणार ना. म्हणजे नगर ते पुणे अंतर साधारण ३ तास, टँकला ४ तास लागतील, त्या हिशोबानं आम्हाला इथुन पळुन जाण्याची तयारी करायला बरं.? का ओककाकांना विचारावं बरं या हल्ल्याला कसं तोंड द्यायचं ते का चितळे काकांना विचारावं ? ते तुमच तुम्ही बघुन घ्या काय तयारी करायची ते , पलायन करायचे का सामना करायचा " तह " करणार का? - अरे कधी पण, कारण काय सामना म्हणलं की पुर्वी पराशेट मदत करायचे पण हल्ली काय माहित नाही ? , बरं कधी येताय तह करायला, करार छापुन वगैरे घ्यायचा का कसे, नाही आधीच टायपिंग करुन लेखनाची ही अवस्था आहे हाताने लिहुन, काय होईल कोण जाणे. शक्यतो स्वाक्षरीचा सुद्धा शिक्का किंवा स्टिकर घेउन यावे ही विनंती. बाकी तहाची भेट म्हणुन हुरडा घेउन आलात तर आनंदच होईल, इकडे माओ कोळ्से पेटवुन त्यावर गरम करुन खाउ, हाकानाका. पियुशा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

@M3 - A light tank , jermen

अत्रुप्त आत्मा
Mon, 02/06/2012 - 16:12 नवीन
@M3 - A light tank , jermen made flank gun, अन shrman cab tank आहे म्हणल >>>ही घ्या आणखिन तयारी....भुई-कोट किल्ल्यातुन ;-) (हम्कू नगर का चप्पा,चप्पा मालुम है..;-) ) आर्म्ड फोर्स :- Image removed. Image removed. Image removed. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

त्ये दोन नं. जवान नुसत हवा

पक पक पक
Tue, 02/07/2012 - 08:27 नवीन
त्ये दोन नं. जवान नुसत हवा भरत आहे :crazy: , त्याचा काय उपयोग...? :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@त्याचा काय उपयोग...? >>>

अत्रुप्त आत्मा
Tue, 02/07/2012 - 11:17 नवीन
@त्याचा काय उपयोग...? >>> आमच्यातही काही लोक नुसतेच हवा भरलेले आहेत,,,हे सिद्ध करणे... :-p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पक पक पक

आमच्यातही काही लोक नुसतेच हवा

पक पक पक
Tue, 02/07/2012 - 11:57 नवीन
आमच्यातही काही लोक नुसतेच हवा भरलेले आहेत, :bigsmile: :bigsmile: :bigsmile: :bigsmile:
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

हम्म .......प्रश्न फार गहन

पक पक पक
Sat, 02/04/2012 - 10:45 नवीन
हम्म .......प्रश्न फार गहन आणी" डोक्याला शॉट्ट देणारा आहे " (ह्.घ्या.) लग्न झाल्यावर विचार करा की , काय घाई आहे.पुर्ण क्षमतेने डोक्याचा वापर साधारण्तः त्यानंतरच सुरु होतो. जाणकार पक पक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण

पक पक पक
Fri, 02/03/2012 - 16:08 नवीन
१. घरच्या आर्थिक गरजा पूर्ण होई पर्यंत मूली १-२ वर्षे का थांबू शकत नाहीत? २. नोकरी करणारीच बायको पाहिजे असं म्हणणारी मूलं एक-दीड वर्षे अशा प्रकारच्या तडजोडी का करत नाहीत? लग्न हा पैसा मिळ्वण्याचे एक साधन आहे असे समजुन ज्यांना 'कर्तव्य' असते असे लोकं या तड्जोडी का करतील...?मुळात लग्न कोणाशी त्या व्यक्ती बरोबर कि तिच्या मिळ्णार्‍या उत्पन्नाबरोबर हे ठरवावे ,आणी मग असले प्रश्न उपस्थित व्हावेत..
  • Log in or register to post comments

पैसे द्यायला काहीच हरकत नाही..

पिलीयन रायडर
Fri, 02/03/2012 - 16:15 नवीन
जर माहेरी गरज असेल तर पैसे जरुर द्यावेत... पण कधी कधी असेही होते की माहेरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत सासरी भक्कम नसते... जर मुला-मुलीला मुळ गावापेक्षा वेगळ्याच जागी रहायचे असेल आणि घर, मुल आणि इतर खर्च स्वतः करावा लागणार असेल तर त्यांचा पगार हा सासर्-माहेर ह्या पेक्षा त्यांना स्वतःलाच जास्त आवश्यक असतो... अशा वेळी मुली पगार माहेरी न देता स्वतःच्या संसारात देउ शकतात... माझ्या मते सासर्-माहेर ह्या पेक्षा गरज जिथे आहे तिथे व गरज जेवढी आहे तेवढा पैसा द्यावा...
  • Log in or register to post comments

+ १टु पिलियन राइडर

पियुशा
Fri, 02/03/2012 - 16:49 नवीन
+ १टु पिलियन राइडर :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

मला पडलेले आणखी २ प्रश्न..

Pearl
Fri, 02/03/2012 - 16:55 नवीन
<<पण कधी कधी असेही होते की माहेरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत सासरी भक्कम नसते... >> आणि जर असे असेल की 'सासरची परिस्थिती सुखवस्तु असते आणि तुलनेत माहेर भक्कम नसते' तेव्हा १)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का. २)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

१)अशा वेळी ती आपला पगार

गवि
Fri, 02/03/2012 - 17:01 नवीन
१)अशा वेळी ती आपला पगार (पूर्ण सोडाच पण काही रक्कम) तिच्या माहेरच्या घरासाठी खर्च करू एच्छित असेल तर तिला तो करता येइल आणि तिच्या आई-वडिलांनाही तो ताठ मानेने स्वीकारता येइल अशी परिस्थिती आज समाजात आहे का.
समाजात अशी परिस्थिती इन जनरल नाही पण प्रत्येकाने आपापली लाजलज्जेची कल्पना ठरवून घेतली तर बरं. आणि ज्याचा पगार आहे त्याला त्याच्या विनिमयाचा पूर्ण हक्क असावा. पूर्ण की काही भाग द्यायचा हे सर्व कमावणार्‍याने ठरवायला हवं.
२)आणि समजा अशा वेळी ती जर नोकरी करत नसेल आणि तिला तिच्या माहेरच्याना मदत करायची असेल तर तिने काय करावे.
ती नोकरी करत नसेल... पुन्हा एकदा.. इथे कमावणारा "तो" असेल आणि ती कमावत नसेल तर ती काही "करण्याच्या" स्थितीत नाहीच आहे. तेव्हा मदत करायची असेल तर "तिने" काय करावे हा प्रश्न उद्भवतच नाही. फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Pearl

फार तर कमावणार्‍या नवर्‍याला

पिलीयन रायडर
Fri, 02/03/2012 - 17:08 नवीन
फार तर कमावणार्‍या नवर्‍याला विनंती करु शकते.
गवि... केलतं ना युद्ध सुरु...!!! जर ती मुलगी घर , मुल सांभाळ्ण्यासाठी नोकरी करत नसेल तर तिच्या नवर्याच्या पगारावर तिचा हक्क नाही का...??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

आपण मॉडेल आन्सर शोधतोय की

गवि
Fri, 02/03/2012 - 17:15 नवीन
आपण मॉडेल आन्सर शोधतोय की प्रत्यक्षातलं? कितीही घरकाम केलं तरी (तीनचार लाख पर अ‍ॅनमच्या योग्यतेचं काम घरी केलं तरी) नोकरी करुन टँजिबल कॅश आणणारी व्यक्ती ती कमावती आणि बाकी सगळे "डिपेंडंट्स" ही क्रूड फॅक्ट आहे. त्यामुळे बायकांनी घरी बसून घरकामाची किंमत होत नाही म्हणत राहण्यापेक्षा नोकरी करावी हे जास्त बरं. आता नोकरी करुनही घरकाम करावंच लागेल असं म्हटलं जाईल आणि ते खरंही आहे. पुरुषांची मानसिकता बदलायला वेळ लागेल. पण निदान सुरु तरी करा प्रयत्न..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिलीयन रायडर

.....

पिलीयन रायडर
Fri, 02/03/2012 - 17:22 नवीन
अहो माझंही अगदी डीट्टो हेच मत आहे... पण पुर्वी इथे मी "एका बाईने नोकरी केल्यास एक घर उद्ध्वस्त होते..कारण बायका टाईम्पास साठी नोकरी करतात आणि त्यामुळे एका गरजु पुरुषाची नोकरी जाते" इथ पर्यंत मते वाचली आहेत.. हे सगळं बदलायला वेळ लागणारे.. खुप खुप वेळ... पण कधी तरी आपल्याला उत्तर मिळेल...!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि

स्वाती२
Fri, 02/03/2012 - 19:24 नवीन
माझे लग्न ठरले तेव्हा मी आणि माझा नवरा दोघेही नोकरी करत होतो. त्याच्या आईवडिलांची सर्व जबाबदारी त्याच्यावर होती. माझ्यावर तेव्हा जबाबदारी नव्हती पण मला भाऊ नाही तेव्हा आई-वडिलांची जबाबदारी भविष्यात माझ्यावर असेल याची आधीच कल्पना दिली होती. लग्नानंतर काही कारणांमूळे मी पूर्णवेळ गृहिणी झाले. आमच्या कुटुंबाच्या गरजा भागवून उरलेल्या पैशात सासरी तसेच माहेरी आम्ही गरजेप्रमाणे आर्थिक मदत केली/करतो . माझ्या आई-वडीलांनी मला वाढवताना मुलगा-मुलगी भेद केला नाही. माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे. त्यामुळे मी नोकरी करत नाही तेव्हा माहेरी मदत कशी करू असा प्रश्न मला कधीच पडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गवि

बधाइ हो....

वपाडाव
Fri, 02/03/2012 - 19:35 नवीन
माझा जोडीदारही समंजस आणि पुरोगामी विचारांचा आहे.
म्हणुनच आपण मिपावर इतक्या शांत व व्यवस्थितपणे, नेटक्या शब्दांत आपले विचार मांडु शकताय...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती२
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा