✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

खुशाली कळवत राहा ...(2)

फ — फिझा, Fri, 02/03/2012 - 10:58
पत्रे तुही लिहिली असशील, शंभरदा .... लेखणीही बदलली असशील, हजारदा ..... लिहिलेले शब्दहि खोडले असतील, कित्येकदा........ पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........ नशिबाशी भांडलीही असशील, अगदी नेटाने ...... मग डोळ्यातले अश्रूही पुसले असशील, स्वच्छ पदराने ....... आणि मग पावसात भिजत चालत असशील, त्याच रस्त्याने ...... पण .......असो....... खुशाली कळवत राहा ........ गहिवरेलेले श्वास घेऊन ठरलेल्या जागी येत असशील, नेहमीसारखेच ...... मग ते हतबल चंद्र -तारे पाहत असशील, नेहमीसारखेच ..... आणि एका हुंदाक्याने स्वतालाच समजावत असशील, नेहमीसारखेच ........ पण ....असो ....खुशाली कळवत राहा ....... नको रागावू तापलेल्या सूर्याला आता , 'जळून' जगतोय तो ..... नको रागावू रुसलेल्या चंद्राला आता, 'हरून' जगतोय तो ...... नको रागावू मनातल्या 'मला' आता, 'मरूनही' जगतोय तो ............. पण ....असो ....खुशाली कळवत राहा .......

Book traversal links for खुशाली कळवत राहा ...(2)

  • ‹ खुशाली कळवत राहा ..!!
  • Up
  • खुशाली कळवत राहा ....... (३) ›

प्रतिक्रिया द्या
2234 वाचन

💬 प्रतिसाद (10)

मस्त

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 02/03/2012 - 11:40 नवीन
नको रागावू तापलेल्या सूर्याला आता , 'जळून' जगतोय तो नको रागावू रुसलेल्या चंद्राला आता, 'हरून' जगतोय तो नको रागावू मनातल्या 'मला' आता, 'मरूनही' जगतोय तो
मस्त!! सुंदर... खुप आवडले.
  • Log in or register to post comments

कविता पुन्हा सुंदर ...

गणेशा
Fri, 02/03/2012 - 12:06 नवीन
कविता पुन्हा सुंदर ... अप्रतिम
  • Log in or register to post comments

व्वा!

नावातकायआहे
Fri, 02/03/2012 - 16:35 नवीन
अप्रतिम!
  • Log in or register to post comments

व्वा व्वा... ही कविता पण

सुहास झेले
Fri, 02/03/2012 - 16:49 नवीन
व्वा व्वा... ही कविता पण आवडली :) :)
  • Log in or register to post comments

शेवटचे

श्रावण मोडक
Fri, 02/03/2012 - 18:24 नवीन
शेवटचे सप्तक गंडले. मूड बनत जातो आणि एकदम उसळी... मग जमीनदोस्त. पहिल्या तीन सप्तकात कविता अगदी सहजी अंगात भिनत जाते. कारण तिथल्या प्रतिमाच तशा साध्या, सरळ आहेत. शेवटच्या सप्तकात एकदम सूर्य-चंद्रावर रागावणं हे मात्र उगाच आणलेल्या नाट्यमयतेसारखंच आहे. गरज नव्हती. पुलेशु.
  • Log in or register to post comments

हे घे एक कडवं...

वपाडाव
Fri, 02/03/2012 - 18:34 नवीन
मिपाकर टोचण देतच असतील, प्रतिसादातुन... मापावर माप काढत असतील, विडंबनातुन... टिंगल टवाळी करत असतील, खरडीतुन... पण... तरीही... तु लिहित रहा...
  • Log in or register to post comments

+१

टुकुल
Sat, 02/04/2012 - 04:21 नवीन
+१ --टुकुल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

खुशाल आळ्वत रहा......

पक पक पक
Sat, 02/04/2012 - 13:12 नवीन
खुशाल आळ्वत रहा......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

सचिन तू खेळत राहा.....

सन्दीप१२३३०
Sat, 02/04/2012 - 20:48 नवीन
विडंबनकारांच्या कलाकृतींचा मान राखून विडंबनाचा मी केलेला एक छोटासा प्रयत्न.. :) सचिन तू खेळत राहा..... फलंदाजी तुही केली असशील शंभरदा.... ब्याट बदलली असशील हजारदा... 'सुपर सेन्चुरी' ची स्वप्ने पाहिली असशील कित्येकदा... :D पण .. असो ... सचिन तू खेळत राहा.. ब्याटींग साठी भांडला असशील, अगदी नेटाने.... मग पीच वरचे दगड बाजूला सारले असशील, बुटाने..... आणि मग सुपर सेन्चुरी करायला धावला असशील, त्याच रस्त्याने.... पण .. असो ... सचिन तू खेळत राहा.. सुपर सेन्चुरी झाली नाही कि प्याविलिअन मध्ये परतत असशील नेहमीसारखेच........ मग जुन्या इनिंग्स चे हायलाईट्स पाहत असशील नेहमीसारखेच....... आणि पुढच्या म्याच मध्ये 'सुपर सेन्चुरी' होईल असे स्वताला समजावत असशील नेहमीसारखेच....... :P पण .. असो ... सचिन तू खेळत राहा.. नको रागावू तापलेल्या धोनीवर आता , तुझ्या रेकॉर्ड्स कडे "जळून" बघतोय तो........ नको रागावू रुसलेल्या फ्यान वर आता, क्रिकेट ला टाळून जगतोय तो........ नको रागावू मनातल्या क्रिकेटरला आता, रिटायरमेंट जवळ आली असं सांगतोय तो.. पण .. असो ... सचिन तू खेळत राहा..
  • Log in or register to post comments

कविता ( भाग १ आणि २ ) खूप

इन्दुसुता
Sun, 02/05/2012 - 09:09 नवीन
कविता ( भाग १ आणि २ ) खूप आवडली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा