Skip to main content

(माउस)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 24/07/2008 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे.

वाचने 5800
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

मस्त विडंबन आवडले -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

वा वा बेसनलाडू, क्या बात है!! उत्तम विडंबन. सही. आवडले. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

"लाडकी बाहुली.. होती..माझी एक... मिळणार कधी ना..शोधुन दुसर्‍या लाख." या ओळीन्ची आठवण झाली.. बाकी....गणपतीचा माऊस्....जास्त आवडला....

बेलाशेठ, माउसा चे वेगवेगळे प्रकार छान गुंफले आहेत.. विडंबन आवडले.. चालू द्या.. (निवृत्त बोका)केशवसुमार स्वगतः केसुपंथाची पताका बेलामहाराज सॅनहोजेकर सांभाळतील वाटल नव्हतं O:)

घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! छानच! "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt

अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! वा!

वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा पाउस. काही ठिकाणी जमिनीवरचे खड्डे बुजवण्याचे काम केले आहे. तुमच्या डोक्यात बाकी मज्जा आहे बॉ. आवडले. - सर्किट

सह्हिये एकदम.. घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! हे मस्त. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/