झिंग थिंग..!!
ब्रँड नॉस्टाल्जिया ही एक मजेशीर चीज आहे..
आज अशाच काही ब्रँडमित्रांची आठवण झाली ..
पहिला गोल्ड स्पॉट ..झिंग थिंग..!!
संत्र्याची मिरमिरीत मस्त चव आत्ताही जिभेवर आली..
हाँ हुजूर.. वो मेरा दीवाना जरूर.. !!
मेरा उतना दीवाना जितने दोनों है दीवाने..
गोल्ड स्पॉट.. दीवानों का मज़ा..गोल्ड स्पॉट..!!
कोकाकोलानं थम्स अप् सोबत हाही विकत घेतला आणि ठार केला..
लिम्कासुद्धा फोटोत गेला होता.. पण त्याचं अवतारकार्य बाकी होतं..
त्याचा पुनर्जन्म झाला..
आय ड्रिंक लिम्का बिकॉज आय लाईक इट.. !!
ही टॅगलाइन खूप गाजली.. खरं तर ग्रेट क्रिएटिव्ह काही नसतानाही..
लाईम अँड लेमोनी लिम्का.. ही जुनी लाइन तर आजही नव्यानं जागी झाली आहे..
"ये नोकझोंक शरारतें" वाल्या फ्रेश अॅडसोबत तो परत आलाय..!!
मला लिम्का "प्यायला" फार आवडायचा नाही. पण त्याच्या बुचाच्या आत रबरी स्टिकर मिळायचा..डिस्ने चा..
आई बाबांसोबत कुठल्या भारी हॉटेलात गेलो तरी मी भिकारडेपणासदृश वर्तन करून, तिथल्या स्टाफकडे फेकलेली लिम्काची बुचं मागायचो..मी लाज सोडायचो आणि आई बाबाना लाज आणायचो..
कधी चुकून कोल्ड्रिंक पिण्याची ऑफर मोठ्यांकडून झालीच तर लिम्का मागवायचा...दोन घोट पिऊन निर्लज्जपणे टाकून द्यायचा (म्हणजे बिचार्या आईला प्यायला लावायचा..आई हे देवाचं रूप..!!)
..आणि (मुद्द्याचं..!!) बूच मिळवायचं..
नजर भंगारवाल्यासारखी सदैव होटेलातल्या खाली पडलेल्या बुचांच्या ढिगावर..लाल बुचात स्टिकर नसतो.. हिरव्या बुचातच असतो हे मी लवकरच शोधून काढलं होतं.. माझी बोटं आणि नखं पत्र्याची बुचं खरवडून खरवडून कुरतडल्यागत दिसायची..
डोनाल्ड डक मला जाम आवडायचा...मऊ मऊ रबरावर छापलेले रंगीत मिकी, डोनाल्ड, स्क्रूज, लुई, ह्युई, ड्युई..त्यांची मऊ थप्पी बोटांत दाबून भाव मारायचा मित्रांमधे.... त्या स्टिकर्सची एक्सचेंज व्हैल्यूही खूप होती..चार पाच स्टिकर्सच्या "बदली" एखादं मॅग्नेट (त्या वेळच्या पोरांच्या भाषेत "लवचिंबक") सुद्धा मिळू शकायचं..कोण म्हणतं की वस्तुविनिमय फार जुना झाला.. आमच्या शाळेत तर त्याचं "कमोडिटी एक्सचेंज" होतं..
अमुक एक इतके स्टिकर्स जमा केले की काहीतरी बक्षीस मिळतं अशीही एक बोलवा होती.. पण मी कधीच माझे स्टिकर द्यायला तयार झालो नसतो..
............
कॅडबरीजचं "डबल डेकर" हे माझं अगदी पहिलं प्रेम..थोडं कुरकुरीत..खुटखुटीत आणि बरंच बरंच टेस्टी..हे जर कोणाला आठवत असेल तर मला खूप ग्वाड वाटेल.
..त्याचं जाणं मला खूप धक्का देऊन गेलं..मिलिंद बोकिलांच्या "शाळा" मधल्या शिरोडकरच्या जाण्यासारखं..
पण आयुष्य पुढं जात राहातं.. (.. फिर हमारे मोहल्ले में हेमा आयी...!!!)
..तसंच मग कधीतरी कॅम्पको चॉकलेट आलं.. कॅडबरीजच्या जगात काही नाही तरी फक्त एक चेंज म्हणून ते सॉलिड आवडलं..
कुठे गेलं ते काय माहिती..शोधतोय शोधतोय.. मग काही वर्षांनी नाद सोडून दिला..
.....
डबल कोला.. हे एक पेय .. आणि रोला कोला नावाच्या गोळ्या..
रोला कोला..रोला कोला..इसमें कोला का मजा अलबेला..!! रोला कोला...कोला का गोला.. !!
बघा अजूनही जिंगल आठवतेय मला...
साल्या या जिंगल्स ही गायब झाल्या..नवीन विजुअल अॅड्सच्या तंत्रामधे..
...
नोगा जाम.. मस्ती भरा स्वाद खरा..
...
लाईफबॉय है जहां, तंदुरुस्ती है वहां..
...
माल्टोवा मम..
...
दातों को सडने से बचाता है कोलगेट..
पेस्ट आहे पण जिंगल गेली.
...
सुधा सुधा सॉफ्ट ड्रिंक काँन्सेन्ट्रेट
अड़तीस गिलास एक पैकेट से बने..
तेरा तरह के स्वाद नये नये..
...
शार्प नावाचं पेन...रेनोल्ड्स ०.४५ फाईन कार्ब्युअर ..
न्युट्रामूल..अंकल चिप्स..(बोले मेरे लिप्स..आय लव्ह अंकल चिप्स..).लॅक्टो किंग..
"O.K. च्युईंग गम".."डबल बबल गम"..
एक्स्ट्राँग गुलाबी पेपरमिंट..पॉपिन्स.. रावळगाव..
हे सर्व ब्रँड एकतर संपले..किंवा त्यांचा चार्म तरी गेला..
अनब्रँडेड चिजा तर मोजण्यापलिकडच्या..
मनोज पान शॉपच्या बरणीतल्या लाल गोळ्या..किंवा पांढर्या दूधगोळ्या..
लिमलेट्च्या संत्र्याच्या फोडीच्या आकाराच्या गोळ्या (५ पैसे..!!)..
चंदा आईस्क्रीम नावाच्या ढकलगाडीतली गार गार लाल कांडी..
कालाखट्टावाला पेप्सीकोला..खारट बर्फाळ प्लॅस्टिकच्या पिशवीचं टोक दातांनी तोडून गार गोड थेंब जिभेवर चोखायचे..
प्रत्येक brand कड़े स्वत:चं काही ख़ास होतं..आहे..!!
प्रत्येक brand कड़े स्वत:ची काही बात होती.. आहे..!!
आणि आपल्यातही ...
कुछ ख़ास है हम सभी में..
कुछ बात है हम सभी में..
बात है..ख़ास है..
क्या स्वाद है जिन्दगी में..!!
...
प्रतिक्रिया
लै भारी धागा!
मला वाटत ती रिफाईन्ड तेलाची
जाइ... यु आर राइट...
सनड्रॉपच असाव बहुतेक
यप्प !!
अरे
हॅप्पी डेज आर हिअर अगेन
झकास!!
क ल्ला....
अरे वा! एकदम खजिनाच की!
भारी हां खेडूतजी. ग्रेट!
काही आद्य सिरियल्स...
ह्या काही आठवलेल्या जाहिराती :) :)
छान लेख!
एक थ्रील नामक सॉफ्ट्ड्रींकची अॅड होती.
चॉकलेट चे रॅपर्स (चॉकलेट ची चांदी) आणि माला डी
Pagination