Skip to main content

सावधान जगबुडी येत आहे.

लेखक भिकापाटील यांनी रविवार, 29/01/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हाय फ्रेंडस् कसे आहात. जगातील एका प्राचीन माया संस्कृतीने सन २०१२ ला जगबुडी होणार आहे असे भाकीत वर्तवले आहे. तारीख आहे २१ डिसेंबर २०१२. माया संस्कृतीचे कॅलेंडरच मुळी २०१२ ला संपते. त्यामुळे जगबुडी निश्चित होणार असे म्ह्टले आहे. मला तरी वाटते. ह्या विश्वाचा अंत जव:ळ आला आहे. आता खाउन्पिउन घ्या. मजा करा. जास्त तंगीत जिवन भार वाहू नका. ओन्ली ऐष. कसें. दररोज तुळशीचे दरशन घ्या. विष्णूचा जप घ्यान करा. शक्यतो पिंपळाच्या झाडाजवळ रहा. प्रलयकाळात पटकन झाडावर चंगून बसा मग तुम्ही वाचलेच म्हणुन समजा. आता टेंशन विसरुन जा. श्री कृष्णाचा अवतार परत होणार आहे. कलियुगाला ६४०००० वर्षे डिसेंबर मधे पूर्‍ण होत आहेत. तसे आपन भाग्यवान आहोत. आपल्याला प्रलय पहायला भेटेल. ह्यात सर्वच जिवांचा नायनाट होईल असेही नाही. जे पुण्यवान आत्मे असतीन ते जरुर वाचतील. मिपावर अनेक पुण्यवंत असल्यामुळे ते नक्कीच वाचतील असी मला आषा आहे. तुमचे मत जाणुन घ्यायला आवडेल. ------------------------------------------ तळटीपः ०१. विषय गंभीर आहे. काळजीपुर्वक हाताळा. हसा खेळा पण शिस्त पाळा. ०२. तुमच्या बायकोचे संशयाचे भूत उतरले का. या नि अशा खवचट प्रशनांना बगल दिली जाईल. तो विशय संपला आहे. मार्गदशनः श्री स्पा काका. रुन निरदेशः श्री परा काका.

वाचने 22201
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

In reply to by स्वैर परी

आपल्याला प्रलय पहायला भेटेल. अहो त्यांच्या घरी प्रलय येउन गेला सुद्धा.....खाली वाचा..:) ०२. तुमच्या बायकोचे संशयाचे भूत उतरले का. या नि अशा खवचट प्रशनांना बगल दिली जाईल. तो विशय संपला आहे. :bigsmile: :bigsmile: :bigsmile:

श्री कृष्णाचा अवतार परत होणार आहे.
अहो भगवान श्रीकृष्ण सध्या भूतलावर वावरत आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही का? हे विसरलात का?

In reply to by पुण्याचे वटवाघूळ

अहो भगवान श्रीकृष्ण सध्या भूतलावर वावरत आहेत हे तुम्हाला ठाऊक नाही का? :) काय चेष्टा करता ? माहीत नाही. अधिक माहीती द्या.

In reply to by भिकापाटील

काय चेष्टा करता ? माहीत नाही. अधिक माहीती द्या. मला तरी वाटते. ह्या विश्वाचा अंत जव:ळ आला आहे. आता खाउन्पिउन घ्या. मजा करा. जास्त तंगीत जिवन भार वाहू नका. ओन्ली ऐष. कसें. दररोज तुळशीचे दरशन घ्या. विष्णूचा जप घ्यान करा. शक्यतो पिंपळाच्या झाडाजवळ रहा. प्रलयकाळात पटकन झाडावर चंगून बसा मग तुम्ही वाचलेच म्हणुन समजा. आता टेंशन विसरुन जा. अहो तुम्हि स्वतःच की ! अधुनिक भग्वत् गिता सांगीतली कि वर...:D :

In reply to by भिकापाटील

काय चेष्टा करता ? माहीत नाही. अधिक माहीती द्या.
नाही. मला चेष्टा वगैरे करता येत नाही. मूळ प्रतिसादात दिलेली लिंक उघडा म्हणजे मला काय म्हणायचे ते तुम्हाला कळेल.

ह्याच साधर्म्य शास्त्राने जर कालनिर्णय ,महलक्ष्मी इत्यादी कॅलेंडर वाल्यांचे जर दिवाळे निघून कॅलेंडर निघायची बंद झाली तरीही जगबुडी होणार का?? पण तुम्हाला जगबुडी होणार त्यापेक्ष्या २०१२ मध्ये "ऐश" कार्नायचे निमित्त मिळाले असे दिसत्ये ...खरे कि नाही??? :P

>>माया संस्कृतीचे कॅलेंडरच मुळी २०१२ ला संपते. काही नाही हो...त्यांना क्यालेंडर छापायला पेपर मिळाला नसेल. फार विचार करु नका. झालीच जगबुडी तर मला फक्त एकच प्रश्न पडलाय शेवटी जाईल त्याला अग्नी कोण देणार ( जर शेवटी उरलेला हिंदू असेल तर !!).

In reply to by सूड

झालीच जगबुडी तर मला फक्त एकच प्रश्न पडलाय शेवटी जाईल त्याला अग्नी कोण देणार ( जर शेवटी उरलेला हिंदू असेल तर !!). सुड...... सगळेच नाहीत मरणार. साधारणपणे २५% पुण्यातमे जगनार आहेत.

In reply to by सूड

पुण्यातले २५ % म्हण्जे नदीपलिकडचे की अलिकडचे ..? २५ % म्हण्जे फक्त सदाशिव पेठी..... कारण तेच स्वतःला पुण्यात्मे समजतात....:D

In reply to by पक पक पक

2५ % म्हण्जे फक्त सदाशिव पेठी..... कारण तेच स्वतःला पुण्यात्मे समजतात.. बा झो ............. खपल्या गेलो आहे आणि औव भिका पाटील आम्ही कधी तुम्हाला मार्गदर्शन केले? का एकलव्याप्रमाणे आमचा मातीचा ID बनवून त्यापासून प्रेरणा घेतली :D

In reply to by सूड

पुण्यातले २५ % म्हण्जे नदीपलिकडचे की अलिकडचे ?
फक्त नदीला परिक्रमा करणारे वाचणार आहेत. चला तयारीला लागा.. परिक्रमेच्या म्हणतोय.

In reply to by स्पा

म्हणजे दोन हात लांबीची म्हणा की तुमची प्रदक्षिणा. ते नो पार्किंगच्या बोर्डसारखं या अंगाला एक हात, त्या अंगाला एक हात नि मधे मिठी.... नदी हो तुमची. :)

In reply to by रमताराम

महत्त्वाच्या गोष्टींची अशी केलेली चेष्टा पाहून एक मिपाकर म्हणून शरम वाटली!

ह्या लेखाची लिंक दहा जणांना पाठवून द्या, तुम्हाला नायजेरीयन लॉटरी लागेल. हि लिंक २० जणांना फॉरवर्ड केली तर मलेशीया, बँकॉक ला जाण्यासाठी अन थाई मसाजसाठी सॉन्सरर मिळेल. खडकमाळेगावचे सायबू पाटिल यांनी ह्या लेखाची प्रिंटआउट काढून सकाळी सकाळी घातली...बंबात, नंतर ते ण्याला गेले असता 'कोरड्या मारूतीजवळचा वाडा' असा पत्ता एका सायकल दुरूस्त करणार्‍या व मुळव्याधीचे औषध देणार्‍याला विचारला असता त्याने पाच रुपये घेतले. ह्या लेखाची लिंक मालती गोरे यांनी पाच सवाष्णींना दिली असता त्यांच्या नातवाचे अ‍ॅडमिशन सेंट झेवियर्स मध्ये विदाऊट डोनेशन झाले. हा लेख ज्वालासिंग तेजपाल यांनी डिलीट करून अपमान केल्याने त्यांना ट्रॅफीक हवालदाराने तडजोड रक्कम रु. २०/- नाकारून रू. १०० चा दंड केला व त्याची पावतीही दिली. अवांतर: >>>विषय गंभीर आहे. काळजीपुर्वक हाताळा आपल्या मुळ लेखात वरीलपैकी काहीही आढळले नाही.

In reply to by पाषाणभेद

धाग्यावर प्रतिक्रिया देणे मला आवडत नसल्याने येथे आभार मानत आहे. बाप रे !! खरच जगबुडी होणार की काय...? म्हणुनच पाभे सुद्धा प्रतिक्रिया देउ लागले ..?

माया संस्कृतीच्या क्यालेंडरमधे दोन हजार बाराच्या पुढे तारखा नसल्यामुळे त्यांनी अशी पिंक मारली असावी. पण, माझं असं मत आहे की, गुरु, चंद्र आणि शुक्र या ग्रहांची जेव्हा युती होते तेव्हा ग्रहांच्या अशा कृत्यामुळे सॉरी अशा नैसर्गिक कृतीमुळे किंवा वृत्तीमुळे मोबाईल जसा व्हायब्रेट मोडवर थरथर करतो तशी पृथ्वी थरथर करु लागेल आणि त्यामुळे पृथ्वीवर 'उथल-पुथल' माजणार आहे. ग्रहांची अशी युती नेहमीच होते पण कोणत्या तरी युतीच्या वेळेस असं घडु शकतं त्यामुळे भुकंप, त्सुनामी, काळा पाऊस, हिरवा वारा, भगवी माती, काळाकुट्ट अंधार, जमिनीतून जागोजागी लाव्हा बाहेर पडेल, तेलविहीरींना आगी लागतील मग मोठ्या कष्टानं शास्त्रज्ञ आणि धार्मिक लोकांच्या कृत्यामुळे पृथ्वीचा 'व्हायब्रेट मोड' जाऊन 'जनरल मोड' येईल. पुन्हा एकदा अदिम अवस्थेपासून ते उच्चकोटीच्या प्रगतीच्या अवस्थेपर्यंतचा मानवाचा प्रवास पुन्हा सुरु होईल. पुन्हा मिपावर असे जगबुडीचे धागे येतील तेव्हा मात्र अशा धाग्यांची धागेबुडी होईल. च्यायला, आपल्याला एक थापाड्या विभाग सुरु झाला पाहिजे. संध्यानंदच्या बातम्याप्रमाणे असलेले धागे-प्रतिसाद तिकडे टाकत जाऊ, काय म्हणता ? -दिलीप बिरुटे (थापाड्या ज्योतिषि)

आपल्याला एक थापाड्या विभाग सुरु झाला पाहिजे. डो साहेब्..ह्या थापा नाहीत. सगळे ग्रह एका सरळ रेषेत आल्यास असे संभवते.

In reply to by भिकापाटील

असं काहीही होणार नाही. आज आणि ३१ जानेवारीला तुमच्या माझ्या सुदैवाने असे सुंदर दृष्य आकाशात दिसणार आहे, तेव्हा त्याचा मस्त आनंद घ्या. नायस्त्रेदमस की नायट्रेडेमसच्या पुस्तकात अशा ग्रहांच्या गप्पा वाचलेल्या होत्या त्यामुळे अंदाजपंचे तसं झालं तर काय होईल म्हणून मी तरी थापा मारल्या आहेत. -दिलीप बिरुटे

In reply to by भिकापाटील

प्रतिक्रिया: * हा लेख विनोद या विभागात लिहिला गेला नसल्याने लेखक विषयाबाबत गंभीर आहे असं गॄहित धरतो. >>डो साहेब्..ह्या थापा नाहीत. सगळे ग्रह एका सरळ रेषेत आल्यास असे संभवते. शंभर टक्के थाप! सुर्य आणी चंद्र या दोघांव्यतिरिक्त कोणतीही इतर खगोलीय वस्तू पॄथ्वीवर न जाणवण्याइतका प्रभाव टाकतात. चंद्राचा प्रभाव एक मानल्यास इतर ग्रहांचा परिणाम खालील तक्त्यात देत आहे. Planet Gravity (Moon=1) Mercury 0.00008 Venus 0.006 Mars 0.0002 Jupiter 0.01 Saturn 0.0007 Uranus 0.00002 Neptune 0.00001 Pluto 0.0000000006 Moon 1.0 प्रत्यक्ष भरती ओहोटीवर होणारा परिणाम यापेक्षा कमी आहे. अधीक माहीती यथे वाचता येईल.

In reply to by रम्या

वर दिलेली माहिती ही चंद्राचे गुरुत्त्वाकर्षण १ धरुन पृथ्वीवर त्या त्या ग्रहांचे होणारे परिणाम तुलनात्मकरित्या दाखवले आहेत. जगबुडीच्या फिलॉसॉफीला पुष्टी देताना आपल्याला सूर्य व इतर ग्रह यांच्यामधे पॄथ्वी आली किंवा या रस्सीखेचीमुळे सूर्यावर प्रमाणाबाहेर सौरज्वाळा निर्माण होतील का नाही? याचा शोध घेण्यासाठी हे गुरुत्त्वीय बल प्रामुख्याने विचारात घेतले जाते. अलिकडेच सूर्यावर एक मोठी सौरज्वाळा निर्माण झाली होती. त्यामुळे वायरलेस कम्युनिकेशन्स मध्ये निर्माण झालेले अडथळे काही जणांना जाणवले असतील किंवा नसतीलही. पण यामुळे उपग्रहांच्या संपर्कप्रणालीत व्यत्यय आला होता. पुढील तक्क्त्यावरुन पृथ्वीचे गुरुत्वीय बल १ धरुन तक्ता दाखवला आहे. तरी सूर्याच्या तुलनेत या ग्रहांची एकत्र शक्ती किती वाढेल हा मुख्य मंथनाचा विषय आहे, ज्यावर जगबुडीची (टीआरपी) बातमी आधारीत आहे मी सूर्याच्या तुलनेत इतर ग्रहांच्या गुरुत्त्वाकर्षणाची माहिती मिळवण्याच्या प्रयत्नात आहेच. मिळाली की ती देखील देईन, तूर्तास इतके पुरे :)

In reply to by सागर

२७ जानेवारीला आलेल्या सौरज्वाळेचे हे चित्र बघितल्यावर लक्षात येईल की यावेळची सौरज्वाळा केवढी मोठी होती. सौजन्य : नासा

In reply to by सागर

पुढील तक्त्यावरुन सूर्य व इतर ग्रह यांच्यातील गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीची कल्पना यावी. (येथे गुरुत्त्वीय बलाचे त्वरण (एक्सलेरेशन) विचारात घेऊन पुढील मांडणी आहे.) येथे सूर्याची गुरुत्त्वाकर्षणशक्ती अदमासे २७४ आहे तर गुरु व शनि या मोठ्या ग्रहांची शक्ती अनुक्रमाने २५.९५ आणि ११.०८ अशी आहे या दोन ग्रहांच्या जोडीला इतरही ग्रह आहेतच. तेव्हा २१ डिसेंबर २०१२ या दिवसाचे आकाश कसे असेल ते पाहूयात. म्हणजे जगबुडी का होईल याचे शास्त्रीय कारण (जे जगबुडीचे समर्थक देत आहेत) कळेल वरील आकृतीवरुन आपल्याला लक्षात येते की सूर्याच्या एका बाजूला - बुध, शुक्र आणि शनि हे ३ ग्रह विरुद्ध बाजूला - पृथ्वी व गुरु व एका बाजूने मंगळ, युरेनस, नेपच्यून व प्लुटो या लांबवर पसरलेल्या ग्रहांची शक्ती अशी ही मांडणी आहे. तक्त्याचा आधार घेतला तर आपल्याला असे दिसते की एका बाजूला गुरुत्त्वीय बल हे = ३.५९ + ८.८७ + ११.०८ = २३.५४ इतके होते त्याच्या विरुद्ध बाजूला ९.८१ + २५.९५ = ३५.७६ असे आहे. इतर बल विखुरलेले असल्याने त्याचा विचार करण्याची गरज नाही. २७४.१३ या सूर्याच्या गुरुत्त्वीय बलाच्या त्वरणाच्या तुलनेत इतर ग्रहांच्या गुरुत्त्वीय बलाचे त्वरण (अ‍ॅक्सलेरेशन) हे अगदी अल्पसे असले तरी दुर्लक्ष करावे असे नाहिये. म्हणजे एका बाजूने २३.५४ एवढे बल व दुसर्‍या बाजूने ३५.७६ एवढे बल सूर्यावरील द्रव्य आपल्याकडे खेचायचा प्रयत्न करणार आहे. अशी ही रस्सीखेच चालू असताना जवळचे ग्रह नेहमीपेक्षा जास्त तापमानाचा अनुभव घेतील. पण पृथ्वीवरच सजीवसॄष्टी असल्यामुळे व सूर्याच्या निकट असल्यामुळे सूर्यावर होणार्‍या थोड्याशा जास्त परिणामाची झळ आपल्याला पोहोचेल. याचीच परिणती म्हणून सूर्यावर अधिक मोठी सौरवादळे व सौरज्वाळा निर्माण होतील व पृथ्वीवरील ध्रुवीय बर्फ विरघळून जलप्रलय येण्यात होईल. अशी ही ढोबळ कल्पना आहे. उत्पत्ती-स्थिती-लय हा कोणत्याही घटनाक्रमाचा अविभाज्य भाग आहे. तरी निसर्ग स्वतः निर्माण केलेल्या सॄष्टीची काळजी घेण्यास समर्थ आहे असे माझे वैयक्तीक मत आहे. बाकीचे ज्याने त्याने वैयक्तीक मत ठरवावे :)

In reply to by प्रचेतस

धन्यवाद वल्ली मित्रा, थोडक्यात सांगायचे तर वैज्ञानिक आधार घेऊन भाकीते करणारे आपली पो़ळी भाजून घेत आहेत. :) गॅले़क्टीक अलाईनमेंट हे अजून १ कारण ते देत आहेत. यापेक्षा कठीण स्थिती या आधी येऊन गेल्या आहेत. पण पृथ्वीवर अमर्याद प्रमाणात वाढणारे कार्बन उत्सर्जन (आणि अमर्याद वृक्षतोड) हा घटक सर्वात चिंतेचा विषय आहे. ज्यामुळे सूर्यावरील हे बदल पृथ्वीला किती मारक ठरतात हे पाहणे मजेशीर ठरेल.

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद बिरुटे सर या विषयावर सर्व शास्त्रीय बाबींचा अभ्यास सुरु आहे. तो झाला की एक लेख देईन यावर. तूर्तास थांबतो

In reply to by सागर

वरील नकाशातील २१ डिसेंबर २०१२ या दिवशीची ग्रहांची स्थिती, पृथ्वी हा फलंदाज आहे असे समजून क्रिक्रेटच्या भाषेत समजावून द्यावी.

In reply to by सागर

दिलेले गुरुत्वीय त्वरण ते त्या त्या ग्रहाच्या भूपृष्ठावरील वस्तूंसाठी आहे. अवकाशातील नाही. उदा. पृथ्वीचे वस्तुमान = ६ * १० ^ २४ पृथ्वीची त्रिज्या = ६४०० कि.मी. = ६.४ * १० ^ ६ मी. न्यूटन चा गुरुत्वीय स्थिरांक(G) = ६.६७ * १० ^ -११ वस्तूवर कार्य करणारे गुरुत्वीय त्वरण = GM/r^2 जर पृथ्वीच्या पृष्ठावरील वस्तूवर कार्य करणारे त्वरण काढायचे असेल तर, M = पृथ्वीचे वस्तुमान r = पृथ्वीची त्रिज्या म्हणून त्वरणाची किंमत येते ९.८ मी/से ^ २ परंतु जेव्हा सूर्याच्या पृष्ठावर पृथ्वीमुळे कार्य करणारे त्वरण काढायचे आहे तेव्हा r ची किंमत हि बदलेल. या ठिकाणी ती असेल, r = १.४९६ * १० ^ ११ मी. त्यामुळे सूर्याच्या पृष्ठावरील कणासाठी पृथ्वीमुळे कार्य करणाऱ्या गुरुत्वीय त्वरणाची किंमत येते, १.७८८ * १० ^ -८ मी/से^२ किंवा १८० मायक्रोमीटर/से ^ २ असेच बाकी ग्रहांसाठी पण गणित करा आणि सुधारित प्रतिक्रिया द्या!

In reply to by sagarpdy

आकडेमोड कदाचित चुकीची असू शकेल. (ज्यावर मी नंतर विचार करेन) पण कोष्टकाच्या सुरुवातीला जे गुरुत्त्वीय बल दिले आहे त्याचा आणि त्वरणाचा रेशो तोच आहे. प्रमाण तेच असेल तर गुरुत्त्वाकर्षणाच्या रस्सीखेचीची टक्केवारी तीच राहील. आकडे वेगळे असू शकतील, पण सांगायचा मुद्दा हा होता की दोन्ही बाजूने होणार्‍या ग्रहांच्या गुरुत्त्वाकर्षण शक्तीच्या जोरावर हे गॄहीतक आधारित आहे.

In reply to by सागर

कोष्टक दिले गेले आहे ते बरोबरच आहे, पण त्यातील किमतींचा वापर हाताशी असलेल्या समस्येत वापरता येणार नाहीत. संपूर्ण गणित करायला अधिक वेळ व माहिती लागेल. अर्थात आत्ता चालू आहे तसेच 'जगबुडी होणार - जगबुडी होणार' असे २००० सालच्या मे मध्येही चालू होते. त्या वेळी हि कारण असेच सर्व ग्रहांचे एकूण गुरुत्वाकर्षण हेच दिले होते. त्या वेळची ग्रहांची स्थिती अजूनच भयंकर होती. (येथे बघा.) आमचे एक चुलत भाऊ , ज्यांनी तेव्हा १० वी ची परीक्षा दिली होती - ते निकाल लागणार नाही म्हणून खूप खुश होते. पण काही एक झालं नाही. १० वी चा निकाल लागला पण बाकी कोणाचाही निक्काल काही लागला नाही. फुकट टिंग्या मारतात लोक , आणि आपण ऐकतो.

In reply to by sagarpdy

संपूर्ण गणित करायला अधिक वेळ व माहिती लागेल. याबद्दल सहमत आहे. २००० साली जी ग्रहस्थिती होती त्यावेळी पृथ्वी नेमकी सूर्याच्या विरुद्ध बाजूला होती. कारण त्यावेळी २ खंदे फलंदाज गुरु आणि शनि हे एका बाजूला होते. सूर्याच्या पलिकडे असल्यामुळे पृथ्वीला त्याची झळ पोहोचली नाही असा हा प्रवाद आहे. पण यावेळी गुरु महाराजांच्या छायेत पृथ्वी आहे, त्यामुळे लोक जास्त चिंता करत आहेत. पण काही एक झालं नाही. १० वी चा निकाल लागला पण बाकी कोणाचाही निक्काल काही लागला नाही. =)) सहमत आहे. त्यावेळी खूप चर्चा झाल्या होत्या. पण काहीच झाले नाही. असो, तूर्तास थांबतो. अभ्यास झाला की एक लेख देईन मग त्यावेळी सविस्तर चर्चा करुयात :)

In reply to by सागर

@ सागर या अभ्यासपुर्ण माहीतीबद्द्ल खुप खुप धन्यवाद :) काही न्युज च्यानेल वाले साल्ले हा विषय इतका अव्वाच्या सव्वा करुन मान्ड्त आहे की मला रात्रीचे फार्फार भयन्कर स्वप्न पड्तात हो ;) जगबुडी होतेय म्हनून ,अन मी अजुन स्विमिन्गपण नै शिकले ,त्यामुळे गटान्गळ्या खात आहे असे काहीसे ;) (क्रु.ह्.घ्या.:) )

In reply to by पियुशा

धन्यवाद पियुशा, जगबुडी होईल तेव्हा होईल, पण त्यात तेच वाचू शकतील ज्यांची नशीबाची लॉटरी जोरावर असेल ;) तेव्हा स्विमिंग येत नसल्याने फारसे बिघडणार नाही, तेव्हा निश्चिंत असा. बाकी माझा शास्त्रिय अंगांचा अभ्यास चालूच आहे. तो झाला की त्यावर सविस्तर उहापोह करुयात. कारण २१ डिसेंबर २०१२ च्या तुलनेत ग्रहांच्या त्याहीपेक्षा क्लीष्ट युत्या महायुत्या झाल्या आहेत. त्याने काही झाले नाही तर यावेळीही काही होणार नाही. डाटा गो़ळा करणे हेच थोडे किचकट आणि वेळखाऊ काम आहे. तो जमा झाला की जगबुडी होणार नाही (की होणार) यावर एक लेख नक्की :) गोष्टी हलक्या कशा घ्यायचे ते मिपावरच शिकलो ;) सो फिकर नॉट अवांतरः जगबुडीची भयंकर स्वप्ने पाहण्यापेक्षा त्या जगबुडीतून आपणच वाचलो आहोत अशी सुखद स्वप्ने पहा ;)

In reply to by सागर

@ सागरजी तुम्ही कसे ऑळ्खले की मी पुण्यात्मा आहे ते ;) जगबुडीत बुडणार नै ते ? ;) चला आता स्विमिन्ग शिकायची काही एक गरज नै ;) तुमच्या शोधकार्यला शुभेच्छा :)

In reply to by पियुशा

तुम्ही कसे ऑळ्खले की मी पुण्यात्मा आहे ते त्याचे काय आहे पियुशा... जगबुडी व्हनार की नाय त्येचा अभ्यास चालू हाय नव्हं... तेव्हा अधी मधी कदी बी असे दृष्टान्त व्हत्यात की कोन वाचनार आहे त्यांच्याबद्दल... ;) सध्यातरी असे वाटतंय की जगबुडी वगैरे काही नाही होत ... बाकी अभ्यासानंतर

In reply to by सागर

तितकेसे कठिण नाही - हा तक्ता थोडा अधिक उपयोगी पडेल : (दुवा) त्यानंतर न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाच्या समीकरणाने गणित करता येईल. ग्रहाचे वस्तुमान आणि सूर्यापासून अंतर बघता गुरूमुळे सूर्याच्या प्रतलावर सर्वाधिक आकर्षण असते - ज्या दिवशी सर्व ग्रह वेगवेगळ्या दिशेला आहेत, त्या दिवशी प्रतलावर (ग्रहांमुळे) सर्वाधिक आकर्षण हेच असेल. (नेहमीचे सर्वाधिक आकर्षण "न" - गणित सोपे आहे. "न"=सूर्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या ११.७पट ज्या दिवशी सर्व ग्रह सूर्याच्या एका दिशेला असतील त्या दिवशी सर्व ग्रहांच्या आकर्षणाची बेरीज सूर्याच्या प्रतलाच्या त्या दिशेला जाणवेल. (सर्व ग्रहांच्या आकर्षकाची बेरीज = ब) - गणित सोपे आहे. ब =सूर्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या १५.८पट तर ब/न गुणोत्तर किती? ब/न = १.३५... म्हणजे साधारण नेहमीच्या आकर्षणापेक्षा साधारणपणे ३५% अधिक. ५ मे २००० ला पृथ्वी सोडून बाकी सर्व ग्रह सूर्याच्या एका बाजूला होते. (दुवा. दुव्यावर टायडल गणिते केलेली आहेत, ती सुद्धा बघण्यालायक आहेत. असो...) २/५/२००० दिवशी त्या बाजूच्या आकर्षणांची बेरीज किती होती? सूर्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या १४.८पट, म्हणजे न*१.२६ इतकी होती. - - - सौर ज्वाळा विशेषकरून गुरू ग्रहाच्या दिशेने निघत नाहीत. (नुकत्याच उफाळलेल्या सौरज्वाळेचे चित्र दुसर्‍या प्रतिसादात कोणीतरी दिलेले आहे) त्यामुळे "न" हे आकर्षण ज्वाळांना आकर्षित करून घेण्याइतपत नाही, इतपत तरी आपल्याला ठाऊक आहे. ५ मे २००० सालची परिस्थिती बघितली, तर २६% व्याज आकर्षण असले, तरी काही विशेष ज्वाला-उत्पात होत नाही. मग ३५% व्याजासकट "न" पुरेसे असेल, असे वाटण्याकरिता फारशी चालना नाही.

In reply to by सागर

मला वाटते याच जिओमॅग्नेटीक स्टॉर्ममुळे दिसलेल्या स्विडनमधील प्रभेचे हे दृश्य नासाच्या संस्थळावर ठेवले आहे. (Image Courtesy of Peter Rosén.)

@जे पुण्यवान आत्मे असतीन ते जरुर वाचतील. >>> आयला मंजे आम्चं काय..?आंम्ही तर अत्रुप्त आहोत... त्यामुळे असं काहितरी होइल असं वाटू लागलय... जाम घाबरलोय आंम्ही अता...

In reply to by पक पक पक

पाषाणभेद'जी... ________/\________ =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) भिकापाटील.. तुमचा डुआय डी "बन्याबापू" हा आहे का? ;) ;) आणि तुमची रास "मीण" आहे का? कारण मीण राशीचे लोग अश्या अफुवान्वर खूप्प विश्वास ठेवतात.

जगबुडीची बातमी अ‍ॅडव्हान्समध्ये दिल्याबद्दल धन्यवाद. ही जगबुडी कोणत्या च्यानेलवर "लाईव्ह" दाखवणार आहेत? लाईव्ह दाखवताना मध्ये ब्रेक असणार की विदाउट ब्रेक? जगबुडीच्या ठिकाणी किती क्यामेरे लावणार आहेत? म्हणजे अ‍ॅक्शन रीप्ले किती अँगलमधून दाखवणार? जगबुडी संपल्यावर हायलाईट्स परत परत दाखवणार का? अवांतर : कलियुग सुरू होऊन सुमारे ५००० वर्ष झाली असं आम्हाला संघाचे/सनातन प्रभातचे लोक सांगतात. ६४०००० वर्ष या आकड्याचे संदर्भ द्यावेत. ;) अतिअवांतर : ज्या संस्कृतीने २०१२ चं भाकीत केलं होतं ती केव्हाच बुडाली. तेव्हा त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं त्याचा विचार करावा !!! :)

In reply to by नितिन थत्ते

ओ, गपा की... त्यांनी करमणुकीचा उदात्त हेतू अत्यंत छुपा ठेवून धागा काढला आहे, तर निघाले लगेच टाचणी घेऊन फुगा फोडायला.
ज्या संस्कृतीने २०१२ चं भाकीत केलं होतं ती केव्हाच बुडाली. तेव्हा त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं त्याचा विचार करावा !!! Smile
अहो, त्या संस्कृतीनं ते भाकितही स्वयंस्वयंभू रीतीनं करून ठेवलं आहे: ती संस्कृती आधी बुडणार आहे, मग जग बुडेल.

In reply to by नितिन थत्ते

>>अतिअवांतर : ज्या संस्कृतीने २०१२ चं भाकीत केलं होतं ती केव्हाच बुडाली. तेव्हा त्यांचं म्हणणं किती मनावर घ्यायचं त्याचा विचार करावा !!! एक्झॅक्टली.. आयला, माया-संस्कृतीवाल्यांनी २०१२ला जगबुडी होणार असं भाकीत केलं. पण, हे २०१२ माया कॅलेंडरचे का इंग्रजी कॅलेंडरचे का शके २०१२ का विक्रमसंवत २०१२ हे कोण सांगणार ?? माया २०१२ म्हणजे इंग्रजी कुठलं साल? बाकी सागरचं विश्लेषण आवडलं ब्वॉ..

In reply to by शुचि

ज्यांचा ईतरांना वाचवण्याचा सराव झाला आहे त्यांनी पोहण्याच्या शिकवण्या सुरु करा.

In reply to by इरसाल

पण पहिल्या शिकवणीच्या येळंला 'आम्ची कुठेही शाखा न्हाई' आसं लिवल्यालं आसंल तर कस्काय जमावं हे.

In reply to by रमताराम

पण पहिल्या शिकवणीच्या येळंला 'आम्ची कुठेही शाखा न्हाई' आसं लिवल्यालं आसंल तर कस्काय जमावं हे. आमास्नी हिरीत शिकवाया जमतंया, तवा एका शाखेचे लायसन्स आमास्नी बी द्या ;)

In reply to by रमताराम

'आम्ची कुठेही शाखा न्हाई' अस लिव्लय बगा, तर मन्ग पोटशाखा उघडुन टाका राव. आनी सागर रावास्नी बी योक लाय्सन दी टाका.

In reply to by इरसाल

"मिसळपाव" खावून नाना "उपक्रम" चालवून जे "मनोगत" व्यक्त होते ते "मायबोली"तून सांगून हे दाखवून देईन कि "मी मराठी"च आहे. विषयांतर आहे पण हे जाम आवडले :) अशी सही भारीच...

In reply to by इरसाल

जिथे शाखा चालु केल्यात त्याची जाहीरातबाजी न भिजणार्‍या पेपरावर करुन उंच उंच जागी लावा.

In reply to by मोहनराव

अगदी अगदी ...मोहनराव नाहीतर असे व्हायचे....... आन्जासाभा.

In reply to by कवितानागेश

याउलट असं विचार की जग पाण्यात बुडणार हे माहित होतं तर इतका वेळ तो पाण्यात बुडवलाच का !! आता तो जर काचेचा असेल तर पाण्याबाहेर काढताना आणखी त्रास होणार . ;)

In reply to by सूड

@याउलट असं विचार की जग पाण्यात बुडणार हे माहित होतं तर इतका वेळ तो पाण्यात बुडवलाच का !! आता तो जर काचेचा असेल तर पाण्याबाहेर काढताना आणखी त्रास होणार .>>>> राम राम राम राम..... भगवंता वाचिव रे या इनोदापासून... जगबुडी नक्की येणार ;-)

In reply to by रेवती

आधी समजले होते की जानेवारीतच जगबुडी होणार. असं पोस्टपोन का करतायत? कलमाडी सुट्ले म्हणुन..........

In reply to by रेवती

वहिनी, तुम्हाला म्हणून सांगतो जगबुडी झाली ना तर कोणीच वाचू नये. वाचलेले लोक माझ्याबद्दल काय कॉमेंट्स करतील, त्याचे मला टेन्शन येते. :) -दिलीप बिरुटे