Skip to main content

सावधान जगबुडी येत आहे.

लेखक भिकापाटील यांनी रविवार, 29/01/2012 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
हाय फ्रेंडस् कसे आहात. जगातील एका प्राचीन माया संस्कृतीने सन २०१२ ला जगबुडी होणार आहे असे भाकीत वर्तवले आहे. तारीख आहे २१ डिसेंबर २०१२. माया संस्कृतीचे कॅलेंडरच मुळी २०१२ ला संपते. त्यामुळे जगबुडी निश्चित होणार असे म्ह्टले आहे. मला तरी वाटते. ह्या विश्वाचा अंत जव:ळ आला आहे. आता खाउन्पिउन घ्या. मजा करा. जास्त तंगीत जिवन भार वाहू नका. ओन्ली ऐष. कसें. दररोज तुळशीचे दरशन घ्या. विष्णूचा जप घ्यान करा. शक्यतो पिंपळाच्या झाडाजवळ रहा. प्रलयकाळात पटकन झाडावर चंगून बसा मग तुम्ही वाचलेच म्हणुन समजा. आता टेंशन विसरुन जा. श्री कृष्णाचा अवतार परत होणार आहे. कलियुगाला ६४०००० वर्षे डिसेंबर मधे पूर्‍ण होत आहेत. तसे आपन भाग्यवान आहोत. आपल्याला प्रलय पहायला भेटेल. ह्यात सर्वच जिवांचा नायनाट होईल असेही नाही. जे पुण्यवान आत्मे असतीन ते जरुर वाचतील. मिपावर अनेक पुण्यवंत असल्यामुळे ते नक्कीच वाचतील असी मला आषा आहे. तुमचे मत जाणुन घ्यायला आवडेल. ------------------------------------------ तळटीपः ०१. विषय गंभीर आहे. काळजीपुर्वक हाताळा. हसा खेळा पण शिस्त पाळा. ०२. तुमच्या बायकोचे संशयाचे भूत उतरले का. या नि अशा खवचट प्रशनांना बगल दिली जाईल. तो विशय संपला आहे. मार्गदशनः श्री स्पा काका. रुन निरदेशः श्री परा काका.

वाचने 22202
प्रतिक्रिया 104

प्रतिक्रिया

पवार साहेब २०१४ ची निवडणूक लढवणार नाही आहेत..त्यामुळे जगबुडी निश्चित आहे..!! :)

च्यायला मायन लोकान्ना गणित जमायचे नाही. त्यामुळे कॅलेंडर अर्धवट सोडले. तर लोकान्ना वाटते की पाण बुडी येनार. काठीण अहे बुआ.

In reply to by मु. पो. डब्लीन

पाणबुडी नाहि हो जगबुडी......पाणबुडी बुडल्यावर असे धागे निघत नाहित.ति जर बुडली नाही तर निघतात.

एकुणच समस्या गंभीर आहे. यावर उपाय योजना काय? मिठी नदी तर मोकळी करुन झाली आहे, तर मुंबई नक्की वाचणार! आता बाकी शहरातील लोकांनी आपपल्या नद्या मोकळ्या करुन घ्या. जिकडे तिकडे पिंपळाची झाडे लावा आणि वेगाने वाढवा. पिंपळाच्या पानांवर संशोधन करुन ती आधिक मोठी आणि ताकदवान करुन घ्या. चला लवकर कामाला लागा. :-| मिका पाटील.

माया नावाच्या मुलींची, बालिकानी, आयानी, बायानी, म्हातार्‍यानी ,कोतार्‍यानी कृपया भावना वैग्रे दुखावल्या सार्खे मथळा वाचून करू नये. पूर्ण मथळा मायाच्या आईचा घो... असा वाचावा.आता शिक्षणाच्या आईच्या घो याला सेन्सरची मान्यता आहेत .तर मिपा वर हरकत नसावी. मुद्दा असा की हे माया " सूर्याला आपण वाचविले पाहिजे " असा वसा घेउन म्ह्नणे काही सोपस्कार करीत असत. आता मायांवर किती कसा विश्वास ठेवायचा. पण जगबुडी होणार म्हणून ऐश करून घ्यायची झाली तर ........... *पुण्यात प्रसिद्ध मिसळ पाव खाताना " तर्रीस जादा चार्ज लावला तरी तर्रीची ऐश करणार. *एखाद्या मुलीने थोबाडीत मारली तरी चालेल पण तुझे डोळे सुंदर आहेत अस म्हणण्याची ऐश करणार. * एकदा बायकोच्या समोर पाणी घालून बिअर प्यायची ऐश करणार मग ती दारूड का म्हणेना. च्या... ला , ऐश करायचे मुद्दे देखील सुचत नाहीत.... क्या जिंदगी है यारों !

In reply to by चौकटराजा

पाणी घालून बिअर???? मग एक चमचा कफ सिरप वर भागवा की राव. तुम्ही 'प्यायची' शिकवणी लावा आधी, पोहण्याचे नंतर पाहू.

हे कॅलेंडर वाचून कोणी सांगेल का...नक्की कधी बुडणार ! आणि जर २०१२ ला संपणारे तर ह्या लोकांना २०१३ पासूनची कालनिर्णय ची पुरवणी लावायला काय होतंय ! - (स्कायलैब पडता पडता वाचलेला गरीब शेतकरी ) मालोजीराव

In reply to by मालोजीराव

हे क्यालेंदर आहे? मला वाटल सुर्यादेवतेचा फोटो आहे. जरा समजल अस क्यालेंदर लिहाव न माणसांनी.च्यायला ह्यात आज तारीख कोणती बघायला जाव तर कळेपर्यंत एक वर्ष निघून गेल असल.

सर्वांनी सामानाची बांधाबांध करा. खाण्यापिण्याच्या वस्तू, पाण्यात बुडू नये म्हणून सुके भोपळे/कळश्या/टायर-ट्युबा, जळाऊ सामान, आपापल्या देवाचा फोटू(माझ्याकडे रजनीकांत चा फोटू हाये) ई.ई. घेऊन ठेवा. चुकून माकून जगबुडीतून वाचलात तर पुढील व्यवस्था म्हणून चांदीचा पेला वगैरे घेऊन ठेवा. पृथ्वीवरील मानव जात संपली नाही पाहिजे! जय महाराष्ट्र !

मिपावरच्या प्रतिसादकांना परिस्थितीचे गांभीर्य नाही का? वेळ कमी राहिला असताना टिवल्याबावल्या सुचतातच कशा? असो, मानवजातीच्या कल्याणासाठी आम्ही काही सेवा जाहीर करत आहोत. (पूर्वनावनोंदणी आवश्यक) १) कोल्हावेरी सबमरीन सव्हिर्सेस जगबुडीपासून वाचण्याचा प्रभावी उपाय म्हणजे पाणबुडी. जगबुडी होऊन जाईपर्यंत आपण पाण्याखालील जगाचे नयनरम्य दर्शन घेऊ शकता. कॅप्टन कलिका शेखावत जातीने सर्व पर्यटकांना माहिती देतील. या पाणबुडीत पशुपक्षी व लॅपटॉप/मोबाईल आणण्यास बंदी आहे. ही पॅकेज टूर असल्याने दिवसाच्या दरावर भाडे आकारले जाणार नाही त्याचप्रमाणे सवलत/बार्गेन चालणार नाही. तपशील लवकर जाहीर होईल. निराशा टाळण्यासाठी आजच नाव नोंदवा. २) मनू नौकासेवा ही पाण्यावर तरंगणारी मोठी नौका असून यात पशुपक्षी, लॅपटॉप, मोबाईल व अन्य गाठोडी यांना परवानगी आहे. यात जगबुडी होऊन जाईपर्यंत आपणास दिवसाच्या दराने राहता येईल. बायकांच्या गप्पा आणि पशुपक्ष्यांच्या कलकलाटाबाबत कोणतीही तक्रार व्यवस्थापनाकडे करता येणार नाही. आगामी काही अन्य उपयुक्त उत्पादने १) भयमुक्ती सुरक्षा कवच - यासोबत स्वामी लीलानंदांचे चरित्र मोफत. एजन्सी - गुपचुप ब्रदर्स. २) चिंताहारी आसव - यात जबरीटा आणि टकल्ल्या या दोन मॉकटेलचा आणि बेवडा, नवसागर, मोहफुले अशा औषधी वनस्पतीचे संमीश्रण आहे. याच्या प्राशनाने जगबुडीच काय, परंतु कोणतीच भीती/ डु आयडीचा त्रास आपल्यास होणार नाही. सोकाजी वायनरीजचे एक उत्कृष्ट उत्पादन. ३) आनंदमय गोमय - सर्वबाधा निवारणासाठी सिद्ध केलेले खास गोमय. याच्या लेपनाने जगबुडीतही आपले शरीर सुरक्षित राहू शकेल.

In reply to by योगप्रभू

योगप्रभू$$$$........ आ व रा ..... _/\_ ;) ;) क ह र आहात!!!!! =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
आनंदमय गोमय - सर्वबाधा निवारणासाठी सिद्ध केलेले खास गोमय. याच्या लेपनाने जगबुडीतही आपले शरीर सुरक्षित राहू शकेल.
हहहाअहाहहहाअहाहहहाअहाहहहाअहाहहहाअहाहहहाअहा अशक्य आहात!!!!! :)

In reply to by योगप्रभू

नाय, 'जगावं का मरावं' हा त्यो सवाल न्हाई. त्ये मनूने आन् त्या नोहानं म्हनं सम्द्या जोड्यांनाच त्येच्या व्हडीत येंट्री दिल्याली. आता जे शिंगल आसतील आजून त्ये, ज्येंच्या जोडीदारानं कल्टी दिल्यालं आसन् त्ये आन् चिल्लीपिल्ली (जी बव्हतेक शिंगलच असतेत) हेंनी कसं कराव म्हंतो म्या. तुमच्याकडं काय पेशल सोय हाय काय तेंच्यासाटी. काय हे सम्दे बाय डिफाल्टं मरनारच म्हनायचं?

In reply to by रमताराम

राम राम रमताराम, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, लव्हिंग, लिव्ह-इन अशा समद्यास्नी नौकेत प्रवेश हाय मालक. टिप - जगबुडीनंतर रिकन्स्ट्रक्स्शन्चे काम मोठ्या प्रमाणावर सुरू होणार. इंजिनिअरिंग कंपन्याचे शेअर पडेल भावात आजच घेऊन ठेवा. सम्पर्क - फॉल्टर अँड डिफॉल्टर फायनान्शियल सर्व्हिसेस

जगबुडी झाले आणि सारेच त्यात मेले तर जे मेले त्यांचे तेरावे कोण करेल? तसेच त्यांची श्राद्धे कोण करतील?

हाय फ्रेंडस् कसे आहात.
ठिकठाक आहोत.
सन २०१२ ला जगबुडी होणार
असं होय, कुठ्ल्या पाण्यात?
माया संस्कृतीचे कॅलेंडरच मुळी २०१२ ला संपते.
असं का बरं? कागद संपला का शाई संपली?
मिपावर अनेक पुण्यवंत असल्यामुळे ते नक्कीच वाचतील असी मला आषा आहे.
हि हा हा हा!!! सगळ्यात मोठा विनोद!
तुमचे मत जाणुन घ्यायला आवडेल.
असं काही नसतं. हे सगळं सोडा आणी कामाला लागा, जगबुडी होईल नाही होईल पण नोकरी मात्र जाऊन तुम्ही बुडु शकता.

बाप रे!!!!!!!! भिती वाटायला लागली. मला जगायचय माझ्या मुलासाठी. विचार देखील सहन होत नाहीये.

२१ डिसेंबरला जगबुडी आहे. त्याआधिच काही दिवस एखाद्या टुमदार ग्रहावर वस्तीला गेलो तर ? निदान सर्व मिपाकर एकत्र येवून ह्या 'समस्येवर' उत्तर शोधतील अशी आशा करुया. भिकापाटील, एखादे रॉकेट बनवायचे का? दिवाळीतले नाही तर माणसांना दुसर्‍या ग्रहावर घेवून जाणारे. एस.टी. महामंडळ पृथ्वी-मंगळ-पृथ्वी 'शिवनेरी' सेवा चालु करणार असल्याची बातमी आहे.

मायला २१ डिसेंबरच्या अगोदर मला विम्याच्या पॉलिश्यांचे पैसे मिळतील का? निदान तेवढीच काही दिवस मज्जा करून घेता येईल

०२. तुमच्या बायकोचे संशयाचे भूत उतरले का. या नि अशा खवचट प्रशनांना बगल दिली जाईल. तो विशय संपला आहे. बादवे भिकाजि...ते तुमच्या बायकोचे संशयाचे भूत उतरले का हो???? :D :D :D

In reply to by उदय के'सागर

नसावं, म्हणून त्यांना वाटत असेल की आता ही धरणी मला पोटात घेईल तर बरं !! त्यावरुनच ही जगबुडीची संकल्पना डेव्हलप झाली असावी. ;)

In reply to by उदय के'सागर

तुमची सही अगदी परफेक्ट आहे "मन वढाय वढाय" ....... भिकाजींनी कितीही नका विचारू सांगीतलं तरी मन आपलं वढाय वढाय ;)

समस्त पृथ्वीवासीयांसी कळवण्यात येते की जगबुडीमु़ळे होणार्‍या एकसमयावच्छेदेकरून जीवसंहारामुळे स्वर्ग नि नरकात गर्दी होईल असे ध्यानात आल्याने सदर प्लान तूर्त स्थगित ठेवण्यात आलेला आहे. स्वर्गात फारसे जीव येण्याची शक्यता नसल्याने फारशी अडचण नाही, परंतु सात नरक असूनही येणार्‍या संभाव्य संख्येचा विचार करता ती अपुरी पडणार आहे हे ध्यानात घेऊन आणखी सात नरकांची उभारणी आवश्यक असल्याची शिफारस 'यम अँड चित्रगुप्त प्रा. लि.' या आमच्या कन्सल्टन्सी फर्मने जगन्नियंत्यास केली आहे. त्यानुसार आवश्यक ती निविदा प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यानुसार सात नरकांची उभारणी पुरी होईपर्यंत जगबुडीचा प्लान रहित करण्यात येत आहे. याचबरोबर, एकाच वेळी इतक्या केसेस हँडल करणे शक्य व्हावे यासाठी मा. चित्रगुप्त यांच्यासाठी 'क्लाऊड्-बेस्ड पाप-पुण्य नियोजन प्रणाली' विकसित करण्यात येत आहे. आमच्या पुनर्जन्माबद्दलच्या धाग्यात म्हटल्याप्रमाणे ते विकसित करणारे स्वतःची 'सोय' करून ठेवणार नाहीत याची खात्री कशी करून घ्यावी याबाबत खल चालू आहे. जगबुडीची नवी तारीख नंतर कळवण्यात येईल. तूर्तास सर्व अकाउंटस ना एक वर्षाचे तात्पुरते एक्स्टेंशन देण्यात आले आहे. रमताराम (आथोराईज्ड शिग्नेटरी) मे. यम अँड चित्रगुप्त प्रा. लि. बीओडी (बिल्ड-ऑपरेट-डिस्ट्रॉय) कन्सल्टंट

In reply to by रमताराम

च्यायला तुमच्या निविदा पास होऊन नवीन सात नरकांसाठी जागा संपादन, कोर्टकचेर्‍या, उपोषणे आंदोलने, स्कॅण्डल्स होऊन नरक बांधून होईपर्यंत संख्या आणखी वाढणार म्हणजे ट्रॅफिक जाम तसाच राहणार. त्यातून नव्या नरकाची कंत्राटं निघून अधिक लोकांना रोजगार मिळणार म्हणजे जास्त लोक उपासमार न होता जगणार म्हणजे त्यांना आणखी पोरं होणार आणि तीही जगणार. प्रॉब्लेमच आहे राव. म्हणजे जगबुडी परमनंट क्यान्सल बहुधा.

In reply to by नितिन थत्ते

कोणतेही काम आम्ही करतो आहे, नाही कुठे म्हणतोय असे म्हणत टांगून ठेवण्याची मूळची काँग्रेसची नि भाजपानेही - खास करून रामंदिरासारख्या कळीच्या मुद्यांवर - आत्मसात केलेली पद्धत हाय ही. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेनंतर नव्या झोपड्यांना परवानगी नाही असे म्हणत ती योजनाच पुरी होऊ न देणे नि वेळोवेळी किती सालापर्यंतच्या झोपड्या अधिकृत मानाव्यात तो कट-ऑफ प्वाईंट पुढे सरकवत नेणे ही कांग्रेसी पद्धतच आम्ही शिकून घेऊन परलोकी इम्प्लिमेंट करत आहोत. तेव्हा परमनंट क्यान्सल असे नाय म्हणायचे हल्लीच्या मराठी भाषेत म्हणतात तसे 'अनिश्चित काळासाठी स्थगित' केली आहे.

जगबुडी नंतर आमच्या बरोबर जागुताई,गणपा व सारिका पण असु दे देवा, खाण्यापिण्याचे वांदे होणार नाहीत. जागुताई ह्यापुढे माश्याच्या सगळ्याजातींच्या पाकृ टाक म्हणजे नंतर कोणता मासा खायचा आणि कसा ह्यावर विचार करण्यात वेळ जाणार नाही.

आबाबा,,,,, क्येवढी ह्यी मायंदाळ यादी . पर्तिक्रियाची राव ! म्या तर लई गुदमराया लागलो..... आ... आता नाकातोडात पानी ग्येल्या सारखं वाटाया लागलो .... म्हेलो रं द्येवा ... आ....आरं .. .खरच जगबुडी आली का काय ....................... ?