Skip to main content

मी गीता व्हावे......

Published on शनीवार, 28/01/2012
तन मन वाणी अंजन डोळे काया व्हावे जीथे तीथे तू जाशी तेव्हा छाया व्हावे गात्रे गात्रे शामल शामल तुंदिल तुंदिल येशोदेने केलेली ती माया व्हावे जन्मोजन्मी ओठावरची सटवी व्हावे काळ्या काळ्या श्रीकृष्णाची राधा व्हावे कौरव पांडव लढण्या जमले कुरुक्षेत्री त्या पार्थाच्या मी नाशामधली बाधा व्हावे जेव्हा जेव्हा भारत "भू"ला येई ग्लानी तेव्हा तेव्हा रायाची मी गीता व्हावे मकरंद २१०२१०९१
लेखनविषय:

वाचन संख्या 1101
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

:crazy: निट वाचा हो ! यशोदा जेव्हा माया करायची तेंव्हा ती त्याला लोणी ,दही,तुप असल काही बाही खायला घालायच्च्च्च्च्ची,त्यामुळे तो काय ते तुंदिल तुंदिल झाला आसावा .समजल :bigsmile:

मनोवेधक कविता वाटली. कविच्या भावविश्वाचे अंतरंग असे असतात की कधीच ते पुर्णपणे कविलादेखील लिहीलेल्या कवितेपलिकडे जाऊन आणखी विस्तारित करता येत नाहीत अगदी जसे भावले होते तसे. कवितेचे भाव मनात एकवटले की ते कागदावर लिहुन झाल्यावर काही दिवसांनी तीच कविता वाचताना आपल्याला नवल वाटते की ही कविता माझ्याकडुन कोणी लिहुन घेतली की काय. कारण आपण केवळ ती कविता फक्त वाचत असतो अर्थासह. हा माझा वैयक्तीक अनुभव आहे.

कविता छान आहे. फक्त 'तुंदिल तनु तरी सुफल साजरी' म्हटलं की 'नाचणारे गणराज' येतात हो डोळ्यापुढे!