तन मन वाणी अंजन डोळे काया व्हावे
जीथे तीथे तू जाशी तेव्हा छाया व्हावे
गात्रे गात्रे शामल शामल तुंदिल तुंदिल
येशोदेने केलेली ती माया व्हावे
जन्मोजन्मी ओठावरची सटवी व्हावे
काळ्या काळ्या श्रीकृष्णाची राधा व्हावे
कौरव पांडव लढण्या जमले कुरुक्षेत्री त्या
पार्थाच्या मी नाशामधली बाधा व्हावे
जेव्हा जेव्हा भारत "भू"ला येई ग्लानी
तेव्हा तेव्हा रायाची मी गीता व्हावे
मकरंद
२१०२१०९१
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1103
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडली. पण तुंदिल म्हणजे स्थूल
निट वाचा हो ! यशोदा जेव्हा
होय तसेच वाटते. अम्हाला नाही
In reply to निट वाचा हो ! यशोदा जेव्हा by पक पक पक
मनोवेधक कविता वाटली. कविच्या
गणराज रंगी..!