Skip to main content

रेखीव

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 23/01/2012 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
घडे काय हे; ना कळे योजना ही उभा ज्येष्ठ रावा; कुणी हाक मारी मिळे कोपर्‍याला नव्याने उभारी उधाणून ऊर्मी उमलली दुपारी गाभ्या तळाशी किती रत्नराशी लयधुंद वलये तरीही उराशी अंगी दुरावा कसा हा म्हणावा रेखे कुणी पापणी-आत नक्षी स्मिताची कळी अंगणी अंग जाळी नयनी खुळी ओढ नवती निराळी अव्हेरू कसे आवरू वा कसे गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी .....................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1324
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

अव्हेरू कसे आवरू वा कसे गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी>>> व्वा व्वा व्वा.... एक परिपूर्ण काव्यानुभव...दिल खुष हो गया

कविता

स्मिताची कळी अंगणी अंग जाळी नयनी खुळी ओढ नवती निराळी अव्हेरू कसे आवरू वा कसे गुंतला व्याध पाशात भुलला अवेळी
सुंदर! आणि रेखिव!!

गाभ्या तळाशी किती रत्नराशी लयधुंद वलये तरीही उराशी अंगी दुरावा कसा हा म्हणावा रेखे कुणी पापणी-आत नक्षी
मनाच्या खोल सागरासम वर्णन वाटले .. मनापासुन आवडले.. अप्रतिम .. तरीही 'गाभ्या' आणि 'नवती' हे नविन शब्द दिसले.. अ‍ॅक्युरेट अर्थ माहित नाही.. गाभ्या म्हणजे गाभार्‍याच्या आणि नवती म्हणजे नवी असे आहे का ?