✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गुरफटलेली आसवे

ध — धनंजय, Sun, 01/22/2012 - 04:34
गुरफटलेली आसवे
काळोखात आसवे आपली दिली-घेतली, गुरफटलेली. कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही?
(हुआन रामोन हिमेनेथ याच्या एका स्पॅनिश कवितेवरून)

प्रतिक्रिया द्या
9308 वाचन

💬 प्रतिसाद (13)

टिप्पणी : प्रत अधिकारमुक्त कविता

धनंजय
Sun, 01/22/2012 - 06:34 नवीन
टिप्पणी : प्रत अधिकारमुक्त कविता मूळ कविता बघण्याकरिता हे गूगलपुस्तक, पृष्ठ ८२, बघावे, शीर्षक : LXIV)
  • Log in or register to post comments

फरपटलेली गाढवे

सन्जोप राव
Sun, 01/22/2012 - 06:48 नवीन
फरपटलेली गाढवे उतारावर चरणारी गाढवे आपली आपण इकडे जरा...अम्म..अम्म.. गाढवे फरपटली कोणती तुझी? कळलेच नाही. माझी ओळखलीस का, तूही? डिस्क्लेमरः गाढवे चरत असताना मी आणि तू काय केले हे आपण वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडू. कसें?
  • Log in or register to post comments

समजले नाही

धनंजय
Sun, 01/22/2012 - 07:09 नवीन
समजले नाही. परंतु तुमची विडंबने अनेक वाचकांना आवडतात. त्यामुळे हे विडंबनसुद्धा अनेक वाचकांना आवडेल, आणि त्यांच्या प्रतिसादातून मला समजेल अशी खात्री वाटते. समजल्यावर आवडल्याची पावती देईन. मुळातल्या कवितेतही आसवे मिसळणारे दोघे शरीरसंबंध ठेवणारे असावेत. (कवितासंग्रहाचे नाव "नवविवाहित कवीची रोजनिशी" असे आहे.) परंतु प्रेमिकांच्या प्रत्येक व्यवहारात "ते झ*तात" असा मुद्दाम निर्देश करून दिला, तर प्रेमिकांमधला संबंध पूर्णपणे समजण्यात मर्यादा येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

विडंबनांचा महापूर

नगरीनिरंजन
Sun, 01/22/2012 - 10:28 नवीन
गाढवे फरपटली? भरकटली असे लिहीले असते तर किमान थोडा अर्थतरी प्राप्त झाला असता असे वाटले.
गाढवे चरत असताना मी आणि तू काय केले हे आपण वाचकाच्या कल्पनाशक्तीवर सोडू.
झोपा काढल्या, विहीरीत डुंबलो, चिंचा पाडल्या अशा अनेक शक्यता होतात. पण मूळ कवितेत आणि रुपांतरात दोन प्रेमीजीवांच्या अवस्थेचा ठळक अंदाज वाचकाच्या कल्पनाशक्तीतून काढण्याची क्षमता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सन्जोप राव

मिपावरच्या कविता रात्रंदिनी

प्रचेतस
Sun, 01/22/2012 - 09:33 नवीन
मिपावरच्या कविता रात्रंदिनी सतत प्रसवी यमकामागे फरफटलेली कोणती कुणाची? कळतच नाही, माझी ओळखलीत का, तुम्ही?
  • Log in or register to post comments

मेरा कुछ सामान

राजेश घासकडवी
Sun, 01/22/2012 - 10:30 नवीन
या कवितेवरून गुलझारची 'मेरा कुछ सामान' ही कविता आठवली. याच भावनेचा थोडा विस्तार करणारी आहे म्हणून मला जास्त भावली. त्यातल्या काही ओळी. एक अकेली छत्री में जब आधे आधे भीग रहे थे आधे सुखे आधे गीले सुखा तो मै ले आयी थी गीला मन शायद बिस्तर के पास पडा हो वो भिजवा दो मेरा वो सामान लौटा दो.
  • Log in or register to post comments

कवितेचं रूपांतर आवडलं.

पैसा
Sun, 01/22/2012 - 11:20 नवीन
थोड्या शब्दात बराच आशय व्यक्त केला आहे. दोन प्रेमिकांना कोणतं तरी कदाचित येणार्‍या वियोगाचं मोठं दु:ख आहे, हे थोडक्यात सूचित केलंय. छान. घासू गुर्जींनी दिलेलं गाणंही समर्पक.
  • Log in or register to post comments

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/22/2012 - 14:10 नवीन
असेच रुपांतर आवडले. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

+१

चित्रा
गुरुवार, 01/26/2012 - 08:32 नवीन
थोड्या शब्दात बराच आशय व्यक्त केला आहे. +१. कविता आवडली. >कोणती तुझी? कळलेच नाही. >माझी ओळखलीस का, तूही? थोडेसे शरीराबाहेर प्रवेश करून पाहिल्यासारखे वाटले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

सर्वांचे आभार

धनंजय
Tue, 01/24/2012 - 06:24 नवीन
सर्व प्रतिसादकांचे आभार मानतो. "मेरा कुछ सामान"ची आठवण एका वेगळ्याच पैलूकडे लक्ष वेधते. माझ्या मते "मेरा कुछ सामान"चे कथानक फार वेगळे आहे. प्रस्तुत कवितेत गुरफटणे वाढत चालले आहे - प्रेमिकांच्या संमतीने वाढत चालले आहे. अश्रू आहेत त्या दु:खापेक्षाही अश्रूंचाही संगम होत असण्यातला आशावाद... हे प्रस्तुत कवितेचे कथानक आहे. "मेरा कुछ सामान"मध्ये गुंता आहे, पण गुंता आहे ही निराश बाब वाटते.
  • Log in or register to post comments

+

विकास
गुरुवार, 01/26/2012 - 23:14 नवीन
चारोळी आवडली. त्यातील आशय लक्षात घेताना (त्यात देखील तुमचे मत समजून घेताना) सुधीर मोघ्यांची खालील चारोळी आठवली:
ना सांगताच तू, मला उमगते सारे कळतात तुलाही, मौनातील इशारे दोघांत कशाला मग शब्दांचे बांध 'कळण्या'चा चाले 'कळण्या'शी संवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

रूपांतर खूप आवडले.पैसा यांनी

इन्दुसुता
Tue, 01/24/2012 - 09:11 नवीन
रूपांतर खूप आवडले. पैसा यांनी म्हटल्या प्रमाणे संभावित/ येणार्‍या वियोगा मुळे आसवे असावित असे वाटत नाही... मला वाटते प्रदीर्घ वियोगानंतर होणार्‍या मीलनातही आसवे असतात प्रेमिकांची ... प्रस्तुत कवितेत गुरफटणे वाढत चालले आहे - प्रेमिकांच्या संमतीने वाढत चालले आहे. अश्रू आहेत त्या दु:खापेक्षाही अश्रूंचाही संगम होत असण्यातला आशावाद... हे व्यवस्थित जाणवत आहे. आशावाद आहे तरीही करूण आहे... श्री. राव यांचे विडंबन अभिरूचीहीन वाटले.
  • Log in or register to post comments

सुंदर...

कवितानागेश
Fri, 01/27/2012 - 00:09 नवीन
सुंदर...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा