Skip to main content

" शोध तिचा लागेना ...! "

लेखक विदेश
Published on गुरुवार, 19/01/2012
कुठे शोधू तुला एकटीला किती शोधू तुला एकटीला तुझा विरह असह्य होतोय तुझ्याविना चडफडतोय ! येताजाता बाहेर फिरायला कामाला आणि उंडारायला तुझी साथ असायची ! लांब जवळ गेलो तरी तू बरोबरच असायची ! दारापासून कार्यालयापर्यंत- मंदिरापासून मद्यालयापर्यंत तुझ्याविना बाहेर पडायला लाज वाटते मला , तुझ्याशिवाय बाहेर जायला तोंड नाही मला , 'प्रिये'च म्हणतो आता तुला प्रिये, जीव किती गुंतला ! किती छळणार मला किती दुखवणार मला , तुझ्यासवे दूरवर फिरायला आवडते , तू आता नसतांना माझे पित्त खवळते ! कुठे आहेस कशी आहेस शोध काही लागेना , एकच पायात घालू कशी दुसरी चप्पल सापडेना !
लेखनविषय:

वाचन संख्या 998
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

कुठे शोधू तुला एकटीला किती शोधू तुला एकटीला तुझा विरह असह्य होतोय तुझ्याविना चडफडतोय ! छान अग्निविरह......