स्वरकिंचित
लेखनविषय:
काव्यरस
शब्द एक पडला कानी
उठल्या कुठल्या लहरी रानी
चाळवले रुधिरामधले रण
अमृतमय झाले पाणी
कंठ कोरडा गहिवरला
ओघळले यमुनाजळ नयनी
वात कोंडला उरी
हुंदका फुटला श्वासामधुनी
भिजले काजळस्वप्न लोचनी
उत्सव काहुर मन सदनी
भेट दाट घडली स्वरकिंचित
बहर पावली अवनी
............................अज्ञात
वाचने
986
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
मस्त!!