Skip to main content

स्वरकिंचित

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 18/01/2012 09:17 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द एक पडला कानी उठल्या कुठल्या लहरी रानी चाळवले रुधिरामधले रण अमृतमय झाले पाणी कंठ कोरडा गहिवरला ओघळले यमुनाजळ नयनी वात कोंडला उरी हुंदका फुटला श्वासामधुनी भिजले काजळस्वप्न लोचनी उत्सव काहुर मन सदनी भेट दाट घडली स्वरकिंचित बहर पावली अवनी ............................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 989
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

आवडली रचना.

शब्द एक पडला कानी उठल्या कुठल्या लहरी रानी चाळवले रुधिरामधले रण अमृतमय झाले पाणी -------------- छान आहे !