नर्मदा परिक्रमा विषयावरचे यशवंताचे रसाळ लेखन वाचले.
मग थोडी शोधा शोध केली तर ही माहिती हाती लागली. आशा आहे कुणाला तरी उपयोग होईल.
नर्मदा परिक्रमा- इतिहास
सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर सुरू होते.
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे.
स्कंदपुराणात नर्मदेचं वर्णन आले आहे असे म्हणतात.
पायी केल्यास ही यात्रा 3 वर्षे 3 महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे.
ही यात्रा अतिशय खडतर आहे.
नर्मदा परिक्रमा नियम
ओंकारेश्वर येथून सुरुवात.
वाटेत नर्मदेचे पात्र ओलांडून चालत नाही.
सदार्वतात शिधा घेऊन अन्न शिजवणे, किंवा ५ घरी भिक्षा मागून जेवणे, वाटेत मिळेल ते पाणी पिणे, जिथे शक्य तिथे रात्री मुक्काम करणे या पध्दतीने ती करावी लागते.
रोज त्रिकाल नर्मदेची पूजा, स्नान, संध्यावंदन, नित्यपाठ, सतत ॥ॐ नर्मदे हर॥ या मंत्राचा जप व नामस्मरण केले जाते.
नर्मदा परिक्रमा वाहनाने करताना वाटेत लागणारी गावे -
ओंकारेश्वर
राजघाट
प्रकाशा
गोरागाँव
भालोद
अंकलेश्वरमाग्रे
कठपोर
मिठीतलई
भरुच
मोटी करोल
नारेश्वर
तिलकवाडा
तिलकवाडा
कोटेश्वर
गरुडेश्वर
माण्डू
सहस्रधारा
महेश्वर
मण्डलेश्वर
बडम्वाह
नेमावर
बरेलीमाग्रे
बरमनघाट
जबलपूरचा गौरी घाट
अमरकंटक
होशंगाबाद
ओंकारेश्वर
नर्मदा परिक्रमा या विषयावरील पुस्तके
- कुणा एकाची भ्रमणगाथा- गो. नी. दाण्डेकर
- माते नर्मदे - दत्तप्रसाद दाभोलकर
- नर्मदे हर हर जगन्नाथ कुंटे
- नर्मदा परिक्रमा : एक अंतर्यात्रा - भारती ठाकूर, नाशिक - गौतमी प्रकाशन, पृष्ठे : २६२, मूल्य : २००
- बसने नर्मदा परिक्रमा वामन गणेश खासगीवाले
- नर्मदे हर हर नर्मदे सुहास लिमये
- श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग - श्री नर्मदाप्रसाद
- चलो नर्मदा परिक्रमा- पर्यटन भारती
- नर्मदा मैय्येच्या कडेवर - शैलजा चितळे
- माझी नर्मदा परिक्रमा - सांब सदाशिव अनंत
- नर्मदा परिक्रमा - जोगळेकर दा.वि.
- नर्मदा परिक्रमा मार्गदर्शिका - Sunil Aakivate
- भागवत सप्ताह आणि नर्मदा परिक्रमा - बोरीकर अरुण
- नर्मदा परिक्रमा - लेले शैलजा
- तत्वमसि - लेखक ध्रुव भट्ट अनुवाद अंजनी नरवणे - केंद्रीय साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कादंबरी
वाचने
18881
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
ही परीक्रमा कधी करेन की नाही
>>> पण आता मात्र बरीच सोपी
In reply to ही परीक्रमा कधी करेन की नाही by मराठमोळा
इतकी
न जाता आमच्या पिंका...
>> एकट्या स्त्रीयांनी तो
+१ असेच म्हणतो
In reply to >> एकट्या स्त्रीयांनी तो by यशोधरा
संकलन
पुस्तकांचे संकलन आवडले. सर्वच
पुस्तक
In reply to पुस्तकांचे संकलन आवडले. सर्वच by अभिज्ञ
ह्या सप्ताहाच्या लोकप्रभा मधे
तो लेखक :- nonsense
In reply to ह्या सप्ताहाच्या लोकप्रभा मधे by उदय के'सागर
मनरावाशी सहमत आहे.
In reply to तो लेखक :- nonsense by मन१
अगदी सहमत. मी "एका
In reply to तो लेखक :- nonsense by मन१
लेखाबद्दल धन्यवाद
In reply to तो लेखक :- nonsense by मन१
अजून एक पुस्तक वरच्या यादीत
लाय्ब्ररीत शोधत होतो हे
In reply to अजून एक पुस्तक वरच्या यादीत by पुष्करिणी
पुस्तकावर तरी कादंबरी असा
In reply to लाय्ब्ररीत शोधत होतो हे by स्वानन्द
धन्यवाद पुष्करिणी.
In reply to पुस्तकावर तरी कादंबरी असा by पुष्करिणी
तत्त्वमसि
In reply to अजून एक पुस्तक वरच्या यादीत by पुष्करिणी
(No subject)
In reply to तत्त्वमसि by मेघवेडा
संपादक मदत करा...
In reply to अजून एक पुस्तक वरच्या यादीत by पुष्करिणी
छान संकलन
बरीच माहिती दिल्याबद्दल
छान संकलन!