Skip to main content

टेकन....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 16/01/2012 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
तूमची वयात आलेली मुलगी , तुमचे ऐकत नसेल तर तिला हा सिनेमा जरूर दाखवा.....(तिला एक्टिलाच बघू दे ही माझी विनन्ती.....काही द्रुश्ये adult आहेत...पण ती कथेला पुरक आहेत.....) खरे तर मी एवढे एकच वाक्य लिहिणार होतो....पण "वल्ली" ह्यानी सान्गीतल्या प्रमाणे, थोडी माहिती द्यायचा प्रयत्न करतो... एक माणुस असतो. तो धन्देवाइक शरीर रक्शक असतो. त्याचा घट्स्फोट झालेला असतो. ...त्याची मूलगी तिच्या मैत्रीणी बरोबर Paris ला जायचा बेत आखते....तिचा रूट बघुन ह्याचा नकार्....पण मुलगी म्हणते .....की ती वेळोवेळी फोन करेल.....पण तिचा फोन येत नाही....मग हाच फोन करतो...नेमके त्याच वेळेस तिचे अपहरण होत अस्ते....ह्याच्या फोन वरून तिला सुचना....तिची किन्काळी ऐकतो....आणी मग एक मस्त सन्वाद... " तू कोण आहेस ते मला माहीत नाही....पण तू माझ्या मुलीला सोड ......मी तुला शोधणार नाही.....पण जर तू माझ्या मुलीला सोडले नाहीस तर्...मी तुला कसेही करून शोधुन काढीन .....आणी तुला ठार करीन...." आणी इथुन चालू होतो एक जबरदस्त पाठलाग.......सिनेमा जरूर बघा..... प्रिय वल्ली......मला वाटते...एवढे लिखाण खुप झाले.....जमले तर तुम्ही पण हा सिनेमा बघा.....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4978
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

असले विषय, भले चित्रपट कला मानण्यात आली असली तरी, 'जनातलं मनातलं' मध्ये टाकायचे असतात. अजूनही चित्रपटाची ओळख व्यवस्थित व्हावी अशी अपेक्षा. आपले थोर मिपासदस्य - श्री. फारएन्ड, श्री. परिकथेतील राजकुमार, श्री. समीरसूर, श्री. बिपिन कार्यकर्ते आणि श्री. अन्या दातार यांच्या चित्रपटाच्या ओळखीचा किंवा रसग्रहणाच्या धाग्यांचे वाचन करून अभ्यास वाढवा. बाकी, 'टेकन' पहाण्याचा जरूर प्रयत्न करेन....

In reply to by प्रास

अजूनही चित्रपटाची ओळख व्यवस्थित व्हावी अशी अपेक्षा. आपले थोर मिपासदस्य - श्री. फारएन्ड, श्री. परिकथेतील राजकुमार, श्री. समीरसूर, श्री. बिपिन कार्यकर्ते आणि श्री. अन्या दातार यांच्या चित्रपटाच्या ओळखीचा किंवा रसग्रहणाच्या धाग्यांचे वाचन करून अभ्यास वाढवा.
बाकी, 'टेकन' पहाण्याचा जरूर प्रयत्न करेन....
चित्रपट पाहिलाय पण तरी तुझ्या लिखाणाची वाट पहातोय रे. :) बाकी वरच्या यादीत 'प्रास' हे नावही जोडु इच्छीतो.

In reply to by गणपा

बाकी वरच्या यादीत 'प्रास' हे नावही जोडु इच्छीतो.
जोरदार सहमती. हा चित्रपट बघितला आहेच. खरंच बापाची काळजी आणि धाडस या दोन्ही छटा फार सुंदर दाखवल्या आहेत. जाताजाता: प्रासभौ, तो माझ्या नावाचा उल्लेख जरा टाळता आला तर बघा.

In reply to by अन्या दातार

वरच्या यादीत भा.सं. स्पा यांचे नाव नसल्याचे पाहुन दुख: झाले, बहुधा आचारसंहितेमुळे घातले नसावे नाव अशी शंका येते आहे,

In reply to by ५० फक्त

वरच्या सन्माननियांच्या यादीत राहून गेलेल्या श्री. स्पा यांचा इथेच उल्लेख करतो. तसं इतर आणखी कुणी राहिलेल्या सन्माननियांच्या नावाची यादीत भर घालावी ही विनंती करतो. नुकतंच एक नाव आठवलं सौ. शिल्पा ब. आमच्या हातून अनवधानाने घडलेल्या चुकीबद्दल स्पांची (आणि इतर राहून गेलेल्या चित्रपट परिक्षण-ओळख-रसग्रहण करणार्‍या मिपाकरांचीही) जाहिर माफी मागतो. ते उदार मनाने आम्हाला क्षमा करतील या आशेवर आहे. बाकी, अजूनपर्यंत आमच्या बोटांतून चित्रपट परिक्षण किंवा ओळख टंकली गेलेली नाही तरी पुढे या विषयाचा जरूर विचार केला जाईल.... धन्यवाद!

पाहिला आहे. टीपिकल हॉलिवुडी थ्रिलर आहे. पण त्यात मांडलेली ह्युमन ट्रॅफिकिंगची समस्या प्रभावीपणे जाणवते हे चित्रपटाचे यश.