✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(भा SSSSS सं भा SSSSS सं)

स
स्पा यांनी
Fri, 01/13/2012 - 09:33  ·  लेख
लेख
प्रेरणा: सो...हम....सो...हम!! उपाकर मित्रमंडळींनो, `खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. खरड वहीत तर फिरकलो नव्हतोच, पण व्यानिलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे ." ऐसी लक्तरे लोळवीन" .निर्मात्या आहेत जिल्बुषा नगरकर आणि भावी संपादक (भा सं )मीच आहे . गेले काही महिने, वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा उसळपाव वर आहे का हो?, सर्व कट्टे तो भरवतो कहो ? ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. उसळपाव .कॉम , असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो. आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!! आपलाच (भा .सं) खाईन मांडे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
14249 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय

धन्या
Mon, 01/16/2012 - 11:24 नवीन
आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय पण वरच्या वाक्याचा उत्तरार्ध धनाजीराव वाकड्यांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतंय...
आता तुम्ही पुणे गेटचं नांव घ्याल. पण आम्ही अगदी सर्वसामान्य नागरीक आहोत हो. अमेरिकन आध्यक्षांच्या वॉटर गेटसारखे पुणे गेट करायला आम्ही नेते तर सोडाच अगदी साधे शुभेच्छावाले कार्यकर्तेसुद्धा नाही. ;) ढाई अक्षर प्रेम के मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची असं वाचायचं ते. हा. का. ना. का. ;) बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

''बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर

५० फक्त
Mon, 01/16/2012 - 11:50 नवीन
''बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो'' अहो, ती टायपिंग मिस्टेक आहे ओ, ते संस्थळाच्या नाही सुंस्थळाच्या गोष्टी करत आहेत हल्ली. सुंदर स्थळाच्या. परवा आला असता कट्ट्याला तर तुम्हाला डिटेल रिक्वायरमेंट कळाल्या असत्या...असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ढाई अक्षर प्रेम के मर्यादा

प्रास
Mon, 01/16/2012 - 11:56 नवीन
ढाई अक्षर प्रेम के मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची असं वाचायचं ते. हा. का. ना. का.
धनाजीराव, अहो, तुमच्या ताज्या ताज्या प्रेमाच्या अडीच अक्षरी कृतीला (एकशे अठ्ठावीस अक्षरांची) मर्यादा घालताना आपल्या (पक्षी तुमच्या) प्रेमाच्या व्यक्तीसोबत तुम्ही अपेक्षाभंगाच्या 'मर्यादाभंगा'चा गुन्हा तर करत नाही आहात ना, याचा जरूर विचार करा ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

हे आपलं म्हणायला हो... तसं तर

धन्या
Mon, 01/16/2012 - 12:09 नवीन
हे आपलं म्हणायला हो... तसं तर प्यारची कोई सरहद नसते. विचारा हवं तर स्पावडयाला. तो संस्थळाच्या, चुकलं टायपो मिष्टेक झाली सुस्थळाच्या शोधात "ठाणे मुंब्रा कळव्याची ओलांडून खाडी" अगदी पार रत्नांग्रीपर्यंत गेला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

_/\_

नंदन
Mon, 01/16/2012 - 13:59 नवीन
बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो.
अगागागा, उच्च! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

ओ अं. ह.

स्पा
Mon, 01/16/2012 - 11:38 नवीन
बाकी स्पांडुरंग डोंबिवलीकर संस्थळ वगैरेच्या गोष्टी करत असताना यच्चयावत जनता त्यांस स्थळबद्ध करु जात आहे हे वाचून अं. ह. झालो. तेजायला धन्या गप कि.... :D
  • Log in or register to post comments

तेजायला धन्या गप कि.... असं

धन्या
Mon, 01/16/2012 - 12:14 नवीन
तेजायला धन्या गप कि....
असं आहे काय. मग पन्नासराव म्हणत आहेत तेच खरं आहे. तुम्ही संस्थळाच्या नाही तर सुस्थळाच्या शोधात आहात. तुम्हाला मिचेनशी बोलायला हवं. त्यांच्या माजघरात चर्चा करा. काहीतरी मार्ग निघेल. घिसन मिंधेच्या नावाने खडे फोडून काही फायदा नाही. ;)
  • Log in or register to post comments

अच्छा भासं भासं म्हणजे भावी

५० फक्त
Mon, 01/16/2012 - 14:09 नवीन
अच्छा भासं भासं म्हणजे भावी संसारी असं आहे होय मला काहितरी वेगळं वाटलं होतं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

अच्छा भासं भासं म्हणजे भावी

प्रास
Mon, 01/16/2012 - 14:30 नवीन
अच्छा भासं भासं म्हणजे भावी संसारी असं आहे होय
ही हा हा हा हा हा! :-D हाण् जोरदार.....!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

हा हा हा

सूड
Mon, 01/16/2012 - 14:50 नवीन
हा हा हा :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रास

@अच्छा भासं भासं म्हणजे भावी

अत्रुप्त आत्मा
Mon, 01/16/2012 - 16:15 नवीन
@अच्छा भासं भासं म्हणजे भावी संसारी असं आहे होय मला काहितरी वेगळं वाटलं होतं. >>> :-D स्पांडुरंग शास्त्री,,,तुमच्या धाग्यावर या कोणत्या निराळ्याच रोट्या-थापायला सुर्वात झाली हो..? ,,, Image removed. आरारारा.... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

;-)

मोदक
Fri, 09/21/2012 - 00:31 नवीन
;-)
  • Log in or register to post comments

व्वा...व्वा...! मोदका,,,काय

अत्रुप्त आत्मा
Fri, 09/21/2012 - 11:13 नवीन
व्वा...व्वा...! मोदका,,,काय योग्य येळी पतंग वर उचललास रे ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोदक

स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व.

सस्नेह
Fri, 09/21/2012 - 12:36 नवीन
पण स्पा भाऊ, तुमच्याकडून आणि एकंदरीत मिपावरील कोणाही सूज्ञ सदस्याकडून अशा पातळीवरील विडंबनाची अपेक्षा नाही. कोणतेही संस्थळ हे काही एकदम प्रगल्भ झाले नाही, होऊ शकत नाही. अगदी मिपासुद्धा याला अपवाद नसावे. पण म्हणून अजून विकसनशील असलेल्या संस्थळाला नावे ठेवणे अन तेही अशा उपहासात्मक लिखाणाने, हे मला वाटते मिपावरील उदार धोरणालासुद्धा शोभण्यासारखे नाही. मिपापेक्षासुद्धा वरचढ संस्थळे आहेत. त्यांनी मिपाबद्दल असेच लिहावे काय ? राग न मानता सूज्ञपणे विचार करावा.
  • Log in or register to post comments

>>राग न मानता सूज्ञपणे विचार

विश्वनाथ मेहेंदळे
Fri, 09/21/2012 - 13:34 नवीन
>>राग न मानता सूज्ञपणे विचार करावा. स्पा ने ??? हीहीही !!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सस्नेह

काय राव विमे... स्पा च्या बौध्दीक कुवती बद्दल शंका..??

मोदक
Fri, 09/21/2012 - 15:29 नवीन
काय राव विमे... स्पा च्या बौध्दीक कुवती बद्दल शंका..?? छ्या..!!!!! समज पाहिजे का तुला..? बोल बोल... समज द्यायला अपील करू...?? ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वनाथ मेहेंदळे

गुर्जिच्या आग्रहास्त्व वर

जेपी
गुरुवार, 04/17/2014 - 10:26 नवीन
गुर्जिच्या आग्रहास्त्व वर काडत हाय.
  • Log in or register to post comments

ह्हे..ह्हे..ह्हे.. पां

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/17/2014 - 11:41 नवीन
ह्हे..ह्हे..ह्हे..Image removed. पां डुब्बाचा एक जबरी धागा!!! =)) @(भा SSSSS सं भा SSSSS सं) जिल्बुषा नगरकर Image removed.घिसन मिंधे Image removed. >>> तेंव्हाचा अर्थ तेंव्हा..पण आता याच पां डुब्बास मी (प्र.भा SSSSS सं Image removed. प्र.भा SSSSS सं) नावानी या धाग्याचा उपशमनी Image removed. धागा काढावा..असे सुचवीत आहे. =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेपी

बुवांनी हा धागा वर आणाण्याचे

धन्या
गुरुवार, 04/17/2014 - 13:05 नवीन
बुवांनी हा धागा वर आणाण्याचे प्रयोजन कळले नाही. - अडाणी धन्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@ प्रयोजन कळले नाही.>>>

अत्रुप्त आत्मा
गुरुवार, 04/17/2014 - 19:30 नवीन
@ प्रयोजन कळले नाही.>>> =)) अगदी बरं झालं!!! :p
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

>>बुवांनी हा धागा वर

सूड
Fri, 04/18/2014 - 16:58 नवीन
>>बुवांनी हा धागा वर आणाण्याचे प्रयोजन कळले नाही. असेच म्हणतो. -संशयी सूड
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

दु...दु..खवट सुडूक!!!

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/18/2014 - 18:13 नवीन
:-/ दु...दु..खवट सुडूक!!! :-/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

दु दु मी नाय, तो तुमचा अगोबा!

सूड
Fri, 04/18/2014 - 18:35 नवीन
दु दु मी नाय, तो तुमचा अगोबा!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

@दु दु मी नाय>>> तू पण..तू

अत्रुप्त आत्मा
Fri, 04/18/2014 - 18:53 नवीन
@दु दु मी नाय>>> :-/ तू पण..तू पण!!! :-/ मला अठवला हा (दंगाImage removed.) धागा... पां डुब्बाचा! हेच कारण पुरे सं नै का??? :-/ आणि नसलं तर नसू दे... :-/ ज्जा!!! Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

गुर्जी रहस्यभेद करा हो .

जेपी
Fri, 04/18/2014 - 17:47 नवीन
गुर्जी रहस्यभेद करा हो . डब्बल सौंशयी -जेपी
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा