✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

(भा SSSSS सं भा SSSSS सं)

स
स्पा यांनी
Fri, 01/13/2012 - 09:33  ·  लेख
लेख
प्रेरणा: सो...हम....सो...हम!! उपाकर मित्रमंडळींनो, `खाईन मांडे ` नावाने उसळपाव वर वावरणारा त्रस्त समंध गेले काही दिवस, काही महिने कुठे गायब झाला, असा प्रश्न आपणांस पडला असणे साहजिक आहे. अर्थात, हा आपला माझा समज. `तुझ्यावाचून उपा ओस पडलंय रे बाबा, कधी परततोयंस` अशी आर्त साद मला कुणी खव किंवा टपाल हापिसातून घातलेली नाही. उपावर एकाहून एक सरस आणि सुरस संपादक असताना अस्मादिकांची विशेष दखल घ्यावी असे नाही. तरीही अस्मादिक कुठे होते, आणि सध्या काय करतायंत, हे सांगण्याचा हा आगाऊ प्रयत्न. गेले काही दिवस खाजवायला फुरसत नाहीये. खरड वहीत तर फिरकलो नव्हतोच, पण व्यानिलाही गंज चढलाय. गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे ." ऐसी लक्तरे लोळवीन" .निर्मात्या आहेत जिल्बुषा नगरकर आणि भावी संपादक (भा सं )मीच आहे . गेले काही महिने, वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने माझं जिणं हराम केलंय. लोक किती मूर्ख, नादान आणि अकलेचे खंदक असतात, हे या नावबंधूमुळेच मला कळलं. `तुमचा मुलगा उसळपाव वर आहे का हो?, सर्व कट्टे तो भरवतो कहो ? ते तुम्हीच का,` अशा उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण झालो होतो. अरे डोळेफुटक्यांनो, तुम्हाला देवानं जी पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं दिल्येत, त्यांच्यावरची धूळ झटकून कधीतरी ती वापरात आणा ना, असं कळवळून सांगावंसं वाटायचं. उसळपाव .कॉम , असं ढळढळीत अक्षरात लिहिलेलं तुम्हाला वाचता येत नाही का रे नतद्रष्टांनो, असं विचारायचं तोंडावर यायचं. पण कमावलेल्या सभ्यतेशी प्रामाणिक राहून मी गप्प राहायचो. आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!! आपलाच (भा .सं) खाईन मांडे
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मौजमजा

प्रतिक्रिया द्या
14249 वाचन

💬 प्रतिसाद (75)

प्रतिक्रिया

जबरदस्त. मस्त. हे गरजेचे

मराठी_माणूस
Fri, 01/13/2012 - 09:38 नवीन
जबरदस्त. मस्त. हे गरजेचे होते, धरणीवर आणायला.
  • Log in or register to post comments

तितकंस नाय जमलं गड्या.. पण

मराठमोळा
Fri, 01/13/2012 - 09:43 नवीन
तितकंस नाय जमलं गड्या.. पण "ऐसी लक्तरे लोळवीन" वाचून ठ्यॉ करून फुटलो.. :) (लोळवीन ऐवजी वाळवीन असेही चालले असते.)
  • Log in or register to post comments

च्यायला ,स्पावडी बाजार

पियुशा
Fri, 01/13/2012 - 10:14 नवीन
च्यायला ,स्पावडी बाजार उठ्वनार का आता माझा ;) ---/\---- बाकी तु पण तय्यार रहा ;) लवकरच एक विड्म्बन तुझ्यावरपण ;) ( जिल्बुशा नगरकर );)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

ऑ?

स्पा
Fri, 01/13/2012 - 10:18 नवीन
जिल्बुषा नगरकर तुम्ही हात असे तुम्हाला वाटते? ऐकाव ते नवलच ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

मा. पियुषातै, सदर विडंबन मा.

५० फक्त
Fri, 01/13/2012 - 10:22 नवीन
मा. पियुषातै, सदर विडंबन मा. स्पा यांचेपेक्षा वजनदार व एका शिट्टीत शिजलेले असावे ही नम्र अपेक्षा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हॅहॅहॅ. वाक्यावाक्यागणिक

प्रचेतस
Fri, 01/13/2012 - 09:43 नवीन
हॅहॅहॅ. वाक्यावाक्यागणिक हसतोय जाम. चांगलीच लक्तरे लोळवळीस की. जिल्बुषा नगरकर हे नाव वाचून तर खपायचाच बाकी राहलोय. --शिवेल पिंडे
  • Log in or register to post comments

@वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/13/2012 - 09:48 नवीन
@वर्षं " घीसन मिंधे" नावाच्या माझ्या नावबंधूने >>> धागा पेटविण्याचा १ दुष्ट प्रयत्न... ;-) @गुंतलोय एका वेगळ्या माध्यमात. >>> नविन माहिती ;-) @एका नवीन संस्थळाच्या निर्मितीसाठी काही महिने स्क्रीपटिंग साहाय्य करत होतो, >>>यामुळे ''अवघे धरू...'' नावाचे अजुन १ सं-स्थळ काढावे,असे आंम्हाला वाटू लागले आहे.. ;-) @आता माझ्या नावे एक स्वतंत्र संस्थळ प्रसिद्ध होऊ घातले आहे .">>>आजकाल आपल्या कुठल्याही वाक्यात स्थळ हा शब्द आला,की आंम्हाला अंमळ शंका येते... ;-)
  • Log in or register to post comments

ह्यॅह्यॅह्यॅ... १० पैकी ५

किसन शिंदे
Fri, 01/13/2012 - 09:50 नवीन
ह्यॅह्यॅह्यॅ... १० पैकी ५
  • Log in or register to post comments

@@@@@@@@@@ जबरदस्त भारीच रे @@@@@@@@@@

लीलाधर
Fri, 01/13/2012 - 09:51 नवीन
जबरदस्त आणि धमाल आली स्पावडू वाभाडं काढलय पार.................
  • Log in or register to post comments

वाभाडं काढलय पार कोणाचं रे???

किसन शिंदे
Fri, 01/13/2012 - 09:56 नवीन
वाभाडं काढलय पार
कोणाचं रे???
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

+१

स्पा
Fri, 01/13/2012 - 09:57 नवीन
कोणाचं रे??? हेच म्हणतो ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

+२ सांगा हो चचा, कुणाचं

प्रचेतस
Fri, 01/13/2012 - 11:28 नवीन
+२ सांगा हो चचा, कुणाचं वाभाडं काढलन्?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

अहो जाणकार

लीलाधर
Fri, 01/13/2012 - 11:32 नवीन
अहो जाणकार मिपाकरहो एवढे विडंबन करायला जमले, साद प्रतिसाद दिलेत आणि वर कोणाचे वाभाडे काढले म्हणून काय विचारता हो? :-P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

+१

मालोजीराव
Fri, 01/13/2012 - 15:44 नवीन
प्र का टा आ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

अरे कोणीतरी एक धागा काय काढला

५० फक्त
Fri, 01/13/2012 - 09:53 नवीन
अरे कोणीतरी एक धागा काय काढला मिपावर विडंबनं होत नाहीत म्हणुन आणि हे सुरु झालं, मस्त रे स्पावड्या मजा आली,
  • Log in or register to post comments

लगे रहो स्पाभौ!!

अन्या दातार
Fri, 01/13/2012 - 09:57 नवीन
लगे रहो स्पाभौ!!
  • Log in or register to post comments

जिओ मेरे लाल... बाकी

प्यारे१
Fri, 01/13/2012 - 10:03 नवीन
जिओ मेरे लाल... बाकी जाहिराती करणं बंद करा. कुठलं ते फुटकळ संस्थळ आणि त्याचा तू भावी संपादक... अरे हॅत लेका.
  • Log in or register to post comments

@कुठलं ते फुटकळ संस्थळ आणि

अत्रुप्त आत्मा
Fri, 01/13/2012 - 10:52 नवीन
@कुठलं ते फुटकळ संस्थळ आणि त्याचा तू भावी संपादक... अरे हॅत लेका ..>>> अत्यंत अस्सल प्रतिक्रीया... ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

:-D

मोदक
Fri, 01/13/2012 - 10:10 नवीन
:-D
  • Log in or register to post comments

*()&*(&^%^*)%^%$&^*^!

कवितानागेश
Fri, 01/13/2012 - 11:07 नवीन
*()&*(&^%^*)%^%$&^*^! :D
  • Log in or register to post comments

ऑल द बेस्ट..

गवि
Fri, 01/13/2012 - 12:53 नवीन
चालू संस्थळे पाहता त्यातील एकाचे आपण संपादक आहोत हे चारचौघांत कबूल करणं मोठं धाडसाचं काम आहे. त्याबद्दल कौतुक. ही फक्त सुरुवात आहे. बहुतेकवेळा नाईलाजाने जिलब्यांचा रतीब घालण्याने करियर सुरु करावी आणि चालू ठेवावी लागते. पण पुढे प्रस्थापित झाल्यावर काहीतरी विलक्षण वेगळं पक्वान्न आमच्यासमोर आणाल अशी आशा ठेवून आहे. All the best..
  • Log in or register to post comments

जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी ,

परिकथेतील राजकुमार
Fri, 01/13/2012 - 11:18 नवीन
जे लोक तुम्हाला उत्सुकतेनी , कौतुकानी विचारत होते.. "ते तुम्हीच का??" तेव्हा तुम्हाला लोक उथळ, बिनबुडाच्या आणि बाष्कळ प्रश्नांनी हैराण करणारे आणि डोळेफुटके वाटत होते... अता तुम्ही काही तरी उपटताय तर तेच लोक जेव्हा हाच प्रश्न विचारतील तेव्हा ते खुप हुशार, पंचेंद्रियं, ज्ञानेंद्रियं यावरची धुळ नित्य नियमाने झटकणारे वाटतील ना?? थोड नीट सांगितलं असतं ना तर आम्हाला पण तुमचं कौतुक वाट्लं असतं, की तुम्ही सं पादक आहात... असो.... मंगोलियन स्पायडर
  • Log in or register to post comments

'मंगोलियन स्पायडर' यान्च्याशी

मेघवेडा
Fri, 01/13/2012 - 14:47 नवीन
'मंगोलियन स्पायडर' यान्च्याशी अजिबात नाय जमत!! Image removed. "थोड नीट सांगितलं असतं ना तर आम्हाला पण तुमचं कौतुक वाट्लं असतं, की तुम्ही संपादक आहात.." हे नाय पटलं...... संपादकांच काय कौतुक वाटतं काय कुणाला कधी? लोकान्ना काय माहित की ते कात्री लावणारे 'घीसन मिन्धे' तुम्ही नाहीत!!... तुम्ही चिडियावाले... आणि "ते" घीसनदेखील ग्लॅमरक्षेत्राशी सम्बन्धित....त्यामुळे नॉर्मली लोकांचा गैरसमज होणे साहजिकच आहे.. पण त्यासाठी त्यांना तुम्ही सभ्यतेच्या मर्यादा पाळून "डोळेफुटक्या" वगैरे....दिलेली येवढी दूषणं "इथे" मान्डणं.... योग्य वाटत नाही.... आणि उलट आता तुमच्या सम्पादनामुळे या गोन्धळात भरही पडू शकते..... सम्पादन करायचात तुम्ही.. आणि चुकुन लोकान्ना वाटायचं.. की "त्या"घीसनने केलंय.... असो.. जोक्स अपार्ट... गुड लक फॉर युअर एडिटोरियल!!! ॥ श्लोकाचं विडंबन नाय करनार जा.॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

धन्य आहात!

असुर
Fri, 01/13/2012 - 15:40 नवीन
गवि - परा - मेवे, स्पायलू आपला विडंबनाच्या जिल्ब्या पाडतोय, त्याला तुमच्या प्रतिसाद-विडंबनाच्या पाकाचा आहेर पाहून जॉइंट-वेंचर असल्याचा भाSSSसं झाला ना रौ!!! ;-) स्पायलू, मित्रा, म .स्तविडंब न! काही संद .र्भ कळले ना हीत &पण दो(ष आ मच्या अल्पकाळच्या अज्ञा तवासाचा ध*रु न चालतो(. :-) --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

विडंबन अन प्रतिसादाचेही

पाषाणभेद
Sat, 01/14/2012 - 00:04 नवीन
विडंबन अन प्रतिसादाचेही विडंबन वाचून खुपच हसू आले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: असुर

काय रे आगाऊ मेवड्या.....

मृगनयनी
Fri, 01/13/2012 - 17:02 नवीन
काय रे आगाऊ मेवड्या..... ;) ;) .... छान विडम्बन कर्तोस्स !!!! आणि हो... "श्लोकांच विडम्बन" न केल्याबद्दल मन्डळ आभारी आहे! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मेघवेडा

:-)

मूकवाचक
Fri, 01/13/2012 - 11:21 नवीन
मस्त! - लखोबा लोखंडे
  • Log in or register to post comments

:)

मन१
Fri, 01/13/2012 - 11:26 नवीन
:)
  • Log in or register to post comments

स्पांडू.. तु गपच राहिलेला

यकु
Fri, 01/13/2012 - 11:42 नवीन
स्पांडू.. तु गपच राहिलेला बरा. अरे एकाच दगडात किती पक्षी मारशील? =)) =)) =))
  • Log in or register to post comments

स्पा .. मस्त लिखान रे .. आता

गणेशा
Fri, 01/13/2012 - 11:52 नवीन
स्पा .. मस्त लिखान रे ..
आता मात्र कुणी विचारलं, की `ऐसी लक्तरे लोळवीन `चा भावी संपादक तूच का रे बाबा, तर मी छाती पुढे काढून सांगू शकतो...हो, तो मात्र मीच!!
छाती पुढे काढताना त्रास तर नाहि होउन राहिलाय ना ? - मी उषा, मगर.
  • Log in or register to post comments

??

वपाडाव
गुरुवार, 01/19/2012 - 01:46 नवीन
छाती पुढे काढताना त्रास तर नाहि होउन राहिलाय ना ?
स्पावड्या, तु १६ चा झाला काय रे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: गणेशा

खल्लास !! दादा

सूड
गुरुवार, 01/19/2012 - 07:43 नवीन
खल्लास !! :D :D दादा कोंडकेंच्या पिक्चरातलं गाणं आठवलं . :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

मस्त रे

मस्त रवि
Fri, 01/13/2012 - 11:52 नवीन
मस्त रे
  • Log in or register to post comments

:-)

कुंदन
Fri, 01/13/2012 - 12:01 नवीन
मस्त रे स्पा !
  • Log in or register to post comments

:)

नरेश_
Fri, 01/13/2012 - 12:30 नवीन
:) फक्त एक 'हसरी*' पुरेशी... / / / *स्मायली. | | |
  • Log in or register to post comments

हा हा हा ... सही !!

सुहास झेले
Fri, 01/13/2012 - 13:49 नवीन
हा हा हा ... सही !!
  • Log in or register to post comments

मस्तच !

श्यामल
Fri, 01/13/2012 - 14:29 नवीन
स्पावड्या, आवड्या रे !
  • Log in or register to post comments

सर्वच प्रतिसाद

सूड
Fri, 01/13/2012 - 19:02 नवीन
सर्वच प्रतिसाद जबराट मिपाकरांच्या "ट्येम्प्युत" बसवण्याच्या कलेचा साला आपण फ्यान हौत अवांतर: हल्ली सर्वच झ , ट दर्जाची संस्थळे पहायचे घरातल्या सर्वानीच बंद केले असल्याने "णो comments !! " ztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztztzt गोभीप्लेट १/२ च्या प्रतिक्षेत
  • Log in or register to post comments

झैरात

तुषार काळभोर
Fri, 01/13/2012 - 20:17 नवीन
झैरात!! झैरात!!! नवीन संस्थळाची झैरात हितं करू नै!
  • Log in or register to post comments

ऐसी लक्तरे लोळवीन

सोम्यागोम्या
Fri, 01/13/2012 - 20:57 नवीन
ऐसी लक्तरे लोळवीन खो खो खो ! जबरी.
  • Log in or register to post comments

आवडेश

विशाखा राऊत
Fri, 01/13/2012 - 22:45 नवीन
एकदम धम्माल :)
  • Log in or register to post comments

प्रतिसादांचा महोत्सव

सूर्यपुत्र
Sat, 01/14/2012 - 10:50 नवीन
"मी एका संस्थळ निर्मितीचे प्रयत्न करतो रे बाबांनो" (`माझं कुठेतरी संस्थळ सुरू झालंय` या चालीवर वाचावे.) एवढा गहन संदेश देण्यासाठी हा धागा टाकला होता. त्यावर तब्बल ४३ हाकारे (प्रतिसाद) आलेले पाहून अक्षरशः भडभडून आलं. आत्ता नाक पुसत ही प्रतिक्रिया देतोय. असो. साधी गोष्ट असली, तरी साधेपणानं का सांगावी, या मूळच्या खवचट संस्थळी प्रवृत्तीला जागून थोडंसं शैलीदार (डोंबल!) लिहिण्याचा प्रयत्न केला होता. त्यातून ब-याच जणांच्या भावना दुखावलेल्या दिसतात. बाकी भावनांचा खेळ असलेल्या एखाद्या संस्थळाच्या निर्मितीत संधी मिळाल्याची माहिती देतानाच लोकांच्या भावना दुखाव्यात, हा समसमा संयोग!! असो. माझा धागा नीट वाचला असेल, तर हे सहज लक्षात येईल, की मी दुस-यांना दूषणं देण्याआधी स्वतःलाच त्रस्त समंध वगैरे म्हणून घेतलंय. एकदा स्वतःला शिव्या दिल्या, की मग जगाची अक्कल काढायला आपण मोकळे, हा आपला माझा एक (गैर)मसज. तर (तेही) असो. आक्षेप दुस-या कुणी घिसन मिंधेनी त्रास देण्याला, कट्ट्यांच्या माध्यमात असण्याला नव्हता, तर लोकांच्या बालबुद्धीला होता. असं कुणी विचारलं नसतानांही, खुलासे करायला माझी काहीच हरकत नव्हती, नाहीये. पण ढळढळीत अक्षरांत लिहिलेलं असताना ते न वाचताच तू अमक्या संस्थळावर लिहितोस का, तमक्या ब्लॉगवर लिहितोस का, असं विचारणा-या लोकांच्या डोळे झाकून काम करण्याला आक्षेप होता आणि असेल. हे म्हणजे `सोम्या गोम्या कापसे` असं नाव सांगितल्यानंतर `आम्ही लहान असताना आमच्या गावात गोम्या कापसे नावाचा एक बेवडा होता. तू त्याचाच मुलगा का रे,` असं विचारण्यापैकी आहे. अजूनही मी संस्थळासाठी लिहितो, असं म्हटल्यावर अच्छा अच्छा...अरे हो की. (माझा दुरान्वयेही संबंध नसलेल्या आणि कदाचित माझ्या नावबंधूने लिहिलेल्या) तमक्या ब्लॉगवर तुझं नाव वाचलंय, असं सांगणारे महाभागही थोडे नाहीत. त्यांच्यापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही...तर हेही असोच. बाकी, मी माजलोय, गर्व चढलाय, मस्ती आलेय, वगैरेसुद्धा काहींनी इथे आडून आडून किंवा थेट सुचवलंय. तर मी हवेत गेलेलो आहे, असं नम्रपणे सांगू इच्छितो रे बाबांनो. बाकी अधिक माहिती ज्यांना हवी असेल, त्यांनी वैयक्तिक संपर्क साधावा, ही (पुन्हा एकदा!) नम्र विनंती!! आपलाच (भा .सं) खाईन जोडे ;) ;) -सूर्यपुत्र.
  • Log in or register to post comments

किती तो सारवासारव करण्याचा

सूड
Sat, 01/14/2012 - 12:29 नवीन
किती तो सारवासारव करण्याचा प्रयत्न , जो छुंदे से गयी वो अचार से नही आती.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्यपुत्र

च्यायला, लै अवघड आहे पब्लिक. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 01/15/2012 - 21:57 नवीन
" ऐसी लक्तरे लोळवीन" या नव्या संकेतस्थळाची ओळख करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. ;) तीळगुळ घ्या गोड गोड बोला. :) -दिलीप बिरुटे (लंबर एकचा खोडसाळ सदस्य )
  • Log in or register to post comments

ठारलो

स्पा
Mon, 01/16/2012 - 09:15 नवीन
आईचा.. भेंडी..... =)) बिरुटे साहेब अगदी कोपरापासून हो............. __/\__
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अभिनंदन!

पैसा
Mon, 01/16/2012 - 00:14 नवीन
एका संस्थळाचं संपादनाचं काम करताय त्यासाठी अभिनंदन. पण दुसरा कोणी संपादक आहे म्हणून तुम्हाला वैषम्य वाटतंय का? स्पष्ट विचारते म्हणून रागवू नका. तुम्हाला जर काही करून दाखवायचं असेल तर कोणाला शिव्या देण्यापेक्षा "स्थळसंशोधनावर" लक्ष केन्द्रित करा.
  • Log in or register to post comments

पैसाताई, स्थळसंशोधनासाठी

५० फक्त
Mon, 01/16/2012 - 10:01 नवीन
पैसाताई, स्थळसंशोधनासाठी त्यांनी गावकुस पण ओलांडलं आहे आता, पार अटकेपार संशोधन चालु आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

हो का !!

सूड
Mon, 01/16/2012 - 10:09 नवीन
आम्हाला संस्थळं बघण्याची वेळ सुदैवाने येत नाही. सुदैवानेच म्हणावे लागेल अशी स्थळे दाखवली जातात असे ऐकिवात आहे. तुम्ही संपादक आहात हे समजल्याने स्थळसंशोधनाच्या पायर्‍या सांगू शकाल काय. विचार झाल्यापासून ते अस्तित्त्वात येईपर्यंत काय काय सोसावे लागते? नंतरचे सोसणे नको जीव करतात असे ऐकून आहे. दर्जा असा का झाला? आपले मत जाणून घेण्याची इच्छा आहे. तुम्ही केलेल्या स्थळसंशोधनात अस्तित्त्वात येईपर्यंत बदल होत गेले काय? तसे असेल तर उगीच स्थळाला प्रेक्षकांनी नावे का ठेवावीत? एकंदरीतच तुमची प्रगती वाचून भारी वाटलं. (नातू)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

देवरुखकर, असं दुसर्‍यांना

धन्या
Mon, 01/16/2012 - 10:21 नवीन
देवरुखकर, असं दुसर्‍यांना विचारुन काही फायदा नसतो. आपले भोग आपल्यालाच भोगावे लागतात. शेक्स्पियर म्हणून गेला आहे की "घर पाहावे बांधून आणि स्थळ पाहावे शोधून".
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

शेक्स्पियर म्हणून गेला आहे की

प्रास
Mon, 01/16/2012 - 11:11 नवीन
शेक्स्पियर म्हणून गेला आहे की "घर पाहावे बांधून आणि स्थळ पाहावे शोधून".
आयला, शेक्स्पिअरचं माहित नाय पण वरच्या वाक्याचा उत्तरार्ध धनाजीराव वाकड्यांच्या तोंडून ऐकल्यासारखं वाटतंय... ;-) बाकी, खूपदा विचारेन विचारेन असं म्हणत विचार केलेला होता की हे
मर्यादा एकशे अठ्ठावीस अक्षरांची. (हे ढाई अक्षर प्रेम के च्या चालीत वाचावे.)
अधोरेखित वाक्याच्या चालीत धनाजीरावांचं स्वाक्षरीवाक्य नेमकं कसं वाचावं? धनाजीरावांचा (होऊ घातलेला स्वयंघोषित) शिष्य,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा