मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्राणी, पक्षी आणि निसर्ग..

चिगो · · कलादालन
राम-राम मंडळी.. म्हटलं मिपावर जरा मी काढलेले काही फोटो डकवावेत. ही छायाचित्रे वेगवेगळ्या ठीकाणी काढलेली आहेत. तसेच पिकासामध्ये एडीट करुन छायाचित्रांमध्ये थोडी छाया (शॅडो) टाकलेली आहे.. (हॅ हॅ, उगाच आपला पाचकळ इनोद..) सुरुवात करतो काझिरंगातील गेंड्यांपासुन.. थोड्या रोमँटीक मुडमध्ये होते हे सकाळी सकाळी. रात का नशा असेल.. त्यांच्या जवळच्या पाण्याकडे बरोबर पाहीलतं, तर तुम्हाला पुरुष-प्राण्यांचा रोमान्सबद्दलचा अ‍ॅटीट्युड कळून येईल.. ती मारे लाडात त्याला खेटतेय, आणि गेंडूसाहेब आपले "स्वांतसुखाय वायुगमन" करताहेत.. ;-) इथे काझिरंगातले दुसरे मुख्य रहिवासी आहेत.. अ‍ॅलेप्पीला एका होम-स्टे मध्ये त्यांच्याकडील पिंजर्‍यात हा "चायनीज कोंबडा" होता. लैच रंगीबेरंगी.. कोचीच्या जेट्टीवर एका होडीवर हे साहेब होते. नाव माहीत नाही ब्वॉ.. जाणकारांनी सांगावे. हे दोन डोक्यांचं बदक.. आता जरा चिमणरावांची ऐट बघा.. हा माझ्या गावी घराच्या गच्चीवरुन पाहीलेला सूर्यास्ताच्या वेळीचा प्रकाश-सोहळा... आणि अ‍ॅलेप्पीजवळच्या मरारी बीचवर सूर्याची आणि ढगांची प्रकाश-लीला पुन्हा भेटूयात...

वाचने 11750 वाचनखूण प्रतिक्रिया 27

सुधांशुनूलकर 13/01/2012 - 16:36
सर्व छाचि फार छान. चिमणरावांचा क्लोजअप मस्त. छाचि ३ : हा गोल्डन फीजंट आहे. मुंबईच्या राणीबागेत पूर्वी होता. छाचि ४ : भुरा बगळा, वंचक, pond heron. कोणत्याही पाणाथळीजवळ हमखास दिसणारा.

सौरव जोशी 13/01/2012 - 19:18
चिमणराव फार आवडले, अगदी दिमाखदार सुचना: फ्रेमच्या मध्ये असायला हवे होते.... असो पण तरीही क्लास...!

In reply to by सौरव जोशी

चिगो 16/01/2012 - 11:13
सुचना आवडली.. फार जवळ न जाता आल्याने, झूम करतांना हात थोडा हलला व चिमणरावांची शेपटी उडाली.. :-(

Maharani 13/01/2012 - 23:01
आज काल चिमण्या दुर्मिळच झाल्या आहेत पुण्यात....त्यामुळे आता फोटोच काढुन ठेवावे लागतील त्यान्चे पुढ्च्या पिढ्याना दाखवायला................बाकी फोटो मस्त आले आहेत....

In reply to by प्रचेतस

अन्या दातार 17/01/2012 - 21:17
आज सूर्य पूर्वेला डुबला तर नाही ना? ओकांनी नाड्या/भानामतीचे धागे काढणे बंद तर केले नाही ना? मुंग्यांनी मनोगताचा सर्व्हर तर खाल्ला नाही ना? घासूगुर्जी जपमाळ तर घेऊन बसले नाहीत ना?? सोकाजीने दारु तर सोडली नाही ना?? प्रासने संशोधन तर सोडले नाही ना?? दाभोळकर, लागूंनी देव मानायला तर सुरुवात केली नाही ना? शंकराचार्य नास्तिक तर झाले नाहित ना? तरीसुद्धा गण्याला फोटो दिसले कसे?