मंद वारा रात्र चांदनी धुंद मी मधुमती
का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||
स्वप्न तुझेच सजविले स्वप्नातच रंगविले तुजला
स्वप्नातच मी रमले स्वप्न वेडी वृषला
का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||१||
प्रीत तुझी हवी हवीशी रोज मला वाटते
दिस न रात तुझी संगती होय मला भासते
प्रीतीच्या भावना शरदा त ही चिंब चिंब भिजल्या
का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||२||
मन धुंद धुंद वाट पाहते तुझी
कशी राहू सांग मी एकटी ?
हे विरहाच्या वाळूतील मृगजळा
का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||३||
मंद वारा बोचतो स्पर्श तुझाच हा
धगधगले अंतःमन घे जवळ घे मजला
रात्र चांदनी मिठीत घेउनी
चुकवू नको रे क्षणा
का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||४||
-----------------------------------------------------------------------------------------
"उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है
हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है"
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2277
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान उत्तम कविता.. असेच लिहित
'असेच लिहित राहा' म्हणजे
In reply to छान उत्तम कविता.. असेच लिहित by स्पा
नाही....
In reply to 'असेच लिहित राहा' म्हणजे by ५० फक्त
'असेच लिहित राहा' म्हणजे
In reply to 'असेच लिहित राहा' म्हणजे by ५० फक्त
वेगळं काय करायचं बाकी आहे,
In reply to 'असेच लिहित राहा' म्हणजे by स्पा
मज्यशी मयत्री कर्नर क? कल्जी