Skip to main content

प्रीत दे ना मजला ...

लेखक ajay wankhede यांनी मंगळवार, 10/01/2012 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
मंद वारा रात्र चांदनी धुंद मी मधुमती का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला || स्वप्न तुझेच सजविले स्वप्नातच रंगविले तुजला स्वप्नातच मी रमले स्वप्न वेडी वृषला का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||१|| प्रीत तुझी हवी हवीशी रोज मला वाटते दिस न रात तुझी संगती होय मला भासते प्रीतीच्या भावना शरदा त ही चिंब चिंब भिजल्या का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||२|| मन धुंद धुंद वाट पाहते तुझी कशी राहू सांग मी एकटी ? हे विरहाच्या वाळूतील मृगजळा का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||३|| मंद वारा बोचतो स्पर्श तुझाच हा धगधगले अंतःमन घे जवळ घे मजला रात्र चांदनी मिठीत घेउनी चुकवू नको रे क्षणा का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||४|| ----------------------------------------------------------------------------------------- "उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है"
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2277
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

'असेच लिहित राहा' म्हणजे एकदाचे पटकन कागद किंवा शाई संपुन जाईल असं म्हणायंचय का स्पावड्या तुला ?

In reply to by ५० फक्त

नाही. बहुतेक त्यांना... "उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है" असे म्हणायचे आहे.

In reply to by ५० फक्त

'असेच लिहित राहा' म्हणजे एकदाचे पटकन कागद किंवा शाई संपुन जाईल असं म्हणायंचय का स्पावड्या तुला ? चायला प्रोत्साहन द्यायला लागलो , तरी बोम्बलतात लोक.. ;) माताय, काय बर करावे आता :P