✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रीत दे ना मजला ...

A — ajay wankhede, Tue, 01/10/2012 - 13:56
मंद वारा रात्र चांदनी धुंद मी मधुमती का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला || स्वप्न तुझेच सजविले स्वप्नातच रंगविले तुजला स्वप्नातच मी रमले स्वप्न वेडी वृषला का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||१|| प्रीत तुझी हवी हवीशी रोज मला वाटते दिस न रात तुझी संगती होय मला भासते प्रीतीच्या भावना शरदा त ही चिंब चिंब भिजल्या का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||२|| मन धुंद धुंद वाट पाहते तुझी कशी राहू सांग मी एकटी ? हे विरहाच्या वाळूतील मृगजळा का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||३|| मंद वारा बोचतो स्पर्श तुझाच हा धगधगले अंतःमन घे जवळ घे मजला रात्र चांदनी मिठीत घेउनी चुकवू नको रे क्षणा का देतोस रे वेदना प्रीत दे ना मजला ||४|| ----------------------------------------------------------------------------------------- "उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है"

प्रतिक्रिया द्या
2269 वाचन

💬 प्रतिसाद (6)

छान उत्तम कविता.. असेच लिहित

स्पा
Tue, 01/10/2012 - 14:04 नवीन
छान उत्तम कविता.. असेच लिहित राहा
  • Log in or register to post comments

'असेच लिहित राहा' म्हणजे

५० फक्त
Wed, 01/11/2012 - 23:18 नवीन
'असेच लिहित राहा' म्हणजे एकदाचे पटकन कागद किंवा शाई संपुन जाईल असं म्हणायंचय का स्पावड्या तुला ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

नाही....

प्रभाकर पेठकर
गुरुवार, 01/12/2012 - 10:20 नवीन
नाही. बहुतेक त्यांना... "उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है" असे म्हणायचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

'असेच लिहित राहा' म्हणजे

स्पा
गुरुवार, 01/12/2012 - 16:11 नवीन
'असेच लिहित राहा' म्हणजे एकदाचे पटकन कागद किंवा शाई संपुन जाईल असं म्हणायंचय का स्पावड्या तुला ? चायला प्रोत्साहन द्यायला लागलो , तरी बोम्बलतात लोक.. ;) माताय, काय बर करावे आता :P
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

वेगळं काय करायचं बाकी आहे,

५० फक्त
गुरुवार, 01/12/2012 - 19:28 नवीन
वेगळं काय करायचं बाकी आहे, प्रतिक्षा करत आहात ना ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

मज्यशी मयत्री कर्नर क? कल्जी

विजुभाऊ
गुरुवार, 01/12/2012 - 16:08 नवीन
मज्यशी मयत्री कर्नर क? कल्जी घेने हे हे हे.... ची प्रकर्षाने आठवण झाली
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा