✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

पुण्यातली स्थळे ( फिरस्ती साठी)

व
विजुभाऊ यांनी
Tue, 04/29/2008 - 16:48  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
30084 वाचन

💬 प्रतिसाद (70)

प्रतिक्रिया

तिथेच,

स्वाती राजेश
Tue, 04/29/2008 - 16:56 नवीन
बनेश्वर च्या फाट्याच्या जवळ डाव्याबाजुला बालाजीचे मंदीर आहे.
  • Log in or register to post comments

जवळ नाही/ केतकावळा

आनंदयात्री
Tue, 04/29/2008 - 16:59 नवीन
५-६ किमी तरी नक्कीच असेल. केतकावळाचा बालाजी म्हणुन प्रसिद्ध आहे, एका हॅचरी फर्मचा त्याच्या उभारणीत मोठा सहभाग असल्याचे एकिवात आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

अजुन एक ठिकाण

टारझन
Fri, 08/01/2008 - 12:23 नवीन
पुण्याच्या मुळा-मुठेच्या नैसर्गिक ठिकाणांस ईसरलात का ? .. झ-पुल ऊतरून खाली गेलं की मुळा(की मुठा?) च्या स्वच्छ पात्रात प्रवेश होतो... समोर ईतके स्वच्छ चॉकलेटी काळसर पाणी पाहून आपल्याला या नदीच नाव ऍक्वाफिना किंवा बिसलेरी का नाही असा प्रश्न पडतो... आजु बाजुला असलेले लोक्स तिथेत तुळस लावत असतात. त्यामुळे आपल्याला सुंदर मनमोहक तुळशीचे शेत दिसते. मग त्या वातावरणातला सुगंध ... आहाहाहा !! मृगाची कस्तुरी काय करता हो ? एकदम बेस !! मग असेच तुळशीच्या शेतातुन सावध पणे वाट काढत पुढे निघावे ... मस्त रमनिय स्थळ आहे पुण्यात... एकदा गेलात की पाय निघत नाही तिथुन./... आणि परत परत जावेसे वाटते ... टारझन (गेल्या जन्मीचा खविस) (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती राजेश

थोडे पुण्यापासून दूर..

स्वाती राजेश
Tue, 04/29/2008 - 17:01 नवीन
ठोसेघरः साधारण पुण्यापासून सातार्‍याकडे १००/१२५ कि.मी. आहे.
  • Log in or register to post comments

ताम्हीणी

मनस्वी
Tue, 04/29/2008 - 17:04 नवीन
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. चांदणी चौकातून पौड गावाकडून पुढे ६० किमी.
  • Log in or register to post comments

अरसिकता (?)

प्रभाकर पेठकर
Tue, 04/29/2008 - 18:29 नवीन
पावसाळ्यात ताम्हीणीच्या घाटात काय जबरा मजा येते.. भुरभुर पाऊस.. धुकं.. हिरवा हिरवा घाट.. धबधबे.. गार गार वारा.. झुळझुळ पाण्याचा आवाज.. उन्हाचा लपंडाव.. सारंच छान असतं. आणि जोडीला वडापाव अन् भजी. अरेरे! इतके नितांत सुंदर वातावरण आणि जोडीला नुसती वडापाव आणि भजी? जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

भौगोलीक ठिकाण

विजुभाऊ
Tue, 04/29/2008 - 18:38 नवीन
ओ पेठकर काका मी सुरुवातीलाच स्थळे याची व्याख्या प्रेक्षणीय भौगोलीक ठिकाण अशी दिली आहे. :))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आमचं कारभारी

मनस्वी
Tue, 04/29/2008 - 18:45 नवीन
जोडीला असावा/असावी तितकाच रसिक जोडीदार किंवा जोडीदारीण (अगदी कारभारी आणि कारभारीणही चालेल).
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

पटले...

प्रभाकर पेठकर
Tue, 04/29/2008 - 18:54 नवीन
अहो काका.. ते तर बाय डिफॉल्ट असणारच.. त्यांच्याच तर मागे बसून जाणार ना पटले, पण त्यांना अनुल्लेखाने मारलेत म्हणून जरा हृदयात कळ उमटली. माझ्या बायकोला कधी कधी सांगावे लागते, 'मॅडम, मैं आपका पती हूं। ड्रायव्हर नही।'
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

:)

मनस्वी
Tue, 04/29/2008 - 18:58 नवीन
:D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

मुळशी

मनस्वी
Wed, 04/30/2008 - 11:47 नवीन
ताम्हीणी लांब वाटत असेल तर त्याच रस्त्यावर पौडपासून पुढे १०-१५ किमी वर मुळशी लागते. पावसाळ्यातच जाण्यात मजा आहे. तलाव, झरे आणि वृक्षवल्ली आणि हादडायला भरपूर ढाबे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

आणि हे

धमाल मुलगा
Wed, 04/30/2008 - 11:57 नवीन
आणि हे सगळं बोअर झालं तर जाऊ आमच्या मित्राच्या फार्महाऊसवर... निस्ता धूमाकूळ !!! आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

मस्त!

मनस्वी
Wed, 04/30/2008 - 12:01 नवीन
आणि पाण्यात होडी नेऊन होडीत बसुन जेवू
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

ही कल्पना

धमाल मुलगा
Wed, 04/30/2008 - 12:12 नवीन
ही कल्पना मस्त.. मस्त होडीत बसून मी गरम गरम मटण-भाकरी-रस्सा-कांदा चोपतीये!
हवं असल्यास त्याचा कुक तांबडा-पांढरा रस्सा पण बनवून देतो... आता बोल! मस्त स्पिरिटच्या दिव्यावर मंद आगीवर सगळं अन्न गरमागरम राहतं आणि ..... आयचा घो रे.....भाकरी कुस्करुन त्यावर रस्सा घालून हादडायचं....सोबतीला दहीकांदा, आणि बुक्कीनं फोडलेला कांदापण..जोडीला तोंडी लावायला खीमा..... =P~ =P~ =P~
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

सहीच रे धम्या

मनस्वी
Wed, 04/30/2008 - 12:18 नवीन
B) बेष्ट
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ

किचेन
Tue, 01/10/2012 - 18:26 नवीन
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल. आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

<पिकोक बेची पती> "ची" पती की

हंस
Wed, 01/11/2012 - 13:33 नवीन
<पिकोक बेची पती> "ची" पती की "चा" पती? <बदमिन्तन खेळायची सोय आह>...... अय्या मलापण खेळायचे बदमिन्तन....... पण कसे खेळतात हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

च्यायला !

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 01/12/2012 - 18:53 नवीन
किचेन मावशी अहो हा प्रतिसाद आहे का विनोद ?
मुळशीला कोणत्याही ऋतूत जाऊ शकतो.प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटते.मी उन्हाळ्यात गेलीये,पावसाळ्यात गेलीये, थंडीत तर आह्हां ....सगळीकडे धुक...गरम चहा आणि भाजी.लय भारी.मला प्रत्येक ऋतूत मुळशी बेस्टच वाटल.उन्हाळ्यात चमचमणार पाणी बघितल्यावर भारी वाटल.
चहा आणि भाजी ? हा कुठला पर्याय आहे ?
आणखीन एक पर्याय आहे.खडकवासला.खडकवासल्याला पाठीमागच्या बाजूने गेल्यावर पिकोक बेची पती दिसल्यावर आणखीन थोडे पुढे जायचे तिथे एक सोलिड ढाबा आहे.इथे जाताना तुम्ही आधीच शीतपेय किवा खायला घेऊन जा कारण इथे सगळ प्रचंड महाग मिळत.पण जागा छान आहे.इथे काही टेन्ट उभारलेत.तिथे बसून एकांताचा आनंद घ्या, किवा बदमिन्तन खेळायची सोय आहे.एकदा जाऊन जा.छान आहे.
पिकोक बेची पती ? आणि ढाब्यावरती सगळे महाग मिळते म्हणूण बाहेरुन शीतपेय आणि खायला घेउन जायचे ? =)) =)) हाणेल की धरुन धाबेवाला. बदमिन्तन ? 'बदनाम झालेले चिंतन' ह्या अर्थाचा शब्द वाटला हा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

पावसाळ्यातच..

मनस्वी
Tue, 04/29/2008 - 17:10 नवीन
वरंधा घाटात जायचं.. आणि पायवाटेने झाडाझुडपातून, झर्‍यांमधून, खाचाखळग्यांतून सरळ खाली शिवथरघळीपर्यंत चालत यायचं.. सही वाटतं.
  • Log in or register to post comments

कसे ?कोठे जायचे ? तेथे काय पहायचे ते लिहा

विजुभाऊ
Tue, 04/29/2008 - 18:12 नवीन
कसे ?कोठे जायचे ? तेथे काय पहायचे ते लिहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मनस्वी

शिवथरघळ

ध्रुव
Tue, 04/29/2008 - 18:16 नवीन
वरंधा घाट जवळ जवळ निम्म उतरुन गेल्यावर उजवीकडे घाट उतरायच्या रस्त्यातच एक छोटा रस्ता जातो. येथे माझ्या आठवणीप्रमाणे एक पाटी आहे शिवथरघळकडे. पाटी निट दिसेल अशी नाहीये त्यामुळे चुकायची शक्यता आहे. हा कच्चा रस्ता आपल्याला थेट शिवथरघळीकडे घेउन जातो. मोठी गाडी जाणार नाही पण छोट्या गाड्या अथवा मोटारसायकल नक्की जाते. पावसाळ्यात हा रस्ता पकडुन शिवथरघळ गाठणे म्हणजे एक मस्त अनुभव आहे. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

मोठ्या गाड्या....

प्रभाकर पेठकर
Sat, 05/03/2008 - 09:23 नवीन
मोठ्या गाड्याही जाऊ शकतात/जातात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

संधिपाद प्राणि संग्रहालय......

केशवराव
Tue, 04/29/2008 - 17:26 नवीन
शनीवार वाड्याजवळच , दक्षीणाभिमुखी मारुतीजवळ केतकर आणि जोशी यांनी उभारलेले ' संधिपाद प्राणि संग्रहालय' आहे. तिथे फक्त संधिपाद वर्गातीलच प्राणि पहायला मिळतील.
  • Log in or register to post comments

आयला, नक्की

धमाल मुलगा
Tue, 04/29/2008 - 17:33 नवीन
आयला, नक्की कुठे हो केशवराव? माझ्या अगदी ढुं**जवळ आहे हे ठिकाण...पण जळ्ळं माहितीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

डावीकडे

लिखाळ
Tue, 04/29/2008 - 17:56 नवीन
दक्षिणाभिमुखी मारुतीचे दर्शन घेवून झाले की डावीकडे पाहावे. तेथेच तो वाडा आहे. --(द्विपाद) लिखाळ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

धन्यवाद

धमाल मुलगा
Tue, 04/29/2008 - 18:20 नवीन
धन्यवाद लिखाळशेठ! आता भेट देऊनच बघतो. -(मी सुध्दा द्विपाद) ध मा ल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लिखाळ

भेटवर्णन

आंबोळी
Tue, 04/29/2008 - 22:05 नवीन
धमु, भेट देउन झाल्यावर भेटवर्णन जरूर लिहा. बाकिच्याना उपयोगी पडेल. तसेच बाकिच्यानी नुसती नावे सुचवण्याऐवजी तेथे जाउन आल्याचे अनुभव सांगितल्यास हा जास्त मदत होइल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

टोटल अवांतर...

भडकमकर मास्तर
Wed, 04/30/2008 - 16:20 नवीन
संधिपाद हा शब्द शाळेनंतर बर्‍याच वर्षांनी उच्चारला..... परत परत म्हणून काय मज्जा वाटते... :SS अहाहा, काय ते शब्द..... सन्धिपाद, डिंभक, ग्रसनीमध्यकर्णनलिका,आंत्रपुच्छ... ( शाळेत मराठीत जीवशास्त्र शिकलेला) भडकमकर..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवराव

अळंबी

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 08/01/2008 - 12:48 नवीन
मला अळंबी हा शब्द उच्चारायला आणि प्रत्यक्षात खायलाही आवडतो ... कधीमधी मोठ्ठ्या मॉलमधे जाऊन मी अळंबी (मश्रूम) मागते ... लई धम्माल येते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

अ ) कार्ला -

आर्य
Tue, 04/29/2008 - 17:26 नवीन
अ ) कार्ला - भाज्या च्या लेण्या हा पण ऐक चांगला पर्याय आहे. रेल्वेने कार्ल्या पर्यंत जाता येतं किंवा जुना मुंबई रस्त्याने ही जाता येते. फक्त ५० कि.मी पावसात जायला ऐक वेगळीच मजा आहे. ब) शिवथर धळ - सह्याद्रीच्या कुशीत विसावलेलं निरव शांत, डोगर, गर्द दाट झाडी आणी धबधब्यांनी वेढ्लेलं ठिकाण. (रामदास स्वामींनी दासबोध ऐथेच लिहीला होता) अंदाजे ९० कि. मी. भटकंती प्रिय (आर्य)
  • Log in or register to post comments

मनस्वी, दोन्ही ठिकाणं मस्तच..

धमाल मुलगा
Tue, 04/29/2008 - 17:29 नवीन
थोडंसं दूर जायची तयारी असेल तर पुण्याहून सासवडला जावं (३०किमी) तिथून साधारणतः १३ कि.मी.वर पुरंदर गड आहे...केवळ अप्रतिम!!! चढायला अतिशय सोपा, आणि एकदम हिरवाकंच.... परताना, पुरंदर पायथ्यापासून साधारण ६ कि.मी.वर असलेले नारायणपूरचं मंदीरही छान. सिंहगड रस्त्यावर पु.ल.देशपांडे उद्यान देखील अगदी जाऊन येण्यासारखं.
  • Log in or register to post comments

पुरंदर

ध्रुव
Tue, 04/29/2008 - 17:45 नवीन
पुरंदर मस्तच. पायथ्याचे एक मुखी दत्तच्या मंदिराबरोबरच त्याशेजारचे स्वयंभू शकराचे मंदिरही छान आहे. पुरंदरला गेलाच तर वज्रगड, केदारेश्वर न विसरता बघायलाच हवे :) -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं

मालोजीराव
गुरुवार, 01/12/2012 - 18:02 नवीन
पुरंदर अप्रतिमच....शंभूराजाचं जन्मस्थान...किल्ल्यावरची पुरंदरेश्वर,केदारेश्वर मंदिरे पाहण्यासारखी... पायथ्याजवळ असलेल्या नारायणपूर येथील प्राचीन नारायणेश्वराचे आणि एकमुखी दत्ताचे मंदिर हि सुंदर ! - मालोजीराव (पुरंदरकर)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

बेडसे

ध्रुव
Tue, 04/29/2008 - 17:42 नवीन
बेडसे भुलेश्वर त्रिशुन्ड्या मंदिर - मंगळवार पेठ शिरवळची लेणी - ५५ किमी मस्तानी तलाव - २५ किमी भिगवण - पक्षी अभयारण्य - ९० किमी कवडी - पक्षी निरीक्षणासाठी कर्नाळा - पक्षी अभयारण्य - अंदाजे ११० चाकणचा किल्ला चाकणजवळचे वराह मंदिर पाषाण तलाव - - पक्षी निरीक्षणासाठी ;) सोनोरीचा वाडा व भुयार सोनोरीचा किल्ला - मल्हारगड वाईजवळचा घाट - मेणवली निघोजची रांजणखळगी वाईजवळ पांडवगड व गडाच्या पोटातील लेणी सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता... -- ध्रुव
  • Log in or register to post comments

आयला,

धमाल मुलगा
Tue, 04/29/2008 - 17:47 नवीन
जबराट रे!!! ध्रुव भौ!!! अरे काय कधी घरी असतोस की नाही? डायरेक्ट पायाला भिंगरी? एका वट्टात भास्सकन्न इतकी ठिकाणं सांगून मोकळा, वर आणि
सध्यातरी इतकीच आठवत आहेत आत्ता...
हे? लय भारी...भेटायलाच पाहिजे तुला...आपल्यासारखाच भटक्या दिसतोयस. -(भटकमल्हारी) ध मा ल. डिस्क्लेमरः भटक'भवानी' ला पुल्लिंगी शब्द सापडला नाही म्हणून मल्हारी वापरला. हेतू भावना दुखावणे नाही. आमच्याही भावना मल्हारीमार्तंडाच्या पायाशी रुजु आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ध्रुव

पाषाण तलाव

आनंदयात्री
Tue, 04/29/2008 - 17:51 नवीन
आमच्या ध्रुवाला झाडावरच्या पक्षिनिरिक्षणाचा छंद आहे हे माहितीये, पण हे पाषाण प्रकरण छानच, धम्या ध्रुवाला घेउन पहिल्यांदा तिकडेच जाउ !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

केळकर संग्रहालय

मनस्वी
Tue, 04/29/2008 - 17:49 नवीन
शुक्रवार पेठ.
  • Log in or register to post comments

पुनवडी ते पुणे

लिखाळ
Tue, 04/29/2008 - 17:58 नवीन
विश्रामबागवाड्यामध्ये कायमस्वरुपी 'पुनवडी ते पुणे`' हे प्रदर्शन असते. (कोणी पाहिले आहे का? माझे राहून गेले :( ) वाडा आणि प्रदर्शन असा दुहेरी हेतू साध्य होईल. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

शिंव्हगड....

ब्रिटिश टिंग्या
Tue, 04/29/2008 - 18:14 नवीन
विसरलात बरे!
  • Log in or register to post comments

सिंहगड

ध्रुव
Tue, 04/29/2008 - 18:18 नवीन
सिंहगड विसरणे केवळ अशक्य आहे :) पण हल्ली जरा जास्तच गर्दी असते. त्यामुळे कधी कधी गड बघण्याचा विचका होतो. -- ध्रुव
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ब्रिटिश टिंग्या

मावळसृष्टी!

प्रमोद देव
Tue, 04/29/2008 - 21:04 नवीन
पुण्याजवळच आहे. हे त्यांचे संकेतस्थळ पाहा. सकाळी जाऊन संध्याकाळी परतता येते. तिथे राहण्याची आणि जेवणाचीही व्यवस्था आहे. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

आयला

ब्रिटिश टिंग्या
Tue, 04/29/2008 - 21:48 नवीन
चांगलचं महाग आहे.... #o
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देव

रेल्वे म्युझीयम (कर्वे रोड - संगम प्रेस ) काही झकास नाही

अप्पासाहेब
Wed, 04/30/2008 - 11:07 नवीन
कळकट , मळकट भिंती, उखडलेल्या फरशा, कोळीष्टकं आणि कुबट वास. बघण्यासारखे काहि नाही , माडेल ट्रेन बद्द्ल काहीच माहीती मिळत नाही. विक्री साठी ठेवलेल्या ट्रेन तद्द न चीनी बनावटीच्या व अवाच्यासवा महाग. त्या पेक्षा राजा केळकर संग्रहालय उत्तम आहे.
  • Log in or register to post comments

हे घ्या...

इनोबा म्हणे
Wed, 04/30/2008 - 12:13 नवीन
पुण्यातील प्रेक्षणिय स्थळे(फि'रस्त्यांसाठी) नळस्टॉप चौकः आजूबाजूला जे दिसेल ते बघा.बाजूलाच अप्पाचे हाटील असल्याने खाण्यापिण्याची उत्तम सोय. गुडलक चौकः शक्यतो संध्याकाळी जा,बघण्यासारख्या भरपूर प्रेक्षणिय गोष्टी ;) मरेस्तोवर खाता येईल एवढी हाटीलं आहेत.चिंता नको. अलका चौकः पुण्याच्या रहदारीचे तीन तेरा वाजलेले दूपारी बारा ते रात्री नऊ कधीही येऊन पहा, हे पाहून बोर झालं तर शेजारीच अलका टाकीत जाऊन तीला पहा....स्वारी....पिच्चर पहा.इंटरवलला खायची सोय होईल,वांधा नाय. कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

आरे दाद्या...

धमाल मुलगा
Wed, 04/30/2008 - 12:19 नवीन
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते :)) अरे पण विजुभाऊ विचारताहेत ते पाहूण्यांना घेऊन जायला...दोस्तांना नाय..तेच जर असतं तर तिच्याआयला त्याला प्रेक्षणिय स्थळं कशाला हवीत? मोप ठिकाणं पडलीयेत दोस्तांना घेऊन जायला...आन् ती सगळ्यांना ठाऊक आहेतच की ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

फर्ग्युसन

इनोबा म्हणे
Wed, 04/30/2008 - 12:27 नवीन
फर्ग्युसन रोड राहिलं की... ऐन विकांताला भर संध्याकाळी....बाब्बोय...लै मजा येते अरे म्हणून तर गुडलक चौक म्हटलो ना! कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं : कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये. -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

फर्ग्युसन? "अपाची" कस वाटत मग?

मन
Wed, 04/30/2008 - 17:15 नवीन
"अपाची" कसं वाटत मग? जमायचं का तिह्ते? पुर्वि गेलो होतो,पण साला मिस्रुडही फुट्लं नसल्याने(आणि चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इनोबा म्हणे

आपाची????

धमाल मुलगा
Wed, 04/30/2008 - 17:21 नवीन
:) भौ...आपाची है आपल्याच बापाची !!!! कधी पण चालेल रे......
चेहर्‍यावग्राहक""संभाव्य ग्राहक" अजिबात वाटत नसल्यानं हाकलुन दिलं होतं त्यांनी.
आरारारा....लै च पोपट झाला म्हण की :) आता नाय देणार...तिच्याआयला, आपण कशाला हौत? मिसरुडच काय, येड्या मलापण असे अनुभव यायला लागले म्हणून हनुवटीवर कुंचा राखलाय :)) आता कोण नाय अडवणार.... तू येच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन

च्यायला धम्या , मी तुला पाहिलं आहे ..

छोटा डॉन
Wed, 04/30/2008 - 17:30 नवीन
च्यायला धम्या तू तिकड यायचा का ? मग मी तुला नक्की बघितलं असलं राव, कारण मागचे ८ महिने सोडले तर गेली"२ वर्षे" आम्ही आठवड्यातन कमीत कमी २ वेळा तिकड पडीक होतो ... अजून त्यांचा मॅनेजर व वेटर ओळखतात आपल्याला ... मी आणि माझा एक मित्र, पर हेड एक "अपाची टोरंटो" संपवल्याशेवाय उठत नव्हतो ... त्यानंतर "चैतन्यचा" पराठा ... मी तुला नक्की पाहिलं आहे मग राव ... छोटा डॉन [ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ] बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आयला, असु

धमाल मुलगा
Wed, 04/30/2008 - 17:43 नवीन
आयला, असु शकेल यार! आम्ही आपले गपचीप स्मिरनॉफ विथ कोक हाणायचो...आणि वर एक-एक सनराईज टकीला :) च्यायला, तू कुठं रे बसायचास? ग्राउंड फ्लोअर का फर्स्ट? आमी फर्स्टला आतल्याबाजूला असायचो :) घ्या...ह्यालाच म्हणत असावेत... "समान व्यसनेषु खलु सौख्यं "
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा