Skip to main content

तू आठवत राहतेस...!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 10/01/2012 14:36 या दिवशी प्रकाशित केले.
कसे भास होत असतात मला कसे कसे सुंगध पसरतात मनात माझ्या तू आठवत राहतेस संध्याकाळी तिन्हीसांजेला, कशी हलके हलके उतरतेस मनात माझ्या ह्या खिन्न वेळी ,कातरवेळी अलगद पावलांनी किती दूर आहेस तू नि मी असा परदेशी फक्त एकटा माझ्या खिडकीतून बघत बसतो हे खिन्न आभाळ नि घराकडे परतणारी पाखरे तुझ्या आठवणीने किती काहूर उठतात मनात माझ्या नि किती व्याकुळ होऊन जाते मन माझे गच्च कल्लोळ नुसता मी गुदमरून जातो तुझ्या आठवणीत मग कधीतरी अचानक नेटवर बोलताना दिसू लागतो मला देवघरातील दिवा नि तुझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव किती सहजपणे सहन करीत असतेस तुझे एकटेपण . मुलाना सांभाळीत हे सगळे आठवून हलकेच कल्लोळ कमी होऊ लागतो माझ्या मनातला नि हलके हलके शांत होऊन जाते मन मग अलगद उतरते संध्याकाळची प्रार्थना पाखरासारखी निशब्दपणे पंख मिटून झाडा -पानात हरवून जाते तसे तुझ्यां प्रार्थनेच्या स्वरांनी माझेही मन होऊन जाते निशब्द मन मिटवून प्रार्थनेच्या स्पंदनात आत्ममग्न ...!!
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1697
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

लै भारी हो प्रकाशदादा...वाचल्यावर कसं शांत..शांत..निर्मळ आणी समाधी लागल्या सारखं वाटतय..