गोष्ट छान आहे.
>> माझ्या आयुष्यातल्या अडचणीना मी सामोरे जाण्यासाठी मला त्यांच्याशी दोन हात न करता,त्याना वाट देवून बाजूला होणं जमू शकलं.प्रवाहाबरोबर जाण्याचं आणि भोंवर्यात मिळाल्यावर तरंगून घेणं, मी माशाकडून शिकलो.
इथे कथानायक अडचणींना कसा सामोरा गेला हे अजून तपशीलासकट स्पष्ट व्हायला हवे होते. मग कथेला अजून उठाव आला असता असे मला वाटते.
पक्याजी,
आपलं म्हणणं बरोबर आहे.मी जे हे खालिल वाक्य लिहिलं आहे ते जास्त स्पष्ट करायला हवं होतं.खरं म्हणजे त्या वाक्यातून मला अर्थ थोडासा विचार केल्यावर लक्षात आला होता तो असा.आणि मी तो टेकन फॉर ग्रॅन्टेड धरला.
"माशांना खवळत्या प्रवाहात सुद्धा पाण्याच्या भोंवर्यात स्नायुंचा कमीत कमी वापर करून तरंगण्याची क्षमता असते."
म्हणजे शेवटी भोंवर्यात सापडल्यावर माशाने आपल्या अवगत असलेल्या स्नायुचा कितीही उपयोग केला असता तरी त्याचे प्रयत्न फोल ठरले असते.कारण भोंवरा खूपच शक्तिमान असतो.
अशावेळी मासा त्या भोंवर्यात उताणे पडून स्वतःला झोकून देतो त्यामुळे नकळतच तो भोंवर्याच्या फिरण्यात बाहेर फेकला जातो आणि अशा तर्हेने आपली सुटका करून घेतो.
भोवरा ही माणसाची अडचण समजली तर त्या अड्चणीत असंच माश्या सारखं केलं तर उगाच अडचणीत जास्त धडपड नकरता आपली सुटका करून घेता येईल.असा तो संदेश होता.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
अर्थात हे कोकणातल्या समुद्रतटांवर तितकेच खरे आहे - पण "मौजमस्ती" करायला गोव्यात अधिक तरुण येतात. दरवर्षी उलट्या प्रवाहात अडकून काही तरुण मरण पावतात. दरवर्षीच हे आकडे ऐकून मन निबर झाले होते - या वर्षी माझ्या एका मित्राचा पंचविशीतला धाकटा भाऊ असाच वारला, तेव्हा पुन्हा काळजाला ठेच लागली.
समुद्रकिनार्याला जाताना हा धडा लक्षात ठेवावा. बहुतेक ठिकाणी समुद्राच्या लाटा जितक्या आत नेतात, तितक्याच बाहेर ढकलतात. त्या तुम्हाला आत नेऊन बुडवत नाहीत.
किनार्याच्या काही विशिष्ट भागांत (किनार्याच्या, खालील खडकांच्या आकारामुळे असेल) किनार्याकडून खोल जाणारे प्रवाह निर्माण होतात - एखाद्या ओढ्यासारखे - त्याच्या बाजूलाच आतून पाणी किनार्याकडे (बाहेर) ढकलणारे प्रवाह असतात. ते तितके जोरदार नसतात. खोल नेणार्या प्रवाहाची शक्ती प्रचंड असते - त्याच्याविरुद्ध अगदी बलदंड पैलवानही लढू शकत नाही. तर असा प्रवाह तुम्हाला किनार्याकडून दूर पश्चिमेला ओढत असेल, तर त्याच्याविरुद्ध पूर्वेला पोहायचा प्रयत्न करू नये. स्नायू थोड्याच वेळात दमून काम द्यायचे थांबतील. पण प्रवाहाच्या काटकोनात (उत्तरेकडे, किंवा दक्षिणेकडे) पोहायचे. तुम्ही म्हणाल "असे कसे? किनारा तर पूर्वेकडे आहे..." पण तो शक्तिशाली प्रवाह काटकोनात जायला तुम्हाला प्रतिबंध करणार नाही, आणि त्या प्रवाहातून तुम्ही बाहेर पडू शकाल. प्रवाहाच्या बाजूचे उलट-प्रवाह तुम्हाला सापडले तर फारच उत्तम ! - ते प्रवाह तुम्हाला किनार्याकडे नेतील. नाही सापडले तरी ठीक - शांत पाण्यात हळूहळू किनार्याच्या दिशेने पोहता येते.
श्रीकृष्ण सामंत यांच्या लेखात भोवरा/प्रवाह रूपक आहे, ते रूपक प्रभावी आहे. पण ही माहिती खराखरचा जीव वाचवण्यासाठीही उपयोगाची आहे.
धनंजयजी,
छान! आपण अतिशय अभ्यासू वृत्तिने पाणी आणि भोवरा ह्याचे संबंध दाखवून दिले आहेत.आपल्या मित्राच्या पंचविशीतल्या भावाचं अपघाती जाणं वाचून मलाही खूप दुःख झालं.आपल्या प्रशंसे बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
प्रतिक्रिया
गोष्ट छान
त्याचं असं आहे
हे छान !
छान............
प्रवाहाविरुद्ध पोहणे- गोव्यात येणार्या पर्यटकांस उत्तम माहिती
छान माहिती