Skip to main content

शांतिनिकेतन- काही प्रकाशचित्रे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/01/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागे शांतिनिकेतन या धाग्यात वचन दिल्याप्रमाणे आज तिथले काही निवडक फोटो इथे डकवत आहे. शांतिनिकेतन मध्ये कला विभागात लहान मुलांना संस्कृतीदर्शन व्हावे यासाठी काही भित्तीशिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे. साधारणपणे पहिली-दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी याचे निर्माण केले गेले असल्याची माहिती मला देण्यात आली. गुरुदेवांचे एक सहकारी, बंकिमजी यांनीही काही शिल्पे तयार करुन शांतिनिकेतनच्या सौंदर्यात भर घातली आहे. घर सोडून चाललेले कुटुंबः महात्मा गांधी गौतम बुद्ध कलाविभागाची सुंदर इमारतः तिथल्या बीएफएच्या विद्यार्थ्यांची काही चित्रे प्रदर्शनास ठेवली होती. त्यातीलच काही निवडक चित्रे: तिथल्या पौष मेळ्यात लागलेले स्टॉल्स हे मातीपासून बनवलेल्या वस्तुंसाठी प्रसिद्ध आहेत. त्याचे काही फोटो: बुद्धीदेवता गणपतीचे हे वेगळेच रुप तिथे बघायला मिळाले. गजमुखाबाजूची आरास टीपिकल बंगाली, दुर्गामातेच्या धाटणीची आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4688
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

अजून फोटो आहेत का??? ते पण टाक

जबरदस्त फोटो रे. पण लहान आकारात का टाकलेस? गणपतीचा मुखवटा सुरेखच. मोर आणि आणि खांद्यावर कुंभ पेललेली स्त्री सुरेख चितारली आहे.

मस्त रे अन्याभौ, आवडली ही छायाचित्रंही! आकाराने काही छोटी झाली आहेत पण छान आहेत. बीएफए च्या विद्यार्थ्यांनी काढलेली (बहुतेक) जलरंगातली चित्रं सुंदरच आहे. तुमच्या छायाचित्रणकलेविषयी काय म्हणावं, ती ही उत्तमच!

खरं तर फोटो छान आहेत हे सांगायला नकोच! फोटोवरून तिथल्या कलात्मक वातावरणाची कल्पना येतेच आहे, आणि इतक्या भारलेल्या वातावरणात शिकणारी मुलं किती नशीबवान असं राहून राहून वाटतंय.

छान कल्पना आहे की चिमुरड्यांना चित्र आणि शिल्पांमधून शिकवण्याची. आपल्याला एवढे आता ते जाणवणार नाही, पण त्या वयात उत्सुकता चाळवायला अशा गोष्टी नक्कीच कामाच्या ठरतात.

वाह!!! भित्तीशिल्प, पेंटिंग, मातीची कारागिरी सगळच सुंदर आहे. हे सर्व कला तुझ्या तिसर्‍या डोळ्यातुन इकडे पोचवल्याबद्दल आभार मित्रा. :)