आत्ता येते मग येते
निर्माण अपेक्षा करते
नाक उंचावल्या जाते
हुळहुळ अशी लावते
ताण डोळ्यान्ना देते
काहीही ना दिसते
लबाड येवढी असते
जगाचा विसर पाडते
स्फोटाची तयारी होते
मुठी वळवून सोडते
आह्ख छ्छी केव्हा वाजते
जग सारे वाट पहाते
उंचावलेले डोके झुकते
हुळहुळीची चिडचिड होते
नाकाला अतृप्त सोडून
ती न येताच जाते
************
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1500
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त कविता
हाहाहा!
फारच विनोदी!