मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कळीकाळानं असला कसला मौका साधला

पाषाणभेद · · जे न देखे रवी...
कळीकाळानं असला कसला मौका साधला कळीकाळानं असला कसला मौका साधला व्हता तो आधार आमचा निघूनीया गेला ||धृ|| बाप तू रं आमचा तूच आमची माय दूध बी तूच आन तूच दूधावरली साय कोना म्हनू आता आमी माय अन बाप तुझ्यायीना जगू कसं कळंना आम्हाला ||१|| न्हावूमाखू केलं तू रं तूच घातलं खावू तू न्हाई समोर आता आमी कुठं पाहू इस्तवात पडलो जवा तवा तूच विझवाया आला ||२|| पुर्वप्रकाशित:शब्दगाऽऽरवा २०११ - पाभे

वाचने 711 वाचनखूण प्रतिक्रिया 1