(डिस्क्लेमरः सदर मुक्तकात कुठल्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचा हेतू नाही. सर्किटकाकांचे "बप्पा"वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन. दुसरे काहीही नाही. मिसळपावावरील वाचकांना, अर्थातच, खुले आमंत्रण आहे. सदर "विडंबन" अद्याप रॉ आहे, ह्याची जाणीव आहे. तेव्हा येथील सिद्धहस्त कवींनी सुधारणा सुचवाव्या, ही विनंती.)
लहानपणी सिनेमात, सतत पाहिला तुला
गाजर का हलवा खात बसायचास नाष्ट्याला
पायात नौ नंबरच्या चप्ला रुबाबासाठी
आईशप्पत, तुझ्या चंगळीचा हेवा वाटला
झालो मोठा थोडा, तेव्हा बघितलं एकदाच
राखी-रेखामधली निवड, तीदेखील पहिल्यांदाच
हे डिसिजन तुला, नाही करावे लागले मित्रा
कुछ भी कहो, लेकीन थोडा जळजळ हुवाच
नंतर एकदा दिसलास, आय काँग्रेसच्या निवडणुकीला
राजीव नवा आहे, सांभाळून घ्या, विनंती करायला
थ्यांकू व्हेरी मच, असचं काहिस म्हणालास
तुझं जातीनं हजर राहाणं, खूपच आवडलं मला.
आता तर काय, तू नेहमीच फसवतोस
घराघरात्या टिव्हीतून, तू सारखाच दिसतोस
पुढे येतात ते सगळे, वेगवेगळे प्रॉडक्टस,
त्यांच्यातले तुझ्या निवास्थानी काही वापरतोस?
रुपाच्या अंडरवेअरसाठी, घालू का तुला गाऱ्हाणे?
सध्या तुझे वर्कलोड, वाढले आहे म्हणे
तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी
त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे
- केशवसुमार (१९ जुलॅ २००८)
| लेखनविषय: |
|---|
वाचने
6405
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुझा बाप
मस्त !!!
लाजवाब
मान्या रे मान्या
नेता ???
In reply to मान्या रे मान्या by सहज
अप्रतिम
असेच म्हणते
In reply to अप्रतिम by ऋषिकेश
+१
In reply to असेच म्हणते by प्रियाली
हेच म्हणते...
In reply to असेच म्हणते by प्रियाली
मुळ कविता
अहाहा!
तुझा बाप
व्वा..
ह्म्म
ह्म्म
केशवा, केशवा काय म्हणू?
आवडली कविता.
क्या बात है
धन्यवाद!!