Skip to main content

बिग बी

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 19/07/2008 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
(डिस्क्लेमरः सदर मुक्तकात कुठल्याही श्रद्धास्थानाची खिल्ली उडवण्याचा हेतू नाही. सर्किटकाकांचे "बप्पा"वाचल्यावर एक कल्पना मनात खेळत होती. त्याचे हे प्रकटन. दुसरे काहीही नाही. मिसळपावावरील वाचकांना, अर्थातच, खुले आमंत्रण आहे. सदर "विडंबन" अद्याप रॉ आहे, ह्याची जाणीव आहे. तेव्हा येथील सिद्धहस्त कवींनी सुधारणा सुचवाव्या, ही विनंती.) लहानपणी सिनेमात, सतत पाहिला तुला गाजर का हलवा खात बसायचास नाष्ट्याला पायात नौ नंबरच्या चप्ला रुबाबासाठी आईशप्पत, तुझ्या चंगळीचा हेवा वाटला झालो मोठा थोडा, तेव्हा बघितलं एकदाच राखी-रेखामधली निवड, तीदेखील पहिल्यांदाच हे डिसिजन तुला, नाही करावे लागले मित्रा कुछ भी कहो, लेकीन थोडा जळजळ हुवाच नंतर एकदा दिसलास, आय काँग्रेसच्या निवडणुकीला राजीव नवा आहे, सांभाळून घ्या, विनंती करायला थ्यांकू व्हेरी मच, असचं काहिस म्हणालास तुझं जातीनं हजर राहाणं, खूपच आवडलं मला. आता तर काय, तू नेहमीच फसवतोस घराघरात्या टिव्हीतून, तू सारखाच दिसतोस पुढे येतात ते सगळे, वेगवेगळे प्रॉडक्टस, त्यांच्यातले तुझ्या निवास्थानी काही वापरतोस? रुपाच्या अंडरवेअरसाठी, घालू का तुला गाऱ्हाणे? सध्या तुझे वर्कलोड, वाढले आहे म्हणे तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे - केशवसुमार (१९ जुलॅ २००८)
लेखनविषय:

वाचने 6411
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

वा !! बच्चन आम्चेच बाप्पा ! सुंदर. पचायला विषय जरा कठीणच. तरीही तो पचवून बाहेर टाकण्याची तुमची क्षमता वाखाणण्यासारखी. जियो केसू ! - सर्किट

जबरदस्त मानंल बा (प्पा) तुम्हाला अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

केसु साहेब मुळ कवितेचा अतिशय सुंदर उपयोग. सध्याच्या अमिताभ बच्चन वर के काही लिहले गेले आजवर त्यात हे सर्वोत्तम. चला आज सर्कीट्साहेब व केसु दोघांना समान गुण मनोरंजनाचे. स्वगत - सर्केश्वरांचे म्हणजे पक्षाशी निष्ठा आहे भले रिमोटकंट्रोलवर नसेल. ;-) चला पक्षात रहा म्हणजे झाले. आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो.

In reply to by सहज

आम्हाला तरी त्यांच्या सारखा नेता पक्षात आवडतो. सहजराव, अहो, कसला नेता ? कुठला नेता ? नेत्यांना स्वतःच्या मूळ विचारांना पुरावे लागते, नाहीतर त्यांचे सो-कॉल्ड अनुयायी त्यांना पुरून उरतात. त्यामुळे पक्षाचा कार्यकर्ता म्हणा, नेता नका बनवू., प्लीज. - सर्किट

मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम! दोन्ही रचना अप्रतिम!!! -('मिसळ'लेला) ऋषिकेश

In reply to by ऋषिकेश

मूळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम!
खरंच अप्रतिम आणि बिग बीसाठीच चपखल बनवल्यासारखं. वाहवा!

In reply to by प्रियाली

ही कविता आवडली. विषयात नाविन्य असल्यामुळे, मूळचा विचार असल्यामुळे "विडंबन" कमी, नवी कविता अधिक, असे माझे मत आहे.

In reply to by प्रियाली

मूळ कविता आणि विडंबन.. दोन्ही खास.. बिग बी अगदी मस्त प्फिट्ट बसलाय.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

मुळ कविता आणि विडंबन दोघांनाही सलाम! दोन्ही रचना अप्रतिम!!! असेच म्हणतो! आंबोळी

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे वा!

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे हे तर फारच आवडले. मूळ कविता आणि विडंबन दोन्ही ही उत्कृष्ठ ! स्वतंत्र रचना म्हणूनही ह्या मुक्तकाची गणना होऊ शकते आहे असे सद्य परिस्थीतीतील अमिताभ पाहता वाटते. स्वाती

उत्कृष्ट रचना, विडंबन म्हणून आणि स्वतंत्र रचना म्हणूनही! काय सुंदर कल्पनाविलास आहे? वा दिल खुष!! चतुरंग

तुझा बाप फार मोठा कवी होता, ब्रिजवासी त्याला दिसू नये हा दीस, आता एकच मागणे अप्रतिम !!! स्वतंत्र मुक्तछंदातील उच्च दर्जाची कविता शोभावी इतके सुंदर विडंबन.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार