Skip to main content

सल्ला हवाय

लेखक वाटी यांनी गुरुवार, 22/12/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, काल मला केलेल्या मदती बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असो सध्या १ समस्या घेउन मी तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी येत आहे.
अर्धवट मिळालेली माहीती
त्याचं झालं असं की माझा शाळेत असल्यापासूनचा मित्र मागच्या आठवड्यात माझ्या ऑफीसच्या येथे भेटला. काही कामानिमित्त तो तेथे आला होता आणि आमची भेट झाली. तो भेटल्यावर आमच्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पा चालू असतांना तो पहिल्या सारखा मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारत नाही हे मी ओळखले. त्याला म्हण्टले काय रे काही प्रॉब्लेम आहे का? तर आधी काहीच बोलला नाही. मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो. तीथे बसून ऑर्डर दील्यावर मला म्हणाला की अरे हो जरा एक प्रॉब्लेम झाला आहे. मी म्हण्ट्ले काय समस्या आहे. तर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मीही भारावून गेलो. त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता आणि सहाजिकच त्याच्या घरचे त्याच्या लग्नाबद्द्ल विचारात होते. झाले असे की, त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते. त्यातीलच एका मित्राच्या मुलीचा १ दीवस त्याला मॅसेज आला. सहाजिकच ह्याच्याकडे त्या मुलीचा नंबर नव्हता. म्हणून ह्याने माझ्या मित्राने त्या अन नोन नंबर वर कॉल केला. समोरून त्या मुलीने कॉल उचलला. आणि मग पुढे जाऊन तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला. ती मुलगी त्याला म्हणाली की अरे मधे एकदा तूझे आई बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा तुझ्या लग्नाबद्द्ल बोलणे चालू होते. आणि दोन्ही कुटूंबांचा चांगलाच घरोबा असल्याने हा विषय निघणे गैर नव्हते. पण माझ्या मित्राने काय किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही असा विचार केला नव्हता संबंधित मुलीबद्द्ल. तर तीचे बोलणे माझ्या मित्राने शांतपणे ऐकून घेतले. ती सांगत होती की तुला तुझे आई बाबा काही बोलले नाहीत का? आणि खरच त्याच्याशी त्याच्या घरच्यांचे बोलणेही झाले नव्हते संबंधित विषयावर त्यामुळे तो बिचारा फारच कावरा बावरा झालेला. आणि ह्याचेही घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे आहे त्यामुळे ह्याचा त्याच्या घरच्यांवर पूर्ण विश्वास आहे. हे तोही जाणतो आणि मीही. ह्या एकंदरीत प्रकारामुळे तो फारच गोंधळून गेला आहे त्याचे चित्त विचलीत झाले आहे. सदरहू मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे. तुम्हाला काय वाटते? भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला. तर क्रुपया योग्य तो सल्ला मिळावा कींवा ह्या विषयावर योग्य असे मौलिक मार्गदर्शन मिळावे एवढीच विनंती. आपला नविन मिपाकर, वाटी

वाचने 15903
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला. ह्या वाक्याला आक्षेप आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

ह्या वाक्याला आक्षेप आहे.
अशी वेळ वारंवार यावी अशी आमच्या अप्पाची इच्छा आहे ;) तसेही परवा त्यांना जिमखान्यावरील काही टेनीसपटू फारच आवडल्याचे आम्हाला जाणवले होतेच ;)

तुमच्या मित्राचे कावर्रे बावरे होण्याचे कारण कायः १. त्या मुली मित्र ओळखत नाही २. ती मुलगी मित्राला ओळखत नाही ३. तिच्याकडुन तुय्मच्या मित्राला या वर्तणुकीची अपेक्षा नव्हती ४. तुमचा मित्र लग्नाला घाबरतो किंवा लग्नानंतरच्या एखाद्या "समारंभाला" घाबरतो ५. तुमच्या मित्राला ती मुलगी आव्डत नाही ६. तुमच्या मित्राला मुलीच आव्डत् नाहीत ७. त्या मुलीला मुलीच आवडतात ८. ती मुलगी लग्नाला तयार नाही ९. तुमच्या मित्राला बेड शेयर करण्याची सवय नाही. १०. त्या मुलीचे माहेरचे आडनाव कावरे किंवा बावरे आहे?

In reply to by मृत्युन्जय

११. तुमचा मित्र लाजरा आहे का? १२. मित्राचे दुसर्‍या कुणावर प्रेम आहे का? १३. मुलीने डायरेक्ट विचारले म्हणुन तो कावरा बावरा झाला का?
मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे.
अर्धवट माहिती मिळाली हे तुम्हाला कसे माहित? तुम्ही मुलीला ओळखता का?
आणि मग पुढे जाऊन तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला.
किती पुढे जाऊन?

In reply to by ५० फक्त

छत्रपती वाटीच्या चमच्याने आपलं ते मित्राने तुम्हाला तो इमेल पाठवला तरी तुम्ही बघुन बघुन काय बघु शकणारे? अहो त्या मित्राला तो मेसेज एका मुलीकडुन आला होता तुम्हाला मुलाकडुनच येणार आहे हो . अर्थात मित्राने काहितरी सेटिंग लावुन ओरिजिनल सॉर्स कडुन तुम्हाला मेसेज पाठवला तर गोष्ट वेगळी.

"पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे" असे काही (मुलीने) म्हटले असते तर सल्ला मागण्यात अर्थ आहे.

In reply to by विनायक प्रभू

च्यामायला मग कसला सल्ला मागायचा? बाजारात जायचं एक चांदीचा पेला (वाटी आधीच आहे), अर्धा तोळा केशर, पाव लितर दूध, ५० ग्राम बदाम, २ पांढरे कांदे (क्षमतेनुसार), १० पाकळ्या लसूण (क्षमतेनुसार) आणी एक कोलगेट आणली की काम झाले. हाकानाका

In reply to by मृत्युन्जय

च्यामायला मग कसला सल्ला मागायचा? बाजारात जायचं एक चांदीचा पेला (वाटी आधीच आहे), अर्धा तोळा केशर, पाव लितर दूध, ५० ग्राम बदाम, २ पांढरे कांदे (क्षमतेनुसार), १० पाकळ्या लसूण (क्षमतेनुसार) आणी एक कोलगेट आणली की काम झाले. हाकानाका
त्यातून बाजारात एखादा धनगर भेटला की कामंच झाले. तुम्ही दोन तासात उर्ध्वरेता ;)

In reply to by विनायक प्रभू

"पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे" म्हणजे, मुली 'इस्तेमाल' करण्याची गोष्ट आहेत असे आपले मत आहे काय?

In reply to by प्रभाकर पेठकर

असे माझे मत नाही. प्रतिसादावरुन तुम्ही तसे मत केलेत की काय?

In reply to by विनायक प्रभू

असे माझे मत नाही. धन्यवाद श्री. विनायक प्रभू. गैरसमजाबद्दल क्षमस्व.

In reply to by प्रभाकर पेठकर

त्यांनी "पेहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे" असे काही (मुलीने) म्हटले असते तर सल्ला मागण्यात अर्थ आहे. असे म्हटले आहे. म्हणजे मुलीची तशी विचारसरणी असेल तर.

मी पेप्सोडेंट वापरतो.

सोप्पय.....
पटलं ..तर....होय....म्हणा .... नाही तर सोडून द्या.".....!!!!! बाकी या गोष्टीवर जास्त विचार करु नका..

लग्न एकदाच करता येते त्यामुळे तुमचा मित्रानी शांत होऊन विचार केला पाहीजे.
एखाद झाड आणी नदीचा आसरा घेतला तर ऊत्तम ( विचार करण्यासाठी) :)

आयला ( हा शब्द चालतो न? नाहीतर पुढच्या वेळपासून **ला लिहित जाईल.) जर दोन मित्राचं अगदी घरी येण जाण आहे तर मग त्यांच्या मुलांची मैत्री नाहीये? बर ठीक आहे नसेल कदाचित मुलगा कुठेतरी लांब जाऊन सेटल झाला असेल.त्याच्या अनुपस्थितीत दोनाचे चार हात करायचं ठरलं.मुलीच्या घरी तसा विषय निघाला पण नंतर काहीच चर्चा नाही...मग कदाचित तोंडदेखल हो बोलले असतील.मुलीच्या आई-वडिलांना वाईट वाटू नये म्हणून! मुलाच्या आई वडिलांना मुलगी पसंत नसेल.म्हणून मुलाजवळ विषय काढला नसेल.दुसरी गोष्ट हा फोन मुलीच्या वडिलांनी किवा आईने करायला हवा होता.बर पत्रिका बघितली होती का त्या मुलीने? किती गुण जुळले?मंगळ -बिन्गळ काही? अवांतर: मला खोतांनी लग्नाला बोलावलं नाही.म्हणून मी कोणत्याही मिपाकराच्या लग्नाला जाणार नाही आणि गेलेच तर चांदीचा काय प्लास्टिकचा पण पेला देणार नाही.फार तर बुफे मध्ये जो कांदा ठेवलेला असतो तो देईल.