नमस्कार मिपाकरहो,
काल मला केलेल्या मदती बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असो सध्या १ समस्या घेउन मी तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी येत आहे.
अर्धवट मिळालेली माहीती
त्याचं झालं असं की माझा शाळेत असल्यापासूनचा मित्र मागच्या आठवड्यात माझ्या ऑफीसच्या येथे भेटला. काही कामानिमित्त तो तेथे आला होता आणि आमची भेट झाली. तो भेटल्यावर आमच्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पा चालू असतांना तो पहिल्या सारखा मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारत नाही हे मी ओळखले. त्याला म्हण्टले काय रे काही प्रॉब्लेम आहे का? तर आधी काहीच बोलला नाही. मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो. तीथे बसून ऑर्डर दील्यावर मला म्हणाला की अरे हो जरा एक प्रॉब्लेम झाला आहे.
मी म्हण्ट्ले काय समस्या आहे. तर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मीही भारावून गेलो.
त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता आणि सहाजिकच त्याच्या घरचे त्याच्या लग्नाबद्द्ल विचारात होते. झाले असे की, त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते. त्यातीलच एका मित्राच्या मुलीचा १ दीवस त्याला मॅसेज आला. सहाजिकच ह्याच्याकडे त्या मुलीचा नंबर नव्हता. म्हणून ह्याने माझ्या मित्राने त्या अन नोन नंबर वर कॉल केला. समोरून त्या मुलीने कॉल उचलला. आणि मग पुढे जाऊन तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला. ती मुलगी त्याला म्हणाली की अरे मधे एकदा तूझे आई बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा तुझ्या लग्नाबद्द्ल बोलणे चालू होते.
आणि दोन्ही कुटूंबांचा चांगलाच घरोबा असल्याने हा विषय निघणे गैर नव्हते. पण माझ्या मित्राने काय किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही असा विचार केला नव्हता संबंधित मुलीबद्द्ल. तर तीचे बोलणे माझ्या मित्राने शांतपणे ऐकून घेतले.
ती सांगत होती की तुला तुझे आई बाबा काही बोलले नाहीत का? आणि खरच त्याच्याशी त्याच्या घरच्यांचे बोलणेही झाले नव्हते संबंधित विषयावर त्यामुळे तो बिचारा फारच कावरा बावरा झालेला. आणि ह्याचेही घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे आहे त्यामुळे ह्याचा त्याच्या घरच्यांवर पूर्ण विश्वास आहे. हे तोही जाणतो आणि मीही.
ह्या एकंदरीत प्रकारामुळे तो फारच गोंधळून गेला आहे त्याचे चित्त विचलीत झाले आहे.
सदरहू मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे.
तुम्हाला काय वाटते? भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला. तर क्रुपया योग्य तो सल्ला मिळावा कींवा ह्या विषयावर योग्य असे मौलिक मार्गदर्शन मिळावे एवढीच विनंती.
आपला नविन मिपाकर,
वाटी
वाचने
15903
प्रतिक्रिया
94
मिसळपाव
प्रतिक्रिया
भविष्यात कोणावर अशी वेळ येउ
=)) =))
In reply to भविष्यात कोणावर अशी वेळ येउ by अप्पा जोगळेकर
तुमच्या मित्राचे कावर्रे
११. तुमचा
In reply to तुमच्या मित्राचे कावर्रे by मृत्युन्जय
१४. मित्र १२ वर्षांचा आहे!
In reply to ११. तुमचा by दिपक
१५. मुलीचा SMS येण्याची पहिलीच वेळ आहे का..?
In reply to १४. मित्र १२ वर्षांचा आहे! by कवितानागेश
! नेमकि कोणति माहिती अर्ध वट
! नेमकि कोणति माहिती अर्ध वट
च्यायला! वाटीत चमचा... आय मीन
तो एसेमेस मला फॉरवर्ड करायला
छत्रपती वाटीच्या चमच्याने
In reply to तो एसेमेस मला फॉरवर्ड करायला by ५० फक्त
विश्वास
च्यामायला मग कसला सल्ला
In reply to विश्वास by विनायक प्रभू
हम्म्म
In reply to च्यामायला मग कसला सल्ला by मृत्युन्जय
तुळशीच्या मंजुळा
In reply to च्यामायला मग कसला सल्ला by मृत्युन्जय
धक्कादायक....
In reply to विश्वास by विनायक प्रभू
मत
In reply to धक्कादायक.... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद.
In reply to मत by विनायक प्रभू
त्यांनी
In reply to धक्कादायक.... by प्रभाकर पेठकर
पेस्ट
सल्ला...अमलात आणण्याजोगा
विचार करुन पाऊल टाका
आयला ( हा शब्द चालतो न?
खोतांचा लग्न झाला !!
In reply to आयला ( हा शब्द चालतो न? by किचेन