Skip to main content

सल्ला हवाय

लेखक वाटी यांनी गुरुवार, 22/12/2011 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरहो, काल मला केलेल्या मदती बद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. असो सध्या १ समस्या घेउन मी तुमच्याशी सल्लामसलत करण्यासाठी येत आहे.
अर्धवट मिळालेली माहीती
त्याचं झालं असं की माझा शाळेत असल्यापासूनचा मित्र मागच्या आठवड्यात माझ्या ऑफीसच्या येथे भेटला. काही कामानिमित्त तो तेथे आला होता आणि आमची भेट झाली. तो भेटल्यावर आमच्या ईकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पण त्या गप्पा चालू असतांना तो पहिल्या सारखा मनमोकळेपणाने माझ्याशी गप्पा मारत नाही हे मी ओळखले. त्याला म्हण्टले काय रे काही प्रॉब्लेम आहे का? तर आधी काहीच बोलला नाही. मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो. तीथे बसून ऑर्डर दील्यावर मला म्हणाला की अरे हो जरा एक प्रॉब्लेम झाला आहे. मी म्हण्ट्ले काय समस्या आहे. तर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मीही भारावून गेलो. त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता आणि सहाजिकच त्याच्या घरचे त्याच्या लग्नाबद्द्ल विचारात होते. झाले असे की, त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते. त्यातीलच एका मित्राच्या मुलीचा १ दीवस त्याला मॅसेज आला. सहाजिकच ह्याच्याकडे त्या मुलीचा नंबर नव्हता. म्हणून ह्याने माझ्या मित्राने त्या अन नोन नंबर वर कॉल केला. समोरून त्या मुलीने कॉल उचलला. आणि मग पुढे जाऊन तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला. ती मुलगी त्याला म्हणाली की अरे मधे एकदा तूझे आई बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा तुझ्या लग्नाबद्द्ल बोलणे चालू होते. आणि दोन्ही कुटूंबांचा चांगलाच घरोबा असल्याने हा विषय निघणे गैर नव्हते. पण माझ्या मित्राने काय किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही असा विचार केला नव्हता संबंधित मुलीबद्द्ल. तर तीचे बोलणे माझ्या मित्राने शांतपणे ऐकून घेतले. ती सांगत होती की तुला तुझे आई बाबा काही बोलले नाहीत का? आणि खरच त्याच्याशी त्याच्या घरच्यांचे बोलणेही झाले नव्हते संबंधित विषयावर त्यामुळे तो बिचारा फारच कावरा बावरा झालेला. आणि ह्याचेही घरातील वातावरण अगदी खेळीमेळीचे आहे त्यामुळे ह्याचा त्याच्या घरच्यांवर पूर्ण विश्वास आहे. हे तोही जाणतो आणि मीही. ह्या एकंदरीत प्रकारामुळे तो फारच गोंधळून गेला आहे त्याचे चित्त विचलीत झाले आहे. सदरहू मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे. तुम्हाला काय वाटते? भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला. तर क्रुपया योग्य तो सल्ला मिळावा कींवा ह्या विषयावर योग्य असे मौलिक मार्गदर्शन मिळावे एवढीच विनंती. आपला नविन मिपाकर, वाटी

वाचने 15952
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

कावरा बावरा होण्याचे काहीच कारण नाही. सरळ मुलीला भेटावे, एकमेकांना पसंत असेल तर लग्न करावे. मग चांदीचे पेले वैग्रे आहेतच.

In reply to by sagarpdy

लग्न म्हणल कि मि पा कर सल्ले देण्याच्या बाबतीत पेटतात .. किती सांगु आणि काय सांगु असे होते ...

In reply to by प्रचेतस

मग चांदीचे पेले वैग्रे आहेतच. काय आहेर करणार आहात वाट्त...?

In reply to by पक पक पक

नाही. आहेराचे कॉन्ट्रेक्ट किचेनताईंकडे आहे. तुम्हाला हवेत काय पेले?

चम्याच म्हणायचा की हा तुमचा मित्र. चक्क मुलगी स्वतःहून लग्न करायचं म्हणते तर हा कावरा बावरा होतो. मुलगी ओळखीतील आहे. जमण्यासारखं असेल तर हो म्हणायचं नाही तर नाही सांगायचं. हाकानाका. एव्हढ्या छोट्या अनुभवाने जर हा कावरा बावरा झाला तर तुमचा हा मित्र भारत मॅट्रीमोनी, जीवनसाथी, शादी डॉट कॉम वेग्रे वेग्रे संस्थळांवर स्थळांसाठी नोंदणी केल्यानंतर तसेच इतरही बर्‍याच ऑफलाईन वधुवरसुचक संस्थाचे उंबरठे झिजवल्यानंतर आणि त्याहीनंतर प्रत्यक्ष स्थळं पाहताना जे अनुभव येतात त्यांनी तर हा चक्क ब्रम्हचारी राहतो असेच म्हणेल. ;)

In reply to by गवि

क्षमा असावी पण तुमचे मत पटले नाही त्यातल्या पोरीची ष्टोरी म्हणजे जे घडलं आहे त्याच्याबाबत तेच तर मी ईथे मांडले आहे. ह्यात फसवेगिरीचा काहीच प्रकार नाही.

In reply to by वाटी

तुम्ही किंवा तुमचा मित्र नव्हे हो.. मी त्या मुलीविषयी म्हणतोय.. एकतर मुलाच्या घरच्यांना माहीतही नाही असा विषय ती सांगतेय.. जर घरच्यांना माहीत असता तर त्यांनी उलट आईस ब्रेक करण्याची उत्तम संधी म्हणून यानिमित्ताने तुमच्या मित्राला सगळं सांगून टाकलं असतं. मुलगा मुलगीची प्रत्यक्ष भेट फार झाली असेल नसेल.. पण तरीही ती एवढी अ‍ॅग्रेसिव्ह स्टेप घेतेय, यावरुन संशयास्पद हेतू वाटतो असं म्हटलं... म्हणजे काहीवेळा फाजील पोरंपोरी पैजा लावून एखाद्याला बकरा / पोपट बनवून दाखवतो, असं काही असण्याची शक्यता आहे असं म्हणणं आहे. बरं ती मुलगी लग्नाचा विषय काढतेय म्हणजे तिला हवंय की नकोय ते स्पष्ट होत नाहीये. कदाचित तिचं दुसरीकडे असेल आणि घरात या मुलाविषयी चर्चा ऐकून ती चिंतित झाली असेल.. त्याला भेटायला बोलावून तूच नकार दे असं विश्वासात घेऊन सांगायचं असेल.. वगैरे.. ( गविकाकांचा सल्ला असं सदर सुरु करण्याचं मिपा व्यवस्थापन का बरे मनावर घेत नाही.. )

In reply to by गवि

गविकाकांचा सल्ला असं सदर सुरु करण्याचं मिपा व्यवस्थापन का बरे मनावर घेत नाही.. ) नाय तर काय! भित्रे मुलखाचे!!!! :) गविकाका, तुम्ही असं सदर जरूर सुरु करा, आम्ही त्यावर उपसल्ला देत जाऊ.... जरा धमाल उडवुया मिपावर, तिच्यायला!!!!! :)

In reply to by पिवळा डांबिस

गवि, ५० फक्त, बिका यांना गुरु करुया पि.डा. अन रामदास काकांना 'महागुरु' करुया :) बाकी आम्ही आहोतच टाळ्या वाजवायला. सुरु होईल मिपाचा सुखी संघ (मराठीत हॅप्पी क्लब)

In reply to by मी-सौरभ

हे मनाच्या श्लोकाच्या ष्टायलित बसवून पाहतोय.(गुरुंचा शिष्य होण्याकडे तेवढेच एक पाउल) ("नमू शारदा मूळ चत्वार वाचा" च्या लायनीवर) गवि, पन्नास्,बिका जनांसी | मिपाकरेही गुरुराज मानी || पिडा रामदासीं महागुरु करोनी | शिष्यत्व ते थोर मिळाले म्हणती|| नमावे तयासी टवाळे ध्यांसी | टवाळें म्हणती "मास्टरें" ह्यांसी ||

In reply to by मन१

ह्या सर्वांबरोबरच 'महावस्ताद' म्हणून श्री. पाषाणभेद ह्यांना देखील सामिल करावे अशी विनंती.

In reply to by परिकथेतील राजकुमार

वरच्यास पुरवणी... ("मनाचा मवाळु स्नेहाळु कृपाळु जनीदासपाळु " ह्या ओळींच्या लायनीवर) टवाळू वस्तादु महाभांडखोरू | कजागु टंकाळु प्रतिसादपाडु || असे पाभे धाग्यावरी ज्या | दंगा नित्य तये नाम त्याचा || सांगतो परा नाना कळा ह्या | प्रतिसाद ह्याचे धो धो नळा ह्या || ह्याच्या उपरोधी समजु कोण जाणे | तया अंतरि श्री चेतन राहे !!

In reply to by मन१

धनवाद हो मनोबा. सांगतो परा नाना कळा ह्या आमच्या जोडीलाच आमच्या परम मित्राचे नाव पाहून अंमळ हळवा झालो आहे. नान्या भाड्या कुठे आहेस रे?

१. जर घरच्यांचे त्याच्याशी खेळीमेळीचे वातावरण आहे तर मग त्याने स्पष्ट घरच्यांना विचारावे ना कि खरंच असं काहि बोलणं झालय का ते. आणि त्या वर त्याने ठरवावे त्या मुलिला भेटावे कि नाहि. किंवा त्यानुसार तो त्या मुलिला response देऊ शकेन. २. जर त्याचे कुठे दुसरी कडे काहि प्रकरण नसेल तर त्या मुलिला प्रत्यक्ष भेटुन काय ते निर्णय घ्यावे. (दुसरी कडे काहि प्रकरण नसेल तर मुळातच "कावरे-बावरे" का व्हावे ते कळतच नाहि) ३. आणि माफ करा पण त्याच्या ह्या मामुलि समस्ये मुळे तुम्हि हि "भारावुन" गेलात हे म्हणजे "उघड्या कडे नागडं गेलं आणि थंडिने कुडकुडुन मेलं" असं काय म्हणतात ते तसं ते झालं कि वो.... ;) बाकि त्याच मुलि बरोबर तुमच्या मित्राचे लग्न जमल्यास, त्या मुलिस माझ्या शुभेच्छा!!! :)

In reply to by उदय के'सागर

@आणि माफ करा पण त्याच्या ह्या मामुलि समस्ये मुळे तुम्हि हि "भारावुन" गेलात हे म्हणजे "उघड्या कडे नागडं गेलं आणि थंडिने कुडकुडुन मेलं" असं काय म्हणतात ते तसं ते झालं कि वो....>>> :-D ह्हा ह्हा ह्हा ह्हा ...बा बौ,,,बा बौ....काय हा मार्मिक प्रतिसाद... मेलो हसुन हसुन

त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता आणि सहाजिकच त्याच्या घरचे त्याच्या लग्नाबद्द्ल विचारात होते. ह्यात समस्या काय आहे हे समजले नाही. हम्म्म्म्म! तो पाचवी-सहावीत असताना (किंवा वयाच्या पंचाहत्तरीत) हे घडले असते तर समस्या. त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते. सरकारी खात्यात नोकरी करणार्‍यांच्या घरी त्यांचे मित्र येत नाहीत का? की त्यांना मित्रच नसतात? मधे एकदा तूझे आई बाबा आमच्याकडे आले होते तेव्हा तुझ्या लग्नाबद्द्ल बोलणे चालू होते.आणि दोन्ही कुटूंबांचा चांगलाच घरोबा असल्याने हा विषय निघणे गैर नव्हते. पण माझ्या मित्राने काय किंवा त्याच्या घरच्यांनी कधीही असा विचार केला नव्हता संबंधित मुलीबद्द्ल. 'मधे एकदा' म्हणजे किती काळ आधी? आणि लग्नाचा विचार सुरू झाला की प्रथम ओळखितल्या मुलींचाच विचार केला जातो. काही कारणाने त्या नाकारल्या गेल्या तर शोधशोध सुरू होते. त्या मित्राची मुलगी लग्नाची आहे पण ह्याच्या घरचे तिचा विचार करीत नाहीत म्हणजे त्या मुलीत काही तरी खोट आहे असे ह्याच्या घरच्यांना वाटत असावे. आणि, ह्याच्या घरचे वातावरण अगदी खेळीमेळीचे असूनही, ह्याच्याशी चर्चा नाही म्हणजे 'ह्याच्या मनांत ती असावी' असा घरच्यांना संशय असेल आणि आपण नाकारल्याने आई-वडील आणि मुलामध्ये कांही भावनिक समस्या निर्माण होऊ नयेत असा विचार त्या मागे असेल. सदरहू मुलीला अर्धवट मिळालेल्या माहितीमुळे ती ह्या टोकापर्यंत जाऊन पोहोचली आहे असा माझा निष्कर्ष आहे. मग संपूर्ण माहीती काय आहे? इथे ही अर्धवट माहीतीवर चर्चा कशी करणार?

प्रिय वाटी, ही समस्या तुझ्या मित्राची आहे की तुझी हे मनमोकळेपणे सांगावे. डॉक्टरकडे अन वकिलाकडे काही लपवू नये असे म्हणतात. 'ताईचा सल्ला' हे सदरही असेच आहे. त्यामुळे न लाजता सांग. आता त्या मुलीबद्दल. ती मुलगी तुला (किंवा मित्राला) खरच आवडते का? तसे असल्याशिवाय ती मुलगी स्व:त विचारणार नाही. आग असल्याशिवाय धुर निघत नाही. तुमचे घराण्याचे संबंध असल्याने जास्त नाण न घेता वडीलधार्‍यांना विचारून काय ते ठरवावे. तुझीच, ताई

In reply to by पाषाणभेद

ही समस्या तुझ्या मित्राची आहे की तुझी हे मनमोकळेपणे सांगावे.
काय हे पाभेकाका.. ?? अहो समस्या त्यांचीच आहे हे समजून घेऊनच उपाय सुचवणे चालू आहे.. मित्राची आहे असं इथे कोणाला वाटतंय का ? फारच स्पष्ट विचारता बुवा तुम्ही.. ;)

In reply to by गवि

फारच छान प्रतिसाद येत आहेत.. पण पुन्हा एकदा येथे नमूद करावेसे वाटते की मिपाकरहो आम्ही आधीच बेड्यात अडकले गेलो आहोत. त्यामुळे तुम्ही जो समज करून घेतलाय तो निव्वळ गैरसमज आहे तुमचा. येथे फक्त वैचारीक मतांचे आदान प्रदान व्हावे हाच शुद्ध हेतू आहे तरी क्रुपा करून या प्रकरणात मला गोवण्यात येऊ नये ही नम्र विनंती. आपला मिपाकर, वाटी

In reply to by वाटी

येथे फक्त वैचारीक मतांचे आदान प्रदान व्हावे . आता तुम्च्या प्रश्नावर लगेच सल्ला मिळाला तर मग वैचारिक मतांचे आदान प्रदान कसे होणार ? जरा कळ काढा , आणी प्रश्न तुम्हि इतक्या काकुळतीला येउन विचारला आहे संशयाची सुइ थेट तुम्च्यावरच येउन थांबली ना....

In reply to by पाषाणभेद

पेठकर काका आणि गवि ह्यांचा तर प्रतिसाद आवडला होताच. पण ह्यास तोड नाही --/\-- "ताईं"चा वाचक

In reply to by पाषाणभेद

अय्या पाभे ,तू ऐगोनी आन्टी कधी पासून झालास रे? तु पण http://myagonyaunt.com/ असे काही तरी चालू कर ना ... मग तुझ्याकडे सगळे येतील रिलेशनशिप अ‍ॅडवाईज, मैरेज अ‍ॅडवाईज , टिनएज अ‍ॅडवाईज मागत ..'काय करावे बरे ?' असे विचारत ;-) बघ ताई जमतं का ..छान आहे हा काउंसलिंग चा उद्योग

तुम्ही पण राव अर्धवट माहीती दिलित आम्हाला .. ष्टूरी रंगवायची ना .. जरा डीटेल मध्ये सांगा आणि किचेन तै चा सल्ला घ्या...त्या एक्स्पर्ट आहेत

एसेमेस करणारी व जिला तुम्ही फोन केलात ती खरोखरच वडिलांच्या मित्राची मुलगी आहे की कुणी तुमचा पंचरंगी पोपट करतय ते बघा. ('त्या' मेसेज मध्ये तिने काय लिहिले होते ते सांगितले नाहीत?) जर तसे खरेच असेल आणि मुलगी पसंत असेल त हो म्हणा. नसेल तर गप बसा (उगाच खाजवुन खरुज कशाला काढावी?) छ्या! एका मुलीचा एक मेसेज तो काय आणि बबडु गोंधळतो काय. काही खरे नाही.

In reply to by सर्वसाक्षी

हे प्रकरण म्हणजे नायजेरीयन फ्रॉडची म्याट्रीमोनीअल एडीशन वाटते आहे.

>>मग आम्ही जरा एका हॉटेलात गेलो. जरा कशाला ? >>मी म्हण्ट्ले काय समस्या आहे. तर त्याने जे काही सांगितले ते ऐकून मीही भारावून गेलो. काय वाक् प्रचार आहे >>त्याची समस्या अशी होती की, तोही आता वेल सेटल्ड होता वेल सेटल्ड असणे ही समस्या आहे का ? >> त्याचे वडील एका खाजगी ठीकाणी कामाला आहेत त्यामुळे त्याच्या घरी वडीलांच्या मित्रांचे येणे जाणे होते. सरकारी ठिकाणी कामाला असेल तर मित्रांचे येणे जाणे नसते का? >>त्यातीलच एका मित्राच्या मुलीचा १ दीवस त्याला मॅसेज आला. आमच नशीब फुटका ...आमच्या वयात येण्याच्या वेळेस योग्य वय असलेली मुलगी असणारे एकही मित्र नव्हते वडिलांना .. ( की आम्ही वयात आलो हे बघुनच रस्ता बदलला त्यांनी ;) ) >>तीने डायरेक्ट ह्याला लग्नाबद्द्ल विचारले. हा पुरता गोंधळून गेला >>ह्या एकंदरीत प्रकारामुळे तो फारच गोंधळून गेला आहे त्याचे चित्त विचलीत झाले आहे. एका वेल सेटल्ड मुलाला एका परीचयामधल्या मुलीने लग्नासाठी विचारला तर गोंधळायचा काय ? >>भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला. का बरे ? अशी वेळ सर्व बॅचलर पोरांवर / पोरींवर यावी...हीच सदिच्छा तर क्रुपया योग्य तो सल्ला मिळावा कींवा ह्या विषयावर योग्य असे मौलिक मार्गदर्शन मिळावे एवढीच विनंती. हे मिपाकर देतीलच

In reply to by शाहिर

नंबर एक प्रतिसाद, शाहीर.. बाकी, वेल सेटल्ड आणि वयात आलेल्या तरुणाला त्याच्या ओळखीतल्या तरुणीने लग्नाबद्दल विचारले तर त्यात गोंधळायचे काय? का तिच्या ह्या सो कॉल्ड बोल्डनेसमुळे ती पाठीमागे लागेल अशी ह्या दोन्ही गोंधळलेल्या आणि भारावलेल्या मित्रांची कल्पना आहे? च्यायला, झकडमच आहे सगळं..

In reply to by शाहिर

@->>भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला.>>> का बरे ? अशी वेळ सर्व बॅचलर पोरांवर / पोरींवर यावी...हीच सदिच्छा..... :-D शाहिर यांस आमचे पूर्ण अनुमोदन ;-)

लग्नाचे मुहुर्त आता संपत आलेत. पुढे एकदम एप्रिल्/मे मध्ये. तेव्हा मित्राला शांत मनाने विचार करायला सांगा. भविष्यात कोणावर अशी वेळ येउ नये म्हणून मला ईथे हा प्रसंग नमूद करावासा वाटला असल्या प्रसंगाची तर अनेक जण वाट बघत असतात साहेब. वर म्हंटल्या प्रमाणे त्यामुलीने कोणाबरोबर तरी पैज लावली असण्याची शक्यता नाकरता येत नाही. पण घरोबा असल्याने मुलगी सरळ वळणाची आहे की कशी हे त्याचे आई-वडिल नक्कीच सांगु शकतील.

एक प्रामाणिक शंका तुमच्या मित्राला 'मुलीच' आवडतात ना हो? इंडिया 'मागासलेला' राहिला नाही हो आता. ;)

In reply to by गणपा

अश्लील अश्लील!! ;) गणपा संपादक आहे असे कुठेतरी ऐकलय.. खरं का रे?

In reply to by मोहनराव

"इस वख्त मैं तुम्हारे सामने एक संपादक नही बल्कि एक दोस्त की हैसियत से खडा हूं.." असं दिलीपकुमारछाप वाक्य गणपाशेटसाठी सुचवून पाहतो.

In reply to by गवि

गवि जाओ पहेले उसे धुंड लागो जिसने मेरे हाथोंपे ये लिख दिया....

In reply to by अत्रुप्त आत्मा

ये हाथ नही फांसी का फंदा है. बचके रहीयो!

In reply to by गणपा

भेंडी =)) च्यायला ! 'ती मुलगी बॉबी डार्लींग नाही ना ?' असे विचारले नाहीस हे आमचे नशिब.

तुमच्या मित्राला 'मुलीच' आवडतात ना हो? :bigsmile: सगळे प्रतिसाद म्हणजे हंड्यांवर हंड्या फोडल्या जातायत,पण गणपानी तर पाण्याची अख्खी टाकिच फोडलीये... :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

नाहीतर हा मित्र वाटी घेऊन जरा हॉटेलात का गेला असता??? तरी बरं चमचा / उलथना घेऊन नाही गेला

In reply to by मी-सौरभ

तरी बरं चमचा / उलथना घेऊन नाही गेला :bigsmile: आई गंsssss मेलो मेलो रे हसून... नुसतं चमचा ल्याहायचं ना..? ते उलथनं कशाला... ते म्हणे पुढुन पसरट असतं असं म्हणतात :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

..अरे काय चाललय काय????????? आता चमचा /उलथना झाला आता डाव, भातवाढी पण येउद्यात...........;) ह. ह. पु. वा.

In reply to by अत्रुप्त आत्मा

पसरट बाजू हातात पण धरता येऊ शकते ना ,,, >>> अरं तिच्यायला... ह्ये पण हतात येऊ शकतं नव्हं का हो :-p ध्येनातच नाई आलं बगा अमच्या ;-)

महोदय, आपणांतील बर्‍याच जणांनी ज्या काळात जन्म घेतला (?) तो काळच वेगळा होता. त्या काळी एखाद्याचा विवाह जमविणे, यासाठी समाजात एक वेगळीच अदृष्य यंत्रणा कार्यरत होती. समाजाचे स्वःताचे काही नियम, अटी होत्या. त्याविरुध्द जावून काही करण्याचे धाडस फारसे कुणी करीत नव्हते. आपण (आपल्या सर्वच संबंधीत) लोकांचे विवाह बारकाईने पाहिले -तर या यंत्रणेचा किती मोठा धाक लग्नाळू मुला-मुलींवर होता हे दिसेल. समाजातील सर्वच घटक आपापल्यातर्‍हेने, काहि हेतू मनांत ठेवून, काही तर कसलीही अपेक्षा न ठेवता यात सहभागी होत. त्याकाळी अर्थाजन किंवा मग त्या मुलाच्या मागे उभी असलेल्या आर्थिक "ताकदीचाच" प्रामुख्याने विचार केला जाई. सर्व सामान्यपणे मुलाने अर्थाजन करावे, व मुलीने आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निटनेटका संसार करुन दाखवावा अशी अपेक्षा केली जाई. विवाह जमविण्याच्या प्रक्रीयेत मुलाचे मतही फारसे विचारात घेतले जात नसे. मुलीच्या मताला तर नगण्य किंमत होती. या समाजव्य्वस्थेच्या विरुध्द जाण्याचे कुणी धाडस दाखविलेच तर त्यांचे काय होते त्याची उदाहरणेही आजुबाजूला पहावयांस मिळत. समाजाच्या खालपासून वरपर्यत हीच मांडणी लक्षात येईल. आपल्या मित्राच्या बाबत येथेच गोची होतेय !! पुढे काळ बदलला !! नको तितका बदलला !! आर्थिक आघाडीवर मुलांच्या नशिबी उपेक्षा आली. किंबहुना मुली आर्थिक बाबतीत खूपच नशिबवान ठरल्या. एका दॄष्टीने हे ठीकच होते. मुलींना आता कुणाच्यावर अवलंबून राहण्याची गरज नाही. हल्ली कुणी कुणाला फारसे विचारत नाही. वर उल्लेखिलेली विवाह यंत्रणा पूर्णतः लोप पावली. कुणाचा कुणाला धरबंद राहिला नाही समाजाचा पूर्वी जो एक " अदृष्य " धाक होता. तो नाहिसा झाला. ज्यांनी हा बदल स्वीकारला त्यांचा काहिहि प्रश्न नाही. पण आपल्या मित्रांसारखी जी पूर्वापार संस्कृतीत जगणारी मंड्ळी आहेत, त्यांना मात्र हा बदल न पेलणारा आहे हे खरंय!!!! महोदय, आपण म्हणता त्याप्रमाणे त्या मुलीशी त्यांचे घरगुती संबध आहेत. तर तुमच्या मित्राने घड्लेली घटना स्पष्ट्पणे सांगावी. दोन्ही घरांतील " जाणत्या " व्यक्तींनी एकत्र बसावे . म्हणजे सर्वे बाबींचा उलगडा होईल. मुलीने इतके धाड्सी पाऊल कसे उचलले का त्यामागे कुणाचा निव्वळ "चेष्टा" करणे हा हेतू होता हेही उघड्कीस येइल. जर सर्वांचेच समाधान झाले तर मग........... "पटलं ..तर....होय....म्हणा .... नाही तर सोडून द्या.".....!!!!! बाकी या गोष्टीवर जास्त विचार करु नका..दोस्त !!!!!!!!!!

In reply to by देविदस्खोत

दोन्ही घरांतील " जाणत्या " व्यक्तींनी एकत्र बसावे . ह्याच्याशी जाम सहमत होतील सगळे. इथेही बरेच जण एकत्र "बसतात". :)

In reply to by देविदस्खोत

मला आपलं नाव काय आहे ते कळालंच नाही..... डेव्हिड स्कॉट का देविदास खोत ??

In reply to by देविदस्खोत

@ श्री. देविदास खोत, समाजाचे स्वःताचे काही नियम, अटी होत्या. त्याविरुध्द जावून काही करण्याचे धाडस फारसे कुणी करीत नव्हते. आपण (आपल्या सर्वच संबंधीत) लोकांचे विवाह बारकाईने पाहिले -तर या यंत्रणेचा किती मोठा धाक लग्नाळू मुला-मुलींवर होता हे दिसेल. समाजातील सर्वच घटक आपापल्यातर्‍हेने, काहि हेतू मनांत ठेवून, काही तर कसलीही अपेक्षा न ठेवता यात सहभागी होत. त्याकाळी अर्थाजन किंवा मग त्या मुलाच्या मागे उभी असलेल्या आर्थिक "ताकदीचाच" प्रामुख्याने विचार केला जाई. सर्व सामान्यपणे मुलाने अर्थाजन करावे, व मुलीने आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये निटनेटका संसार करुन दाखवावा अशी अपेक्षा केली जाई. विवाह जमविण्याच्या प्रक्रीयेत मुलाचे मतही फारसे विचारात घेतले जात नसे. मुलीच्या मताला तर नगण्य किंमत होती. या समाजव्य्वस्थेच्या विरुध्द जाण्याचे कुणी धाडस दाखविलेच तर त्यांचे काय होते त्याची उदाहरणेही आजुबाजूला पहावयांस मिळत. समाजाच्या खालपासून वरपर्यत हीच मांडणी लक्षात येईल. आपल्या मित्राच्या बाबत येथेच गोची होतेय !! मुलीचा एस्. एम्. एस्. आला होता आणि मुलीने लग्नाविषयी स्वतःच तडक प्रश्न विचारला आहे. म्हणजे कथा नायक आणि नायिका ह्या आजच्या (बदललेल्या) काळात वावरत आहेत. तेंव्हा वरील पुर्ण असंबद्ध परिच्छेदामुळे प्रतिक्रियेतील जागा व्यापण्यापलीकडे काहीही साध्य होत नाहिए.

@-ह्याच्याशी जाम सहमत होतील सगळे. इथेही बरेच जण एकत्र "बसतात".>>> मनोबा आपणास अमचे साष-टांग नमन

In reply to by अप्रतिम

फेसबूकवर त्या मुलीचा सर्च मारायला सांगा... हे ही दिवस जातील. ??? ????? ?????

असेच एका कार्यक्रमात एका मुलीने रात्री काय करता? येता का म्हणुन विचारले होते त्याची आठवण झाली.ते मिपाकर सध्या वानप्रस्थात गेले आहेत. तुमच्या मित्राचे पण तसेच झाले आहे. गावाला विचारत बसण्यापेक्षा एकदा तिलाच हॉटेलला(परत तुम्ही जावु नका) फिरायला घेवुन जा म्हणाव. आवडली तर होय नाहीतर नाही. तुमच्या मित्रापेक्षा त्या मुलीचे मला कौतुक वाटते.

आसे सारखे मदत मागत फिरु नका . व खुप प्रतिसाद येतात ह्या भ्रमात देखिल राहु नका! ईथे खुप वर नेउन खुप खालि घालनारे टपुन बसलेले आसतात ! हुरळुन जाउ नका . तुमचे स्वताचे लेख आनुभव जरुर लिहा ! आवड्ले तर ऊचलुन धरतिल नाहि तर जबर आपटवतिल ! हि मिपचि स्टईल आहे ! आपन नविन दिसता आहात म्हनुन हा सल्ला ! (डु आय डी आसेल तर चालु दे )

In reply to by ईन्टरफेल

ईथे खुप वर नेउन खुप खालि घालनारे टपुन बसलेले आसतात !
अहो काय हे. शिव शिव शिव. काय ही भाषा. ;)