मराठी कविता समुहाच्या 'लिहा प्रसंगावर गीत' या उपक्रमासाठी मझा सहभाग...
बाबाची अंगाई
पापण्यांवर नीज येऊन जडावले डोळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे
धावधावतो बाबा जणू की पायाला भिंगरी
शिणतो, धडपड करतो येण्या लवकर माघारी
व्याकुळते मन बाल्य स्मरुनी होते बघना खुळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे
बाबालाही आस सतावे तुझ्याच बोलांची
चिऊ-काऊची गोष्ट बोबडी लाख मोलांची
समजुत काढू कशी तुझी मी मलाच हे ना कळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे
घरट्यामध्ये पक्षी निजले रात खूप झाली
चांदोमामा झोपी गेला त्याच्या मेघ महाली
नीज माझ्या राजा आता थांबव ना चाळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे
आई भवती तुझे छोटुले विश्व गुंफ़लेले
कर्तव्याने बाबाचे बघ हात बांधलेले
इवले इवले स्मरशील ना रे अपुले क्षण आगळे
घे बाबाच्या कुशीत सोन्या निवांत हिंदोळे
-प्राजु
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5075
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
कविता आवडली. एकदम तरल आणि
एकदम झक्कास
मस्त ,भावस्पर्शी कविता !
In reply to एकदम झक्कास by लीलाधर
आवडेश...
मस्तच
प्रयत्न चांगला आहे.....
कविता अतिशय सुंदर आहे हे
व्वाह!!
In reply to कविता अतिशय सुंदर आहे हे by गवि
म्हणजे असं काहीसं...
In reply to व्वाह!! by मिसळलेला काव्यप्रेमी
जबरा.
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
__/\__
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
बाबाच्या ढेरीवर टाक तुझे
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
गवि हल्ली कवि झाले आहेत
In reply to बाबाच्या ढेरीवर टाक तुझे by यशोधरा
व्वा व्वा... !!!
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
बाबाच्या ढेरीवर टाक तुझे
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
सुंदर...
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
मस्त!
In reply to म्हणजे असं काहीसं... by गवि
मुळ कविता आणि गविंनी लिहिलेली
अतिशय छान छान !!
प्राजु, तुमची कविता निर्विवाद
हा हा हा.. खरंय. झोपेल की
In reply to प्राजु, तुमची कविता निर्विवाद by हरिकथा
(No subject)
गवी मस्तच.(हे अय्या मस्तच
दोन्ही कविता एकदम मस्त, आणि
दोन्ही कविता आवडल्या...