Skip to main content

नक्की कोणता मी प्राणी ...!

लेखक विदेश यांनी शनिवार, 17/12/2011 23:41 या दिवशी प्रकाशित केले.
मान हलवता सर मजला 'नंदीबैल' पहा म्हणती - हुषार नाही म्हणून मजला मित्र किती 'गाढव' म्हणती ! डबे शोधतो हळू नेहमी 'बोका' म्हणते आई मला , नुसता चरतो इकडे तिकडे 'घोडा' म्हणती वडील मला ! दादा म्हणतो 'लबाड कोल्हा' पुढेपुढे मी करताना - 'माकड' समजे ताई मला गडबड माझी बघताना ! 'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !
लेखनविषय:

वाचने 2373
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

'कोहम्' चा शोध अजूनही चालू आहे.

आजी खरच गरीब गाय म्हणते का ससुल्ल्या म्हणते? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तगडक तगडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा आलं का लक्षात? नक्की कोणता मी प्राणी? ला डो बा....... :)

'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !
विशेष आवडले. साध्या सरळ शब्दातुनही अतिसुंदर काव्य निर्मिती होते ह्याचे हे उदाहरण आहे.

मस्त काव्य! चपखल शब्द!! सुंदर कल्पना!!! :-)

मस्त आहे हो तुमचि कविता ....!!!