मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

नक्की कोणता मी प्राणी ...!

विदेश · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
मान हलवता सर मजला 'नंदीबैल' पहा म्हणती - हुषार नाही म्हणून मजला मित्र किती 'गाढव' म्हणती ! डबे शोधतो हळू नेहमी 'बोका' म्हणते आई मला , नुसता चरतो इकडे तिकडे 'घोडा' म्हणती वडील मला ! दादा म्हणतो 'लबाड कोल्हा' पुढेपुढे मी करताना - 'माकड' समजे ताई मला गडबड माझी बघताना ! 'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !

वाचने 2370 वाचनखूण प्रतिक्रिया 7

इन्दुसुता Tue, 12/20/2011 - 09:15
आजी खरच गरीब गाय म्हणते का ससुल्ल्या म्हणते? तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे तगडक तगडक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा आलं का लक्षात? नक्की कोणता मी प्राणी? ला डो बा....... :)

गणेशा Tue, 12/20/2011 - 21:46
'गरीब गाय' म्हणते मला आजी माझी आवडती , जवळ घेउन आजोबा तर माझा 'वाघोबा' म्हणती !
विशेष आवडले. साध्या सरळ शब्दातुनही अतिसुंदर काव्य निर्मिती होते ह्याचे हे उदाहरण आहे.