Skip to main content

रस्सा...

लेखक गवि यांनी शुक्रवार, 16/12/2011 15:11 या दिवशी प्रकाशित केले.
(..चाल.. कोणतीही..) विचारमैथुन चालू असावे जेव्हा काही कामच नसते कचेरीमधे लेखन प्रसवत चोप्य पस्ते..चोप्य पस्ते.. (...चाल बदलून...) अंगलटीला उलटुन येता प्रतिक्रियांच्या पचपच पिंका ह.घ्या. ह.घ्या. हाकानाका पेरुन द्याव्या विकीलिंका.. (..चलन बदलून...) बोटावरची थुंकी बदलणे रुमाल टाकुन जागा धरता प्रकाटाआ डुकाटाआ अशक्य होईल बूच मारता. (..चालचलन आणि वृत्त बदलून..) अच्रत ब्वलत शीबै नैकै पुलेशुभेच्छुक पुभालटा तर्रीभरला शाब्दिकरस्सा इथे उकळतो रटारटा.. (.. चाल सोडून...) डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ..............................
काव्यरस

वाचने 11947
प्रतिक्रिया 39

प्रतिक्रिया

हे भारीये, येकदम! मेलो, खपलो, ठार झालो......! बाजार उठवला नि टेंपोत बशिवला..... :-D

आगागागा! बा जा र! =)) =)) =)) सीरिज तयार करा आता एक याची... पुभालटा पुभालटा पुभालटा पुभालटा!

धन्य आहे तुमची.. आता हे पण ग्राऊंड मारताय तुम्ही.. बादवे, "स्क्रि.का.मो.गो" पोचलंय. "मी ? म्हातारा ??" वाचून मलाही तसंच वाटलं की साला लै फास्ट बदलतंय माझं आणि माझ्यापुरतं जग.. लगे रहो..

डायरिया जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला.. ----^---- अबाबाबाबा ...फट फुट फट्याक...मेलो मेलो...वाचवा वाचवा...

In reply to by अत्रुप्त आत्मा

भयाण भयाण आहे ..... मेलो ,वारलो, खपलो , पिच्लो, गचकलो, महानिर्वाणलो आवरा... :D गवि सोमासव थोड द्या पाठवून इथे

तुफ्फान सुटलीये गविंची गाडी :) हहपुवा कसे काय सुटले शब्दकोषातून? ;)

In reply to by अन्या दातार

हहपुवा कसे सुटले?? अरे कमेंटकर्त्यांनी माझ्याकडून सुटलेल्या अशा असंख्य चिजा अ‍ॅड कराव्यात अशी इच्छा आहे..

ओ जरा दुसर्‍यांना पण स्कोप ठेवा की... !! असं सगळच तुम्ही करुन टाकलं, तेही इतकं भारी तर बाकीच्यांना "न्युनगंड" येइल ना...!!

In reply to by पिलीयन रायडर

सगळंच कुठे?? पैल्यांदाच ट ला ट लिहिलं आहे.. सांभाळून घ्या... बाकी.. हरभर्‍याच्या झाडावर चढवू नये ही विनंती.. हरभर्‍याचे झाड फार मजबूत नसते असं ऐकून आहे.. आमच्या वजनाने वडाचे झाडही खाली येईलशी भीती वाटते तिथे हरभर्‍याची काय कथा.. ;)

In reply to by गवि

जातीच्या सुंदराला काहीही शोभतं तसय तुमचं.. "जातीच्या प्रतिभावंताला काहीही जमतच..." आणि वर पुन्हा "कसच काय.. आम्ही आपलं ट ला ट जोडला... " असली वाक्य पण लिहायला लागलात... !! (टिपीकल "प्रतिभावंत" छाप वाक्य...!) ओळख राहु द्या गवि...

हांग......आश्शीSSSSSSSSSSSS =)) =)) =)) =)) भिकापाटील.

आपलं "गद्यामध्ये एंटर पेरुनी" छाप प्रयत्न हहपुवा अन अधिक-वजा घाटावरती कोकण मेवा हुच्चभूंची काय कथा टेकडीवरुनी बघती गावा

गवि.. आता कुठलाही प्रांत राहिला नाही तुमचा ... काय तोडलंय !! कॉलिंग शरदिनी तै... जोरदार स्पर्धा.. समजणारी / वजनात झकास बसणारी कविता... किंवा किंकविता :) पु भा ल टा ! पुभालटा!!

(.. आयडी बदलुन...) छान वावा झकास अन फुटला प्रतिसाद टंकण्या कोणी गेला वाक्य नवे रच्याकने शब्दकोष फाट्यावर मेला.

गवि, खुप छान ! मझा आला !! पुकशु आणी पुकप्र :) - (विचारमैथुनात मग्न असणारा) सोकाजी

गवि तुम्ही खरे कवी.......जिलब्या अन चपला ठोठो हसता कोणी खपला काळेबेरे काही नाही शब्दकोष टेंपोत बसवला..वा.....मस्त...

=)) =)) =))=))=))=))=))=))=)) गवि राँक्स _/\_

(.. चाल सोडून...) हे लै भारी. एखादे कडवे 'ताल सोडून' असते तर अजून मझा आला असता.

जबर्‍या......

हा हा हा ... जबरा !!!

चाल चलन वृत्त बदलून आमची रोती सूरत पार बदलून टाकली ! छान .

गवि, तुमची प्रतिभा घोड्यासारखी चौखूर उधळलीय! भीषण शुंदोर!!

धन्य आहात!! :)

लगे रहो...... वाहवा........... वाहवा....... लगे रहो !!!!!!!!