Skip to main content

MI 4 Ghost Protocol

लेखक snowy
शुक्रवार, 16/12/2011 या दिवशी प्रकाशित केले.
मिशन इम्पॉसिबल 4 हा ह्या सिरीजमधला चवथा चित्रपट. इथन हंट ( टॉम क्रूज ) व त्याचे सहकारी एका महत्वाच्या कागदपत्रास हस्तगत करण्यासाठी क्रेमलिन ला जातात पण तिथे विस्फोट होतो . त्याचा ठपका IMF वर ठेवला जातो. संपूर्ण IMF वर बंदी लादन्यात येते. त्यात सेक्रेटरी चा मृत्यू होतो. मग हंट , ब्रॅंड्ट व दोन सहकारी मिळून IMF वरचा आरोप चुकीचा ठरवण्यासाठी व जगाला वाचवण्यासाठी पुढे जे काही करतात ते चित्रपटात आहे. brad bird चे दिग्दर्शन मस्त.( निदान mi 2 च्या जॉन वू पेक्षा मस्त ) . उत्तम कॅमरा वर्क . नेहमी प्रमाणे गॅड्जेटस , कार्स , मारामारी , सर्व ह्या चित्रपटात आहे. टॉम क्रूज चा बुर्ज खलिफा चा स्टंट श्वास रोखून धरणारा . अनिल कपूर ने शक्ति कपूर छाप छोटासा रोल केलाय .तर एकंदर हा चित्रपट MI च्या सिरीज मधला बेस्ट चित्रपट आहे (निदान मला तरी वाटला). तर बघा आणि कसा वाटला ते सांगा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2834
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

बट मोव्ही सक्स.... टोम क्रूजने सरकारी एजंट आणि सूपर हिरे (हिरो) यामधील फरक लवकरात लवकर समजणं फार आवश्यक आहे. MI-१ मस्तच होता. सॉलीड. MI-२ ला मी वापरतो त्या जिन्स व गॉगलची अ‍ॅडवर्टाइज समजतो. त्यापलीकडे त्याला काही किंमत नाही. MI-३ चायला दिसतो चिकणा म्हणून क्रुजला अ‍ॅज लवर पोट्रे करणं मस्टच आहे काय ? विषेशतः स्पायमोव्ही मधे ? पटलचं नाय .. अनं माणसांचे मूखवटे वापरणं म्हणजे ... हायला अलिबाग से आयला है क्या ? MI-४ चित्रपट म्हणून चांगला आहे विषेशतः बुर्ज खलिफा चा स्टंटपेक्षाही वाळूच्या वादळाचा सिन मस्त आहे. अ‍ॅज अ‍ॅक्षन मोव्ही चित्रपट परत एकदा बघेनही.. पण MI-१ च्या स्टोरी व सस्पेस्न ची तोड यात काडीची नाही.... सस्पेन्स हा या सिरीजचा कणा आहे तो यात मिसींग आहे. बाकि चित्रपट एकदम चकाचक अनं वेगवान. क्रेम्लिमधे वापरलेलं गॅजेट तर मस्तच, त्यामूळे हा चित्रपट चाहत्यांना मस्ट वॉच. अनिल कपूरने बावळट व स्त्रिपूढे लाळघोटेपणा करणार्‍या माणसाचा छोटासा रोल शक्तिकपूर पेक्षाही मस्त केलाय. ;)

In reply to by आत्मशून्य

चायला दिसतो चिकणा म्हणून क्रुजला अ‍ॅज लवर पोट्रे करणं मस्टच आहे काय ? हो!! तुम्ही जळायचं कै खास कारण? (असलं तरी ते तुमच्याजवळंच ठेवा.

+१ v/s -१ अजुन काही जाणकारांच्या मताची वाट पहातो. उगाच इतक्यात नेट जाळण्यात अर्थ नाही. आवांतर : MIB3 ची वाट पहातोय. प्रोमो तरी आवडलाय.

. पण MI-१ च्या स्टोरी व सस्पेस्न ची तोड यात काडीची नाही

In reply to by snowy

अरे snowy दूपारच्या २.१५ च्या शोला तूझ्या मागच्या लाइनमधेच मी बसलो होतो, तुला हाकही मारली होती...

हे परी़क्षण नक्किच नाही ..जाहिरात आहे का ?? कि धागा प्रसवायची हौस ?? पहिल्या ३ ओळीमधे नेट वर कुठेही मिळणारी कथा आणि नंतर च्या ३ ओळीमधे कौतूक ... ना आस्वाद ..ना परीक्षण... ना ही तंत्र ..कथा ..पटकथा यांच्यावर भाष्य.. आणि " निदान मला तरी वाटला" हे महागुरु छापाच वाक्य तर कहर आहे . http://www.misalpav.com/node/20065#comment-359037 इथे एका सदस्याने तुम्हाला डीटेल मध्ये सांगितला होतं..तरीही तेच .. एकुण तुमचे धागे स्पॉयलर ठरत आहेत

In reply to by शाहिर

शाहिरांशी सहमत! जरा अजून चित्रपटाबद्दल लिहीले असते तर बघायचा की नाही हे ठरवता आले असते. हा धागा वाचून गणपा म्हणतो त्याप्रमाणे अजून समिक्षा करणार्‍या प्रतिसादांची प्रतिक्षा करावी लागणार असे दिसते. - (समिक्षक) सोकाजी

आजच पाहिला. बराय..... एकदा बघायला काहीच हरकत नाही. दुसर्‍यांदा फुकट बघेन, म्हणजे पैसे खर्च न करता आणि वेळ अगदीच फुकट जात असेल तरच.