आषाढाचा मास । दर्शनाची आस ।
होती तुझे भास । पांडुरंगा । ।
साठवावे नेत्री । भक्तीचिया गात्री ।
दिवसा नि रात्री । रूप तुझे । ।
खोवलेला शिरी । तुरा हा मंजिरी ।
वसतो पंढरी । विठू राया । ।
भिवरेच्या तिरी । उभा विटेवरी ।
कर कटेवरी । ठेवोनिया । ।
काळा नि सावळा । प्रेमाचा पुतळा ।
मनाचा निर्मळा । पांडुरंग । ।
नामयाचा घास । घेऊनिया खास ।
जागवली आस । भक्तीयोगे । ।
घेऊनी वळण । दळितो दळण ।
करितो राखण । जनाईचे । ।
तुकोबाचा भार । घेई शिरावर ।
परि गुन्हेगार । आवलीचा । ।
काय त्या म्हणावं ? देव की मानव ।
कोणाला कळाव ? गारूड ते । ।
श्रद्धा अंधश्रद्धा । फरक तो करा ।
परी कास धरा । प्रयत्नांची । ।
प्रयत्नाच्या अंती । ध्येयाची ती पूर्ती ।
करा श्रम भक्ती । विठू सांगे । ।
जाणा एक सर्व । विश्व हाच देव । ।
सांगे ज्ञानदेव । सकलांना । ।
प्राजू म्हणे ऐसे । विश्वाला जपावे ।
प्रयत्न करावे । ध्येयासाठी । ।
- प्राजु.
वरील काव्य वाचून प्राजुला विरक्ती आली आहे असा गैर समज करून घेऊ नये. काही ओव्या वाचता वाचता मला या ओळी सुचल्या.. म्हणून इथे लिहिल्या.
| लेखनविषय: |
|---|
वाचने
15174
प्रतिक्रिया
49
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्राजुताई,
+१
In reply to प्राजुताई, by इनोबा म्हणे
संत प्राजुबाई!
+१
In reply to संत प्राजुबाई! by प्रमोद देव
+१
In reply to +१ by धनंजय
नव्या युगातल्या ओव्या.
In reply to संत प्राजुबाई! by प्रमोद देव
सुरेखच
मस्त !!!
फारच
सुंदर ते
एकदम अभंग !
सह्ही...
प्राजू,
खुप छान..
वा!
आपल्याला याचे विडंबन करावे वाटले...
In reply to वा! by केशवसुमार
पाप की दुनिया | आवलीचा गुन्हेगार
In reply to वा! by केशवसुमार
वाचता वाचता ..
उत्तम रचना
सुरेख
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
पूर्ण १० गुण
केवळ सुरेख...!
हो तात्या..
In reply to केवळ सुरेख...! by विसोबा खेचर
केशवसुमारांवर कडी!
जाणा हेचि
In reply to केशवसुमारांवर कडी! by आपला अभिजित
बोंबला!
चातकाची
असो.
सुंदर
धन्यवाद..
फारच छान
बेष्ट!
प्राजु..
मस्त
HI
कल्लोळ, कल्लोळ काव्याचा कल्लोळ!
विकास,
सुंदर
अप्रतिम
सुरेख गाताहेत
वाह!
In reply to सुरेख गाताहेत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असेच
In reply to वाह! by सहज
वा वा प्रमोदकाका आणि प्राजू!
In reply to सुरेख गाताहेत by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माझा
वा..
सुंदर
प्राजूजी,
In reply to सुंदर by श्रीकृष्ण सामंत
मस्त
अतिशय सुरेख!