मराठी ज्ञानसागरात मोलाची भर आणि मिनी कट्टा अर्थात परीकथेतील राजकुमार यांच्या पुस्तकाचे प्रकाशन १० डिसेंबर २०११
आपले लाडके मिपाकर परिकथेतील राजकुमार (परा) ऊर्फ प्रसाद ताम्हनकर यांच्या 'संगणकावर मराठी कसे लिहावे' या पुस्तकाचे प्रकाशन काल संपन्न झाले.
मनसेचे स्थानिक नगरसेवक सुधाकर चव्हाण यांनी 'महाराष्ट्र धर्म' हे प्रदर्शन आयोजित केले होते, त्यात पुस्तक प्रदर्शन, बोधनकरांच्या अर्कचित्रांचे प्रदर्शन स्टॉल होते.
कार्यक्रमाला कोणकोण येणार याची फोनाफोनी ३-४ दिवसांपासून चालू होती. कार्यक्रम सायंकाळी ७ वाजता ठरला होता पण तेव्हा गर्दी असेल म्हणून ६ वाजताच जमायचे ठरले होते. परंतु गाडीत पेट्रोल हवा भरून तेथे पोचेपर्यंत आणि पार्किंगला जागा सापडेपर्यंत (चारचाकी गाडी आहे असे सांगण्याचा क्षीण प्रयत्न :) )मला साडेसहा वाजले. तेव्हा रामदासकाका, सर्वसाक्षी, विश्वनाथ मेहेंदळे, अमोल खरे, मस्त कलंदर, निखिल देशपांडे, मिसळलेला काव्यप्रेमी वगैरे आणि खुद्द लेखक आधीच पोचलेले होते. नंतर येणार्यांना तिथल्या गर्दीत हे सगळे कोठे आहेत हे शोधायला विमेंचा टीशर्ट फार उपयोगी पडला. :P
माझ्याच बरोबर विलासराव देखील पोचले. किसन शिंदे उशीरा येणार असे कळले. पुण्याहून 'मोठ्या संख्येने' मिपाकर या कार्यक्रमासाठी आले होते. :)
आम्ही सगळे कार्यक्रम सुरू होण्याची वाट पहात होतो. तेवढ्यात मी विजयराज बोधनकरांनी काढलेली विविध लेखकांची अर्कचित्रे (मराठीत - कॅरिकेचर) पाहून आलो.
आयोजकांनी वेळ घालवण्यासाठी प्रेक्षकांना या प्रदर्शनाविषयी काय वाटते ते सांगायची विनंती केली. तेव्हा काही हौशी प्रेक्षक सुरू झाले. त्यांनी जवळजवळ अर्धा तास पकवले. तेवढ्यात इंडियन स्टॅण्डर्ड टाईमच्या बरेच आधी म्हणजे साडेसात वाजताच राज ठाकरे यांचे आगमन झाले.
त्यांनी प्रदर्शनाच्या प्रत्येक स्टॉलला भेट दिली. हे होत होत श्री राज ठाकरे मंचावर पोचले तोवर आणखी वेळ गेला. मग मंचावर नमस्कार चमत्कार सत्कार झाले.
शेवटी ज्याची उत्सुकतेने वाट पहात होतो तो क्षण आला. राज ठाकरे यांनी ग्रंथाचे वेष्टण काढून पुस्तक प्रकाशित केले.
पुस्तक जरी छोटेसे असले तरी त्यातल्या ज्ञानाच्या भाराने आणि लेखकाच्या तेजापुढे राजजी झुकलेले दिसतात.
परा यांच्या लेखनाच्या तेजाने चंद्रानेही आपले तोंड काळे केले.
तदनंतर राज ठाकरे यांनी जमलेल्या श्रोत्यांना मार्गदर्शन केले.
मात्र त्यांनी शाब्दिक आतषबाजी असलेले लांबलचक भाषण केले नाही. त्याचे कारण पुढच्या महिन्यात खूप भाषणे करायची आहेत असे सांगितले. मात्र रामदासकाकांच्या मते याचे खरे कारण बिपिन कार्यकर्ते, विजुभाउ आणि छोटा डॉन हे कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे राजजींचा मूड गेला हे होते.
राजजींनी भाषण फार लवकर आटोपते घेतल्याने आता पुढे काय असा प्रश्न आमच्यापुढे उभा राहिला. मग सर्वांनी तिथल्या मेजवानी स्टॉलकडे मोर्चा वळवला. आणि बरीचशी भजी आणि चहा यांना या जगातून मुक्ती देऊन त्यांचा उद्धार करण्यात आला.
मध्यंतरीच्या काळात नीलकांत, किसन शिंदे वगैरे मंडळीही "वेळेवर" पोचली.
मग जेवायला कुठे जायचे याचे चिंतन सुरू झाले. हे चिंतन खेळीमेळीच्या वातावरणात झाले.
चर्चा करताना विलासराव, निखिल देशपांडे, श्री सावंत व मस्त कलंदर
त्यातली चर्चा ऐकून मालकांनी डोक्याला हात लावला.
चर्चा चालू होती तेवढ्यात मिपाच्या सिद्धहस्त लेखकांचा एक फोटो घेण्यात आला.
वयोवृद्धांनी आपले कोणकोणते अवयव दुखतात याची चर्चा केली.
मध्येच मिपावरील कोणते वाङ्मय पुस्तकरूपात प्रसिद्ध करता येईल यावर प्रकाशक श्री कीर्तिकुमार शिंदे यांच्याशी चर्चा झाली.
जेवायला कुठे जायचे ही चर्चा खूपच लांबली. त्यामुळे शेवटी पोळीभाजीच मागवून तिथेच जेवायचे ठरले. "पोळीभाजीच" ठरल्यामुळे काहींची निराशा झाली.
पोळीभाजी येईपर्यंत इतका वेळ गेला की सर्वांना कडकडून भूक लागली. त्यामुळे सगळे जेवणावर तुटून पडले. सत्ते पे सत्ता मधील जेवणाच्या सीनची आठवण आली. मस्त कलंदर पदर खोचून (आपलं- ओढणी खोचून) वाढायला वगैरे लागल्या. पण त्याची काही गरजच नव्हती इतकी भूक सर्वांना लागली होती.
जेवणे झाल्यावर मंडळींनी निरोप घेतला.
प्रकाशनाच्या दिवशी पुस्तकाची तडाखेबंद विक्री झाली असे आमचे प्रतिनिधी कळवतात.
(वि. सू. - पोळीभाजीचे बिल कोणी दिले हे कळू शकले नाही).
बाकीचे हजर सदस्य अधिक भर घालतीलच.
अतिअवांतर : पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल पराचे पुन्हा एकदा अभिनंदन.

प्रतिक्रिया
रायरंगी
वरील बर्याच प्रतिक्रियांशी
वृत्त्तांत छान. एवढी सगळी
अरे वा
धन्यवाद ...
वृत्तांत आणि फोटो आवडले
अभिनंदन रे परा
धन्यवाद!
वा परा मनापासून अभिनंदन त्याच
अभिनंदन!!
अभिनन्दन
वावा..
घरी
परा अभिनंदन. पार्टी पाहीजे.
रोचक वृत्तांत.
अभिनन्दन.......!!!! माननिय
छान,
छान
छे छे
मस्त वृत्तांत. येऊ न
टंकनिका मिळाली वाटते एवढे डीटेलवार पुस्तक लिहायला..
मस्त वृत्तांत
अभिनंदन परा..
हॅ हॅ हॅ
आता कसे सगळेच फेशियल करुन
-१
अभिनंदन!
Pagination