✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जीवघेणा फास

म — मिसळलेला काव्यप्रेमी, Tue, 12/13/2011 - 10:18
सावळ्याश्या सावळीला, सावळ्याचा ध्यास आहे सांग कां तो सावळ्या रंगी, निळासा भास आहे भेट होता, सावळी ती जाहली कांती तुझी गं गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे सावरुनी घे जिवाला, काय हा वेडेपणा गं लाजलाजूनी उरी हा, मोहणारा श्वास आहे मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (११/१२/२०११) मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा वृत्त: व्योमगंगा

प्रतिक्रिया द्या
12412 वाचन

💬 प्रतिसाद (28)

जमलय !!!

फिझा
Tue, 12/13/2011 - 10:43 नवीन
अप्रतिम कव्यारचना !!!!
  • Log in or register to post comments

गा ल गा गा -

विदेश
Tue, 12/13/2011 - 10:49 नवीन
माळ माळूनी अबोली, सावळ्याला साजिरीशी गंध नाही त्या फुलांना, 'ती' तरीही खास आहे ... खास आहे !
  • Log in or register to post comments

गोरट्या रंगात त्या, आता निळ्याचा वास आहे

रामदास
Tue, 12/13/2011 - 10:53 नवीन
कविता आवडली . मी निळ्या नसलो तरी कवितेने बर्‍याच गोरट्यांची आठवण करून दिली आहे.
  • Log in or register to post comments

अगदी

प्रशांत
Tue, 12/13/2011 - 11:09 नवीन
बर्‍याच गोरट्यांची कविता (काव्य) आवडली
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास

मस्त... सुरेख.पहिल्या आणि

गवि
Tue, 12/13/2011 - 11:28 नवीन
मस्त... सुरेख. शेवटच्या कडव्याची पहिली ओळ सोडली तर वृत्तातही चपखल.. मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला मला वाटतं, वृत्तातही ही ओळ तांत्रिकदृष्ट्या बसते आहे. पण "न्ह्या" या तीनाक्षरी जोडाक्षराने उच्चारी ताण बसतो आहे.. वृत्तात म्हणताना नेमके "न्ह्या" वर तोडावे (जोर देण्याचे ठिकाण) लागत असल्याने टोचरा कोपरा झाला असावा.. हे एरवी जाणवायचं अजिबात कारण नव्हतं. पण बाकीच्या ओळी मऊ लोण्यासारख्या स्मूथ गेयतेत असल्यानेच जाणवतंय रे.. तुझ्या कवितांमधे हाच प्रॉब्लेम असतो. रुईच्या सात गाद्यांसारखी शुद्धता असते त्यामुळे त्याखाली एक पीस आलं तरी बोचतं..
  • Log in or register to post comments

कल्लास..... अतिब्येक्कार. एकद

प्यारे१
Tue, 12/13/2011 - 11:19 नवीन
कल्लास..... अतिब्येक्कार. एकदम भारी वाटलं. ;)
  • Log in or register to post comments

झकास

नगरीनिरंजन
Tue, 12/13/2011 - 11:58 नवीन
कविता आवडली!
  • Log in or register to post comments

सुन्दर!

क्रान्ति
Tue, 12/13/2011 - 13:26 नवीन
खूप सुरेख रचना!
  • Log in or register to post comments

सुंदर

मेघवेडा
Tue, 12/13/2011 - 14:46 नवीन
छान. आवडली कविता.
  • Log in or register to post comments

मस्त झालिये कविता

पियुशा
Tue, 12/13/2011 - 15:01 नवीन
मस्त झालिये कविता :)
  • Log in or register to post comments

आवडली गजल...

कवितानागेश
Tue, 12/13/2011 - 15:13 नवीन
आवडली गजल... :)
  • Log in or register to post comments

+१, शेवटच्या कडव्याची पहिली

पुष्करिणी
गुरुवार, 12/15/2011 - 02:19 नवीन
+१, शेवटच्या कडव्याची पहिली ओळ सोडली तर छान्च जमलीय
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कवितानागेश

काव्यरचना सुंदर आहे

जाई.
Tue, 12/13/2011 - 15:17 नवीन
काव्यरचना सुंदर आहे
  • Log in or register to post comments

व्वा...व्वा ! मि.का....

अत्रुप्त आत्मा
Tue, 12/13/2011 - 15:31 नवीन
व्वा...व्वा ! मि.का.... कडक,,,सह्ही एकदम... जीवघेणा फास आहे.... मार डाला यार,बास खल्लास...!
  • Log in or register to post comments

हां..

दादा कोंडके
Tue, 12/13/2011 - 16:55 नवीन
ही कविता आवडली! ;)
  • Log in or register to post comments

आवडेश!!

मोहनराव
Tue, 12/13/2011 - 17:51 नवीन
आवडेश!!
  • Log in or register to post comments

मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी

विजुभाऊ
Tue, 12/13/2011 - 19:57 नवीन
मोरपंखी प्रीत कान्ह्याची, जरी मोही जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे यातील कान्ह्याची हे शब्द खटकताहेत. (प्री आणी न्ह्या अक्षरांमुळे वृत्ताच्या बाहेर जाताहेत ) मो र पं खी प्री त का न्ह्या ची ज री मो ही जि वा ला गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा गा ल गा गा या ऐवजी मोरपंखी प्रीत अशी ; मोही जरी जिवाला जाण राधे त्यास अंती, जीवघेणा फास आहे हे वृत्तात नाही पण मिटर मध्ये बसतेय.
  • Log in or register to post comments

विजुभाऊ.. हेच निरीक्षण मीही

गवि
गुरुवार, 12/15/2011 - 09:20 नवीन
विजुभाऊ.. हेच निरीक्षण मीही सुरुवातीला नोंदवल्यावर मिकाने ते अत्यंत चांगल्या रितीने घेऊन आपल्या अंगभूत प्रतिभेने कान्ह्याच्या ओळीला सुंदरपणे पर्याय देत खालील ओळी केल्या: मोरपंखी प्रीत दाटे, ती जरी मोही जिवाला जाण राधे, त्यास अंती जीवघेणा फास आहे त्या ओळी त्याने इथे अपडेट केल्या नसल्या तरी हे खूप आवडल्याने मी आगाऊपणा करुन मिकाच्या परवानगीशिवाय इथे दिलं आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

फारच छान.

पाषाणभेद
Wed, 12/14/2011 - 07:44 नवीन
फारच छान.
  • Log in or register to post comments

सुरेख काव्यरचना

वीणा३
गुरुवार, 12/15/2011 - 04:14 नवीन
सुरेख काव्यरचना !!!
  • Log in or register to post comments

आवडली कविता.

यशोधरा
गुरुवार, 12/15/2011 - 08:56 नवीन
आवडली कविता.
  • Log in or register to post comments

कविता छान झाली आहे रे!

चतुरंग
गुरुवार, 12/15/2011 - 09:37 नवीन
लगेरहो! -रंगा
  • Log in or register to post comments

मस्त

सविता००१
गुरुवार, 12/15/2011 - 11:59 नवीन
सुंदर कविता. फारच छान.
  • Log in or register to post comments

मस्त रे मावळ्या ;)

परिकथेतील राजकुमार
गुरुवार, 12/15/2011 - 19:26 नवीन
फक्त :-
मात्रा: गालगागा गालगागा गालगागा गालगागा वृत्त: व्योमगंगा
हे नसते तरी चालले असते. उगा आपण किती अज्ञानी आहोत हे जाणवत राहते. ;)
  • Log in or register to post comments

आवडली

पैसा
Sat, 12/17/2011 - 22:52 नवीन
आधी मेवेनं केलेलं विडंबन आवडलं, आता मूळ कविता आवडली. छान.
  • Log in or register to post comments

कातील लिहिलंय! वाह!

प्राची अश्विनी
Fri, 07/17/2020 - 17:20 नवीन
कातील लिहिलंय! वाह!
  • Log in or register to post comments

ही कविता सुद्धा सुंदर !!!

वीणा३
Fri, 07/17/2020 - 19:20 नवीन
ही कविता सुद्धा सुंदर !!!
  • Log in or register to post comments

मिका मिसळ पाव वरील आपला एक

गणेशा
Sun, 07/19/2020 - 10:19 नवीन
मिका मिसळ पाव वरील आपला एक आवडता कवी.. आवडतात त्याच्या कविता.. शब्द.. तो माणुस म्हणुन पण तितकाच छान.. शांत आहे.. वल्ली नंतर भेटलेला माझा मित्र :-))
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा