एक दिवस असाच आपला घरी बसून निवांत टिवल्याबावल्या करत होतो. तेव्हढ्यात इमारतीमधले वय वर्ष ७-८ असे एक बालकृष्ण फिरत फिरत आमच्या घरी प्रवेश करते झाले. एंट्रीलाच सप्तक लाऊन टाळ्या घेणार्या संगीतनाटकातल्या कलाकारासारखं हे महाराज गात आले.. "व्हाय धिस कोलावरी कोलावरी डी". मी चमकुन त्याच्याकडं पाहिलं, तर ह्याला कशाचं काहीच नाही. गातोय आपला जोरजोरात. काय ही पोट्टी, काय काय पाहतात त्या टिव्हीवर, कळो न कळो, आपलं म्हणतच सुटायचं! मग मीच खेकसलो, " एऽ गप रे. तुझं वय काय, तू गातोयस काय? आँ? जरा चार चांगल्या गोष्टी ऐकाव्या माणसानं." त्या बाळासाहेबांनी एकदम 'अरे! आत्ता तर बरा होता की हा...' असा एक दयाद्र कटाक्ष टाकला, आणि बिफिकीरपणे दुसरी घरं उंडारायला निघून गेले.
ह्या "कोलावरी डी" ओळख झाली ती ही अशी. मग हळूहळू रोज उठून कुठे ना कुठे, काही ना काही कानावर पडायला लागलं. टिव्ही, एफ.एम.वालेही चेकाळले, उठसुठ त्या कोलावरीचा रतीब सुरु झाला. घरात, बाहेर, टपरीवर, हापिसात्..सगळीकडं आपलं 'कोलावरी डी'! म्हणलं, सरकारी खात्यानंही जाहिरातबाजीमध्ये चांगलीच बाजी मारलीन की. हापिसात दुपारी क्यांटिनात गेलो तर मागच्या टेबलावर चारेक ललना (काकवा हो काकवा..लगेच कान टवकारु नका.) जेवण कमी अन चिवचिव जास्त ह्या नियमाचं पालन करत होत्या. त्यांच्याही चर्चेत पुन्हा 'कोलावरी डी'च. आयला! म्हणलं, सरकारच्या प्रयत्नांना चांगलं यश येतंय हों. जनशिक्षण उत्तम चालू आहे. हल्ली ह्या बायका आजिबात भीडभाड न बाळगता स्पष्ट चर्चा करताहेत. छान छान!
आणि मग, ते हरविंदरसिंग आणि पवार प्रकरण घडलं. त्यानंतर पुन्हा तेच्..कोलावरी कोलावरी कोलावरी डी! आता मात्र गडबडलो. आपण समजतोय तसं हे दिसत नाहीये तर. मग जरा नेटवर नेटानं शोध घेतला तर कळालं, हे तामिळ की तेलुगु की कायसं गाणं आहे. अन् ह्या गाण्याचा आणि 'स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय, भारत सरकार' ह्यांचा दुरान्वयानंही संबंध नाही.. जरी नावात 'डी' असलं तरी ते डी आणि हे डी..दोन्ही वेग़ळे आहेत.
शोधाशोधीत कळालं की म्हणे ह्या गाण्याला सिक्स्टी मिलियन (होय! असंच म्हणायचं असतं म्हणे.) पेक्षा जास्त हिट्स मिळाल्या आहेत. जगभरातून ह्या गाण्याचं कौतुक होतंय, खूप लोकांना आवडलंय वगैरे वगैरे वगैरे! झालं? म्हणजे आता हे एव्हढं लै लै भारी गाणं ऐकलं नाही तर जीवाला चैन पडेल काय? मग रीतसर गाण्याचा दुवा मिळवला आणि अगदी पदरची ब्यांडविड्थ खर्चून आख्खं गाणं ऐकलं. परत ऐकलं, परत परत ऐकलं! हरे राऽऽम! इतकी प्रचंड 'हाईप' केलेलं हे गाणं ऐकून भिंताडावर डोकं आपटुन घ्यावंस वाटलं .
काय ते गाणं तिच्यायला! त्याला ना आई ना बाप. ना धड शेंडा ना बुडखा. त्या ढोल-पिपाणीच्या गजरात तर आमचं सुखकर्ता-दुखहर्ताही सुप्परहिट होईल की.
एव्हढं कवतिक चाललेलं हे गाणं, ते गाणारा असा कळवळून कळवळून का गातोय हेच कळेना. सूर असा लावलाय, जणू सहनशक्तीपलिकडं एक चार-सहा वेळा परसाकडं धावावं लागलं आणि थकव्यानं कण्हत, कुंथत गायला बसलंय. मध्येच एकदम मुरडा आल्यासारखं एखादी कळ देऊन जातो हा बाबा. कोण तो गायक- धनुष्य की बाण की भाता (ह्याला बहिण असेल तर तिचं नाव प्रत्यंचा असेल का हो?) त्याला बहुतेक आवाजात दर्द आणायचं असावं, पण ते 'असं' नसून 'तसं' दर्द वाटतंय. असो! आता नसतं एखाद्याला गाण्याचं अंग , पण जरा चार पै गाठीशी असले तर करताही येतं काहीबाही. आमच्या संजूबाबानं नाही गायली चार दोन गाणी? टुकार असली म्हणून काय झालं, लोकांनी ती टुकारच आहेत म्हणून सोडून दिली. इथे भलतंच. बरं,नवखा बिवखा असेल,नसेल गायकाला पेललं म्हणावं अन पुढे जाऊन छानपैकी गाण्याचे बोल ऐकावेत,तर तिथंही च्यायला ह्यांचा तांब्या पालथाच!
काय तर म्हणे
डिस्टन्स ला मुन्नं..मुन्नं
मुन्नं कलरं वैट्टं वैट्टं (वैट्टं? हां हां...व्हाईट.)
ब्याग्रौंड नैट्टं (वैट्टंमुळं हे नैट्टं बरोबर कळलं...शिकतोय मी हळूहळू..जमेल.)
नैट्टं कलरं ब्लॅक्कं (ते ब्लॅक्कं ऐकलं की 'वॅक्कन ओकला' वगैरे आठवायला लागलं. छ्छे... फारच अवघड आहे. )
वै दिस क्वॉलावरी क्वॉलावरी क्वॉलावरीऽऽ डी...
हे असले झकडम बोल गाण्याचे. जरा तिसरी-चौथीतल्या पोरांचं गुणगुणणं वगैरे ऐकलं तर कळेल,त्यांच्या गाण्यांमध्ये आणि ह्या गाण्यात फार काही मोठा फरक नाही.हां,वयोमानापरत्वे स्कॉच (ह्म्म्..रजनीकांतचा जावई ना हो हा?),गर्ल,लौव्व वगैरेचा फरक आहे. पण तेव्हढाच. गाण्याचं काहीतरी व्याकरण असतं म्हणे, ते मरुद्या.निदान ज्यावर गाणं बेतलंय त्या कवितेला तरी भाषेचं किमान व्याकरण असावं असा आमचा आपला समज. हल्ली हे गीतकार वगैरे व्हायला मेंदू गुडघ्यात उतरावा लागतोय काय? की डायरेक्ट डोक्यातूनच पांगळं असलं तरी चालतं? एकुणच सध्याच्या गाण्यांची क्वालिटी पाहून नेहमी पडणारा हा खदखदता प्रश्न एकदम भीषण वगैरे होऊन माझ्यासमोर उभा ठाकला.
लौव्वं लौव्वं ओ मै लौव्वं (अरे धड लव्ह, निदान लव तरी म्हण रे टोणग्या...)
यु शौड मी बौव्वं.. (बोंबला! काय दाखवलं कोण जाणे!)
कौव्वं कौव्वं...होली कौव्वं...
आयच्चा घ्घो! एव्हढं ऐकुन जे काय हसता हसता गडाबडा लोळायला लागलो...ऑबॉबॉ.फिनीश!!!
हे काय कौव्वं कौव्वं करतंय ते आधी कळेनाच, पण ते पुढं होली आहे म्हणजे बहुतेक त्याला काऊ म्हणायचं असावं. आता ह्याच्या 'लौव्वं' मध्ये ती कौव्वं काय दुध घालायला आली होती की चारा खायला? खुळं तिच्यायला..गाणी लिहितायत.
आधीच लिरिक्स एव्हढे भीषण, त्यात त्या बाब्याचं अस्सल तामिळी तर्खडकरी इंग्रजी! एकाचवेळी तुफ्फान करमणूक आणि भयानक वैताग ह्याचा संयोग अनुभवायला मिळाला म्हाराजा! च्यायला,मी विचार केला,हे असलं काहीही खपून जातंय तर मग आपलं 'अडगुळं मडगुळं' सुध्दा हिट्ट होईल की. पण लगेच लक्षात आलं,आपले सासरेबुवा एक साधेसुधे मध्यमवर्गिय मराठी मनुष्य आहेत. त्यांना पंचा, विडी, पिस्तुलं वगैरे काहीही गोल गोल फिरवून झेलता येत नाही. ताबडतोब अडगुळं मडगुळंचा विचार बाजूला सारला अन निमूट मूग गिळून बसलो.
आपल्याला गाण्यागिण्यातलं काही कळत नाही हे खरंय. कोणी संगीततज्ज्ञांनी चार ज्ञानकण पदरी घातले तर बरं होईल. निदान कळेल तरी की हे गाणं इतकं लै लै भारी म्हणून का मिरवतंय.
तोवर मी आपला असा निष्कर्ष काढून मोकळा झालोय की एकतर पब्लिकची आवड तद्दन फालतु झालीए, किंवा लोकांनी कौतुक केलंय ना, मग मला नाहीच आवडलं पाहिजे असा आड्मुठा पवित्रा पाहून मलाच अकाली मिड-लाईफ-क्रायसिस झाला असावा. काय असेल ते असेल्..मी अगदी भर लकडीपूलावर उभं राहून जाहीरपणे 'नाही नाही नाही...त्रिवार नाही! हे गाणं चांगलं नाही!' असं स्पष्ट मत मांडायलासुध्दा तयार आहे.
ते असो. अॅप्रेझल्सचे दिवस चालू आहेत त्यामुळं सध्या आम्ही आपलं, 'गणा धाव रे, गणा पाव रे..' अशा विनवण्या करतोय. अॅप्रेझल्सचा निकाल लागला की म्यानेजराकडं पाहून आम्हीही गाऊ... 'वै दिस क्वॉलावरी क्वॉलावरी क्वॉलावरी डीऽऽ
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
12385
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
हायला धमु चक्क मेन
अगदि
In reply to हायला धमु चक्क मेन by गणपा
आपल्याला आवड्ल भो हे गाण
In reply to अगदि by प्रशांत
पण कळल का? कोलावारीचा अर्थ
In reply to आपल्याला आवड्ल भो हे गाण by पियुशा
:D
लई फालतु गानं आहे ते!! आजकाल
हा हा हा!
अरेच्चा!!
गाण्याबद्दलच्या तुमच्या सर्व
खि:खि:खि:!!! हि: हा: हा:
'घटं भिंद्यांत, पटं
In reply to खि:खि:खि:!!! हि: हा: हा: by यकु
च्या मारी डोक्याची पार भाजी
In reply to खि:खि:खि:!!! हि: हा: हा: by यकु
हॅ हॅ हॅ
+१ शमत
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
हेच म्हणतो
In reply to हॅ हॅ हॅ by ब्रिटिश टिंग्या
मी ३ वेळा ऐकलं. त्यावेळी असं
>>आपले सासरेबुवा एक साधेसुधे
मनातल्या भावना उतरवल्यात...
आभारी. :)
गाण ऐकून जाम गोंधळले
छान लेख
लेख सहीच..
मस्त चिरफाड
पुचाट, दळभद्री, वैतागवाडी
रिपिट ऑडियन्स
:-)
गाण्यापेक्षा गाण्याच्या मध्ये
गाण्यापेक्षा गाण्याच्या मध्ये
In reply to गाण्यापेक्षा गाण्याच्या मध्ये by ५० फक्त
गाणं आवडेल हाय भो...तसेच त्या
मेर्कु गाना आवड्या. धमुने
मी
आण्खी
हो ना.
In reply to आण्खी by विनायक प्रभू
मेले............
फालतू गाणे ...फाकडा पंचनामा.
कोलेवेरि डि !
सहमत आहे.
In reply to कोलेवेरि डि ! by हितु
तो पुण्यातल्या रिक्षावाल्या
In reply to कोलेवेरि डि ! by हितु
फट्ट्याक्
In reply to तो पुण्यातल्या रिक्षावाल्या by रेवती
काडी टाकावी म्हणतो ;)
In reply to कोलेवेरि डि ! by हितु
अग्ग्ग्ग्ग....
In reply to काडी टाकावी म्हणतो ;) by सुहास..
गाणं कसही असो! त्यानिमित्ताने
पवारांच्या कानाखाली वाजवली
ते हरविंदरसिंग आणि पवार प्रकरण घडलं.
गाण आवडल... निदान
हाहा
मला तर आवडले बुवा...
+ १
In reply to मला तर आवडले बुवा... by वेताळ
धमाल मुलग्या ! हसून हसून मेलो
धम्या
=))
अजून एक
खपलो
In reply to अजून एक by विकास
क्लास्स्स विडंबन.
In reply to अजून एक by विकास
हा, हा...
In reply to अजून एक by विकास
व्हाय धीस गालावरी गालावरी
>>हे काय कौव्वं कौव्वं करतंय
साल १९५७ परवाच आपला घरी बसून
+१
In reply to साल १९५७ परवाच आपला घरी बसून by विश्वनाथ मेहेंदळे
तो पुण्यातल्या रिक्षावाल्या पेक्षा हि घाणेरडा दिसतो
Hello Boys.. I am Singing Song.. Soup Song.. Flop Song..
मस्त!
In reply to Hello Boys.. I am Singing Song.. Soup Song.. Flop Song.. by आत्मशून्य
टैमपास..
धम्या