Skip to main content

मेंढीताई मेंढीताई

लेखक विदेश यांनी मंगळवार, 29/11/2011 10:00 या दिवशी प्रकाशित केले.

मेंढीताई मेंढीताई
अंगभर लोकर, मज्जा बाई -
थंडी जोरात वाजली तरी
तुला ऐकू येतच नाही ?

बेडूकराव बेडूकराव
का ओरडता डराव डराव ?
येत नाही झोप तुम्हाला -
बाळावर का चिडता राव !

मनीमाऊ मनीमाऊ
म्याऊ म्याऊ बंद करा,
उंदीर दिसत नाही तोवर-
तुम्ही जरा मौन धरा !

भूभूदादा भूभूदादा
येता जाता तुम्ही भुंकता -
चोर चोरी करतानाच
तुम्ही नेमके कसे पेंगता ?

बगळोपंत बगळोपंत
दिसतो तुमचा एकच पाय -
तलावातल्या माशांनी
खाल्ला का हो दुसरा पाय ?

लेखनविषय:

वाचने 1287
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

बालगीत . नवीन बालगीतांची फारच टंचाई आहे . त्यामुळे नविन बालगीते वाचली की जास्त बरे वाटते.