" लहान पण देगा देवा मुंगी साखरेचा रवा "
काल अचानक गप्पाच्या ओघात लहानपणा विषयी गप्पा निघाल्या आणि मन अचानक गावाकडे चक्कर मारून आले. लहान पणाची मजा काही औरच, ती मजा, ती धमाल, तो बिनधास्त पणा मोठे पणी नाही सापडत हो. प्रत्येक गोष्टी मला आठवतात अजून. आमच्या गावाला पाणी टंचाई खूप मला तर आमच्या नळाला पाणी कधी आले ते पण आठवत नाही. नळाच्या खड्डया चा उपयोग आम्ही लपंडाव खेळायला करत असू , एखादा माणूस सहज गडप होईल असे ते खड्डे असत.
मग प्रत्येक मोसमात सगळ्या मित्र मंडळीची स्वारी कुठल्या तरी शेतावर असायची. टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या, बोरे, चिंचा ह्या सगळ्या गोष्टी झाडावरून तोडून खाण्यात काही वेगळीच मजा असायची, जेव्हा शेतात पाणी आन न्या साठी आमी जायचो तेव्हा हंड्यात दोन चार कैऱ्या चोरून आणण्या मध्ये काहे वेगळेच शौर्य आहे असे आमाला वाटायचे. काही म्हणा शेतातल्या गोष्टी शेतात खाण्यात वेगळी टेस्ट असते. शेता मधल्या हुरड्याची चव इथे मार्केट मधून घेतलेल्या हुरड्याला नसते. गावाकडच्या गुराळात कधी उसाचा रस व गुळाची चव चाखली आहे का ?? इथे इथल्या वातावरणात एक आर्टीफिशीयल चव जाणवते.
विटी-दांडू , गोट्या, चिंचुके, सुरपारंबी हे आमचे आवडीचे खेळ असत.क्रिकेट पण खेळायचो पण जास्ती नाही कारण क्रिकेट खेळताना कॉलनी तल्या लोकांच्या जाम शिव्या पडायच्या व नेहमी आमचा बॉल जप्त व्हायचा आणि पैसे नसल्या मुले नवीन बॉल आणायला परवडा यचे नाही. तर मग जुने पायमोजे मध्ये चिंध्या भरून बॉल तैयार केल्या जायचा कारण तो हरवला तरी दुख: नसायचे.
खरच किती छान होते लहानपणीचे दिवस हे आता जाणवते, लहान पणीच्या आठवणी हा तर आता दंत कथा झाल्या सारखी वाटते. कधी वाटते लहान व्हावे आणि मुक्त पणे आयुष्य जगावे. आता म्हणजे यंत्र मानवासारखे घडाळ्याच्या काट्यावर पळावे लागते. आला दिवस गेला दिवस करून आठवडा complete करायचा आणि वीकेंड ला तंगड्या वर करून लोळत पडायचे.
बदलते राहणी मान आणि विचारसरणी या मुळे आता च्या लहान मुलावर पण खूप फरक पडला. आता हेच बघा शेत किवा गावाकडच्या गोष्टी सांगितल्या तर नवल वाटते हल्लीच्या लहान मुलांना, भावाच्या ४ वर्ष्याच्या मुली ला गाय म्हैस दाखवायला special गावाकडे ट्रीप करून यावी लागली. हातापायाला माती लागली म्हणून ती रडू लागली. आम्ही तर बिना चपलीचे अर्धा गाव पालथा घालून येत. खेळताना हात पाय तर मातीत रापलेले असत. अजूनही मी गावाकडे गेलो कि शेतात बूट न घालता फिरतो. मातीचा स्पर्श खूप सुखावून जातो. लहान पण फक्त आठवणीत उरले आहे.
माझे लहान पण तसे खेड्यातले, ८ वी झाली कि घरच्यांनी मला शहरात पाठवले. शहरात राहण्याचे फायदे झाले पण तोटे मात्र जास्त झाले. शहरी वातावरणात माझा जीव मात्र गुदमरायला लागला. मी बर्यापैकी एकल-कोंडा आणि भावना शून्य झाले हा मात्र घर सोडल्याचा व शहराचा परिणाम आहे आहे हे मात्र मी नाही समजू शकलो. त्या मुळे "गड्या आपला गाव बरा" असे म्हणायची पाळी आली.
वाचने
48114
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या,
नमस्कार
In reply to टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या, by पियुशा
ब्वार्र............... भावना
In reply to नमस्कार by विवेकखोत
अन्याव अन्याव
In reply to ब्वार्र............... भावना by पियुशा
ऊस, हुरडा
In reply to टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या, by पियुशा
ए...
In reply to ऊस, हुरडा by वपाडाव
च्यायला...
In reply to ऊस, हुरडा by वपाडाव
तुझ्या शेतात हुरडा
In reply to ऊस, हुरडा by वपाडाव
फार्म व्हिले
In reply to तुझ्या शेतात हुरडा by पियुशा
फॅश बॅक मधे आत्मचरित्र !!
नमस्कार
In reply to फॅश बॅक मधे आत्मचरित्र !! by तर्री
निबंध बरा होता वार्षिक
पार्ट ३
पौगंडावस्था = अमेरिकन पाय
In reply to पार्ट ३ by विनायक प्रभू
<<कधी वाटते लहान व्हावे आणि
शहराचा दुस्वास कशाकरिता??
+१ डाउन वुइथ नाँस्टाल्जिया
In reply to शहराचा दुस्वास कशाकरिता?? by प्रभाकर पेठकर
-१
In reply to शहराचा दुस्वास कशाकरिता?? by प्रभाकर पेठकर
वेगळाच अर्थ तर होत नही ना ?
In reply to शहराचा दुस्वास कशाकरिता?? by प्रभाकर पेठकर
आवाका...
In reply to वेगळाच अर्थ तर होत नही ना ? by तर्री
वेगळाच अर्थ तर होत नही ना ?
In reply to शहराचा दुस्वास कशाकरिता?? by प्रभाकर पेठकर
धन्यवाद
In reply to शहराचा दुस्वास कशाकरिता?? by प्रभाकर पेठकर
असहमत...
In reply to धन्यवाद by विवेकखोत
" तबेल्यात गाई म्हशी बघणे आणि
In reply to धन्यवाद by विवेकखोत
" तबेल्यात गाई म्हशी बघणे आणि
In reply to धन्यवाद by विवेकखोत
अरेच्चा तुमचा प्रवास
हम्म...
नमस्कार
In reply to हम्म... by दादा कोंडके
एक डाव माफी करा जी...
In reply to नमस्कार by विवेकखोत
नमस्कार
In reply to हम्म... by दादा कोंडके
आंधळी
In reply to हम्म... by दादा कोंडके
ठो .......
लिखाण बरे आहे. तुम्हि
ऑ !! काहीतरीच काय?
अश्लिल अश्लिल!!
In reply to ऑ !! काहीतरीच काय? by वपाडाव
+११११११११११११११११११११११११११११
In reply to अश्लिल अश्लिल!! by मोहनराव
हो णा
In reply to +११११११११११११११११११११११११११११ by अत्रुप्त आत्मा
टीकेविना
टहाळ, ऊस, हुरडा, कैऱ्या,
>>>>खरच किती छान होते
यांन्व्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
पराला(पण) संपादक करा...
In reply to यांन्व्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स by परिकथेतील राजकुमार