✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

लग्न पाहवे करून पार्ट -२

व
विवेकखोत यांनी
Wed, 11/30/2011 - 16:21  ·  लेख
लेख
सर्व प्रतिसाद व सुचना लक्षात घेणून लिहिण्याचा दुसरा प्रयत्न करत आहे. (काही चुकल्यास क्षमा असावी. ) माझे आजोबा नेहमी म्हणायचे कि "लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून " या गोष्टी आयुष्यात खूप मोठे बदल घडवून आणतात . घर अहून बांधायचे आहे पण लग्न मात्र करतो आहे . हा तर मंडळी माझा सांगायचा उद्देश असा होता कि enganement चा प्रवास हा खूप छान होता. असा काही नाही हे अनुभवणारा मी एकमेव व्यक्ती आहे. पण माझ्या साठी हा एक वेगळा अनुभव होता. लग्न आपल्या कडे एक कुटुंब संस्था म्हणून प्रचलित आहे. म्हणजे नुसते सोबत राहून (लीवइन ) खरच ती भावना, ते प्रेम किंवा जे बंधन आहे ते निर्माण होते का ? विषयांतर करत नाही पण जे लोक लग्नाची इंनिंग सुरु करता तेच खूप मोठी खेळी खेळतात. मला तर खूप छान vaatte आहे कि आपल्या सोबत अजून एक व्यक्ती आहे हक्काची जी नेहमी मला एक प्रेरणा स्थान असेल. माझ्या मध्ये बरेच चांगले बदल झाले आहेत. लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. आयुष्य एक नवे वळण घेते. अजून तर माझे लग्न बाकी आहे तरी पण आयुष्याची नवी खेळी सुरु करताना मनावर एक प्रकारचे दडपण आले होते, तरी पण तिने (वाग्दत्त वधू) मला त्या tension मधून लीलया बाहेर काढले मला समजून घेतले. कबुल आहे कि आई वडील आपले बहिण भाऊ सगळ्या सोबत राहत असताना आपण त्या म्हणजे जोडीदाराच्या प्रेमात इतके लवकर कसे काय पडतो. जे कारण मला जाणवले ते म्हणजे communication gap . किवा आदर म्हणावा त्या मुळे जेवढे मोकळे आपण जोडीदारासोबत बोलतो तेवडे पालकांच्या close नसतो. पण असो माझ्या साठी तर लग्न हि गोष्ट खूप छान बदल घेऊन आली आहे. माझी career growth पण छान झाली. कॉलेज मध्ये असताना जो माझ्या तला कवी व लेखक (म्हणू शकता ) जो कामाच्या रगाड्यात मेला होता, तो तिच्या मुळे जागा झाला व मी माझा पहिला वाहिला पोस्ट लिहिला आणि खरच खूप छान प्रतिसाद पण मिळाले. वाटले नव्हते कि इतके लोक वाचतील पण खरच मी.पा. चा खूप आभारी आहे. मला रोज निशी लिहिण्याची सवय पण तिने लावली. तुमी म्हणत होता कि आता पासून बायकोचे ऐकता, पण जर चांगल्या सवयी जोपासत असतील तर काय हरकत आहे. आणि त्या रूपाने मी. पा. ला एक नवीन लेखक पण मिळाला (हि हि हि ). तर मंडळी आयुष्याची नवीन खेळी साठी मला तुमच्या सर्वाच्या आशीर्वादा ची आणि शुभेछ्या ची गरज आहे.

Book traversal links for लग्न पाहवे करून पार्ट -२

  • ‹ लग्न पाहावे करून.
  • Up
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
जीवनमान
रेखाटन
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन
विचार

प्रतिक्रिया द्या
21269 वाचन

💬 प्रतिसाद (84)

प्रतिक्रिया

लग्न पाहावे करून.२

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 16:24 नवीन
सर्व प्रतिसाद व सुचना लक्षात घेणून लिहिण्याचा दुसरा प्रयत्न करत आहे. (काही चुकल्यास क्षमा असावी. कारण आता लिहिण्याची खुमखुमी स्वस्थ बसू देणार नाही )
  • Log in or register to post comments

प्रामाणिक

इंटरनेटस्नेही
Wed, 11/30/2011 - 16:28 नवीन
चांगलं लिहिलं आहेत. प्रामाणिक आणि ओघवते लेखन. फक्त लेखनाचा एकंदरीत टोन हा थोडासा दैनंदिनी छाप वाटतो आहे तो सुधारल्यास अजुन चांगले वाटेल. शिवाय शुद्धलेखनाच्या किरकोळ चुका देखील टाळत्या येण्याजोग्या आहेत.
  • Log in or register to post comments

ऊस गोड लागला म्हणून मुळापासून

परिकथेतील राजकुमार
Wed, 11/30/2011 - 16:31 नवीन
ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये :)
  • Log in or register to post comments

रोख ठोक

गणपा
Wed, 11/30/2011 - 16:42 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

नमस्कार

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 16:46 नवीन
अहो पहिला धागा खूप दिवसा पूर्वी लिहिला होता पण तांत्रिक करणा मुळे तो प्रसिद्ध नाही झाला असो तुमाला जर लेखन प्रकार आवडला नसेल तर क्षमा असावी पण लिहिता लिहिता चांगले लिखाण जमेल (अर्थात तुमच्या मार्गदर्शनामुळे)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

विनंती

मेघवेडा
Wed, 11/30/2011 - 16:53 नवीन
ह्या वर्षाअखेर संपन्न होणार्‍या 'मिपारत्न' सोहळ्यात, श्री. परिकथेतील राजकुमार ह्यांना 'मार्गदर्शकरत्न' पुरस्काराने सन्मानीत करावे असा ठराव मी मांडत आहे. रत्नपारखी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

'Apple गोड लागलं म्हणून

सूड
Wed, 11/30/2011 - 17:10 नवीन
'Apple गोड लागलं म्हणून बियांसकट खाऊ नये' हे चपखल बसेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिकथेतील राजकुमार

ओ देव्रूख्कर!

आनंदी गोपाळ
Wed, 11/30/2011 - 23:43 नवीन
अ‍ॅप्पल्च्या बियांत अर्सेनिक अस्तं बर्का!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूड

अर्र.................. फार

पियुशा
Wed, 11/30/2011 - 16:35 नवीन
अर्र.................. फार घाई केलीत धागा टाकण्याची ! महिनाभर तर जाउ द्यायचा होतात की ;) असो.... . आमचे आशीर्वाद आहेतच हो ;)
  • Log in or register to post comments

आमचे आशीर्वाद आहेतच हो पियू

किचेन
Wed, 11/30/2011 - 16:56 नवीन
आमचे आशीर्वाद आहेतच हो पियू तुझ वय सांग त्यांना.नाहीतर मी जशी वप्याला काका बोलले होते तसा हा तुला काकू बोलेल! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

आपल्या घरी फार मस्त सहाणा

वपाडाव
Wed, 11/30/2011 - 18:16 नवीन
आपल्या घरी फार मस्त सहाणा आहेत का? नै म्हटलं, कोयी-बियी उगाळता का ????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

पियू तुझ वय सांग

पियुशा
गुरुवार, 12/01/2011 - 09:35 नवीन
पियू तुझ वय सांग त्यांना.नाहीतर मी जशी वप्याला काका बोलले होते तसा हा तुला काकू बोलेल! चालेल मला ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

आशीर्वाद

स्मिता.
Wed, 11/30/2011 - 16:57 नवीन
कालपर्यंत आमच्याकडे चॉकलेट्सचा हट्ट करणारी पियु कोणाला आशीर्वाद देण्याएवढी मोठी झालेली बघून ड्वॉले पाणावले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

हम्म्म!!

किसन शिंदे
Wed, 11/30/2011 - 16:36 नवीन
नरेशकुमार - पार्ट २
  • Log in or register to post comments

किसनराव अगदी माझ्या मनातलं

हंस
Wed, 11/30/2011 - 18:13 नवीन
किसनराव अगदी माझ्या मनातलं बोललात! ^_^
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

+१

विशाखा राऊत
Wed, 11/30/2011 - 22:32 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किसन शिंदे

'लग्न पाहावे करून , घर पाहावे

किचेन
Wed, 11/30/2011 - 16:42 नवीन
'लग्न पाहावे करून , घर पाहावे बांधून'...अगदी बरोबर! थोडस अवघड आहेच. साखरपुडा ते लग्न हा प्रवास सर्वांसाठी सुखाचाच असतो.हक्काचा,समजूतदार जोडीदार मिळाला याचा आनंद गगनात मावत नाही.रोज रात्री फोने वर तासान तसं घालवायचे, साप्तःशेव्ती खडकवासला,मुळशी...गेला बाजार एखादी बाग शोधून मस्त गप्पा मारत बसायच्या.मग एकमेकांबद्दल,एकमेकांच्या आवडी निवडी कळायला लागतात.लग्नाआधी अरे किती वेगळी आणि युनिक आहे हि अस वाटत.पण..... लग्नानंतर नवेपण संपल कि तेच रोजच स्वयंपाक,डबा, ऑफिस, बस... दमून भागून घरी आल्यावर एकत्र चा प्यायलाही वेळ नाही.गप्पांच सोडाच. विक एन्डला मस्त ताणून द्यायची किवा अठ्वादाभाराची काम अटपायची,मग कुठे उरतोय बाहेर जायला वेळ.आपली हि किवा आपला हा काहीही वेगळा नाही ,इतरांसारखाच आहे.काहीही युनिक नाहीये त्यात. तुम्ही अस होऊन देऊ नका.संभाषण खूप म्हन्त्वाच! हळुवार गप्पा चालू द्या.चर्चा असेल तर तिला स्वतःच मत मांडण्याची मुभा द्या.तीच पूर्ण बोलून झाल्यावर तुम्ही बोला.फार लांब जायला जमत नसेल तर जेवणानंतर एक फेरी तरी होऊ द्यात. एवढ अवघड नसत हो! एकमेकांना समजून घेण महत्वाच.फ़्रिक़्वेन्सि जुळली कि झाल! :)
  • Log in or register to post comments

तिला स्वतःच मत मांडण्याची

रेवती
Wed, 11/30/2011 - 21:21 नवीन
तिला स्वतःच मत मांडण्याची मुभा द्या. अहो तै, माझ्याही नवर्‍यानं मला माझं मत मांडायची मुभा दिली (म्हणजे मी घेतली). आता फक्त माझच मत असतं. बघा बुवा! खोतसाहेबांना नंतर त्यांचं काही मत होतं हेच आठवणार नाही.;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

धमाल गो बाय !! पण रेवती अस जर

स्पंदना
गुरुवार, 12/01/2011 - 06:07 नवीन
धमाल गो बाय !! पण रेवती अस जर का सगळ उघड केल तर मग हे बकरे खाटका कड यायचे कसे? स्वतःच पोट भरल म्हणुन दुसर्‍यां आपल्या जातीच्या पाशवी शक्तींना उपाशी ठेवुन चालेल का? खर तर +++१ लिवायला पायजे , लिवल घे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रेवती

आवरा.....

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 16:43 नवीन
खोतानु..... आवरा
  • Log in or register to post comments

नमस्कार

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 16:48 नवीन
झाले हो आता अजून लिहून त्रास देणार नाही तुमाला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

नाराज होउ नका राव !

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 16:55 नवीन
नवा नवरा तुम्ही !! साहजिक आहे भावना उचंबळून येणे ...लिहित चला.. फक्त सलग दोन लेख सारखेच आले ..दैनंदिनी सारखा वाटला म्हणून लिहिला .. छान कविता लिहा .. किंवा लव्ह लेटर लिहा ..खुप काळ झाला हो लव्ह लेटर वाचुन ..होउन जौ द्या एक फर्मास !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

प्रतिसाद न भेटलेली माझी कविता "प्रेयसी"

विवेकखोत
Wed, 11/30/2011 - 17:04 नवीन
http://www.misalpav.com/node/19939
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

आता प्रतिसाद आहेत भरपुर.. चला

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 20:14 नवीन
आता प्रतिसाद आहेत भरपुर.. चला त्वरीत दुसरी कविता टंका बघु!! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकखोत

साहेब हा तुमचा ब्लॉग

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 16:46 नवीन
साहेब हा तुमचा ब्लॉग नाही...नविन धाग्यात नविन असे काहीच नाही असे मला वाटते. आता तुमचा हा दुसरा धागा म्हणुन सांगतो.. शुद्धलेखनाच्या चुका वेळीच सुधारा. पुर्वद्रुश्य पाहुन मग प्रकाशित करा. (मिपाकर सगळ्यांचेच स्वागत करतात..पण वेळीच चुका सुधारल्या नाहीत तर फाट्यावरपण मारतात.)
  • Log in or register to post comments

मला याचा अनुभव आहे.आधी

किचेन
Wed, 11/30/2011 - 16:49 नवीन
मला याचा अनुभव आहे.आधी सगळ्यांनी स्वागत केल होत ,आता मिपा सोडून जा अस म्हणतायत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

कोण म्हणता असा ?

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 16:58 नवीन
,आता मिपा सोडून जा स्पष्ट सांगाच.. का उगा मि पा करांना बद्नाम करत अहात ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

+१०० टु कपिलमुनी, सांगाच

५० फक्त
Wed, 11/30/2011 - 17:32 नवीन
+१०० टु कपिलमुनी, सांगाच किचेन्तै खरं कोण म्हणालं तुम्हाला असं, उगा मिपाकरांना बदनाम करु नका , किमान संमंकडे तक्रार तरी करा याची.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

+१०००

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 17:36 नवीन
हो कळायलाच हवे बरे!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

अहो कोणी नाही...अशीच

किचेन
Wed, 11/30/2011 - 18:11 नवीन
अहो कोणी नाही...अशीच गंम्मत! विवेक रावांना घाबरवायला!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

<<विवेक रावांना

मोहनराव
Wed, 11/30/2011 - 18:19 नवीन
<<विवेक रावांना घाबरवायला!>> ते सध्या कश्शा कश्शाला म्हणुन घाबरणार नाहीत हो.. प्रेमात आहेत ते!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

अहो

मी-सौरभ
Wed, 11/30/2011 - 23:48 नवीन
>>ते सध्या कश्शा कश्शाला म्हणुन घाबरणार नाहीत हो.. प्रेमात आहेत ते!! थोडं दमा मग बगा बायकूला कसं घाबरत्यात ते... ५० फक्त: तुमचं काय म्हनन??????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

'थोडं दमा मग बगा बायकूला कसं

५० फक्त
गुरुवार, 12/01/2011 - 00:07 नवीन
'थोडं दमा मग बगा बायकूला कसं घाबरत्यात ते..' - आधी या दुअर्थी स्टेटमेंटचा अर्थ समजवा, एक दोन स्वल्पविराम टाकले ना तर प्रतिसाद गायब करायची ताकद आहे ह्यात. असो, आमचं म्हंणणं काय आहे याचा मसुदा करुन बायकोकडं दिला आहे आमच्या, तिच्याकडुन मंजुर होउन आला की लगेच इथं टंकतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

_/\_

मी-सौरभ
गुरुवार, 12/01/2011 - 00:14 नवीन
अजून एक नमुना घ्या गवि 'वाईट मणांवर कोवले संस्कार' चा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

आमुचा निरोप घ्या.....

वपाडाव
Wed, 11/30/2011 - 18:19 नवीन
चाल्ल्याच आहेत त्या... तर जौ द्या त्यांना.... का आग्रेव कर्ताव.... (सुंठविना खोकला का काय ते....)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मोहनराव

तुझ्या लग्नातले आहेर

किचेन
Wed, 11/30/2011 - 18:37 नवीन
तुझ्या लग्नातले आहेर घेतल्याशिवाय जाणार नाही मी इथून! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

हे बघा

मी-सौरभ
Wed, 11/30/2011 - 23:50 नवीन
आधी जाते म्हणयचं :) मग परत रहायचं :( .... ही सासू (म्हंजे बायकोची आई) अशीच वागायची वप्या.. शिरेसली नको घेऊ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किचेन

याला म्हणतात ...........इकडे

गौरी१२
Wed, 11/30/2011 - 16:54 नवीन
याला म्हणतात ...........इकडे आड तिकडे विहीर .....जायें तो जाए कहा??? ;)
  • Log in or register to post comments

बिंदास ल्ह्या हो खोत

विजुभाऊ
Wed, 11/30/2011 - 17:03 नवीन
बिंदास ल्ह्या हो खोत भु. हित्ले लोक तुमची खिट्टी काढायचा चान्सच बगतील. तुमी त्याना अज्याबात इकेट द्यू नका. हितली मंडळी तशी थोडी थट्टेखोर आहेत. अज्याबात घाब्रु नका.
  • Log in or register to post comments

अपेक्षाभंग

सर्वसाक्षी
Wed, 11/30/2011 - 17:08 नवीन
पार्ट २ हे शिर्षक वाचुन दुसर्‍या आवृत्ती विषयी काही वाचायला मिळेल अशीअपेक्षा होती... असो. ता. क, - 'खेळी' या शब्दाचा आपल्यावर विलक्षण प्रभाव दिसतो. आपण कुठले खेळ खेळता?
  • Log in or register to post comments

आम्बट

आनंदी गोपाळ
गुरुवार, 12/01/2011 - 00:09 नवीन
याला आम्बट्शौक असे म्हंतात हो! ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

जरा जास्तच झाल म्हणुन हे

५० फक्त
Wed, 11/30/2011 - 17:43 नवीन
जरा जास्तच झाल म्हणुन हे प्वाईंटवाईज लग्न आपल्याला एक जोडीदार देतो , प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी आपल्या पाठीशी उभा राहनारा एक व्यक्ती देतो, सांभाळून घेणार आपला माणूस देतो. - पालक किंवा भाउ बहीण हे करत नाही असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? आयुष्य एक नवे वळण घेते. अजून तर माझे लग्न बाकी आहे तरी पण आयुष्याची नवी खेळी सुरु करताना मनावर एक प्रकारचे दडपण आले होते, तरी पण तिने (वाग्दत्त वधू) मला त्या tension मधून लीलया बाहेर काढले मला समजून घेतले. - अशा गोष्टी करायचा काही पुर्वानुभव आहे का काय त्यांना ? कबुल आहे कि आई वडील आपले बहिण भाऊ सगळ्या सोबत राहत असताना आपण त्या म्हणजे जोडीदाराच्या प्रेमात इतके लवकर कसे काय पडतो. जे कारण मला जाणवले ते म्हणजे communication gap - नाही कम्युनिकेशन गॅप नाही, शरीर संबंधांचं आकर्षण, महत्वाचं. हे तुम्हाला तुमच्या इतर स्त्रियांबद्दलही असु शकते पण ते तुम्ही मांडु शकत नाही मोकळेपणानं. . किवा आदर म्हणावा त्या मुळे जेवढे मोकळे आपण जोडीदारासोबत बोलतो तेवडे पालकांच्या close नसतो. - याला कम्युनिकेशन गॅप पेक्षा आय अ‍ॅम बेटर मॅन ' हा इगो असतो, विशेषतः वडिलांबरोबर, भावांबरोबर बोलता वागताना.
  • Log in or register to post comments

का हो एवढें पिटाळुन सोडताय

वपाडाव
Wed, 11/30/2011 - 18:23 नवीन
का हो एवढें पिटाळुन सोडताय त्येला.... चालायचंच..... अवांतर :: खोतांच्या जीवनात कधी कोकणात कणकवली पर्यंतचा प्रवास झालेला दिसत नाही.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

खोत म्हणला कि

कपिलमुनी
Wed, 11/30/2011 - 19:06 नवीन
तुंबाडचे खोत आठवतात
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

आमचं व्हेरिएशन....

धमाल मुलगा
Wed, 11/30/2011 - 20:41 नवीन
आमचं कोल्लापूरावर जास्त प्रेम. त्यामुळं खोत म्हणलं की 'पिऊन हाल्ट झालेला, एकदम फुल टॉस्स' राऊ खोत आठवतो आम्हाला. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

ए ! धमु ? तु

स्पंदना
गुरुवार, 12/01/2011 - 06:17 नवीन
ए ! धमु ? तु बारामतीचा...र्‍हातो पुन्यात्...आन आमच्या कोल्लापुरावर का गा तुझ प्र्येम??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

प्र्येमच त्ये...

धमाल मुलगा
गुरुवार, 12/01/2011 - 11:19 नवीन
काय कारन सांगून होतंय होय? कारनं लाऊन केलं तर त्ये प्र्येम नस्तंय सोड. कारनं सांगिटलो तर त्ये प्र्येम र्‍हात न्हाई खरं! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पंदना

"सांगिटलो" आणि शेवटचं "खरं"

गवि
गुरुवार, 12/01/2011 - 11:27 नवीन
"सांगिटलो" आणि शेवटचं "खरं" यामुळे शंभर टक्के कोपूप्रेमाची खात्री पटली.. (शिवाजी युनिव्हर्सिटी पासाऊट)- गवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हे

रामदास
गुरुवार, 12/01/2011 - 07:58 नवीन
तुंबलेले खोत आहेत. .हळूहळू मोकळे होतायत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कपिलमुनी

अ गा गा गा..

कपिलमुनी
गुरुवार, 12/01/2011 - 09:30 नवीन
कोपरापसुन नमस्कार ... बाकी विवेक खोतांच्या रुपात मि पा ला एक तुफान विनोदी लेखक लाभला आहे ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: रामदास
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा