✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भटका कुत्रा

स
स्वाती फडणीस यांनी
गुरुवार, 07/17/2008 - 01:43  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5028 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

छान

सुचेल तसं
गुरुवार, 07/17/2008 - 09:04 नवीन
कुत्रा मला देखील खुप आवडतो. त्याचं आपल्याकडे धावत येणं, प्रेमानं चाटणं, अंगावर उड्या मारणं....सगळच खुप मस्त वाटतं. भटक्या कुत्र्यांना खरोखरच धोका असतो. महानगरपालिकावाले त्यांना पकडून नेऊ शकतात (त्यामुळे गळ्यात पट्टा बांधणं कधी पण 'सेफ') किंवा कधी कधी फासेपारधी लोकांची (हे लोक मांजरांना पळवून नेतात. मी तर अस ऐकलय की ते मांजरांना खातात) तगडी कुत्री त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी करतात. असो, कुठलाही पाळीव प्राणी खुप जीव लावुन जातो. तुमचा अनुभव छान शब्दबद्ध केलाय तुम्ही. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments

भुभारडे दिवस

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/17/2008 - 09:04 नवीन
मला हि माझे भुभारडे दिवस आठवतात. स्वाती, मी ही तुमच्यासोबत भुतकाळात जाउन रडलो. त्या क्लिनरकाकांचा मृत्यु ही असाच यातनामय व्हावा असा दुष्ट विचार मनात येउन गेला. पण लगेच भानावर आलो. त्या मानान आमचा बिट्टु भाग्यवान . इथे पहा. या वर्षी सोडून गेला आम्हाला. कायम आठवण येते. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

इथे

स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 11:17 नवीन
तुम्ही दिलेली लिंक मला बघता येत नाही आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

आभार

स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 15:38 नवीन
मोत्याला भेटून जाणार्‍या आणि प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे :)
  • Log in or register to post comments

छान लिहीलेय.

प्रमोद देव
गुरुवार, 07/17/2008 - 16:33 नवीन
स्वाती आपण कुत्र्यासंबंधीची आठवण खूपच छान लिहिलेय. त्यामुळे माझ्याही काही आठवणी चाळवल्या. मीही माझ्या बालपणातल्या कुत्र्यांसंबंधीच्या आठवणी कधी तरी जरूर लिहीन. मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
  • Log in or register to post comments

वात्सल्य

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 07/17/2008 - 17:03 नवीन
मी १९८७-८८ मध्ये सांताक्रुझला जायचो. आमच्या बिनतारी विभागाच्या कंपाउंड मध्ये एक भुभी व्याली होती. मी गेट मधुन आत आलो कि ती दुगाण्या झाडल्यासारखे करुन पित असलेली पिल्ले मागच्या पायांनी झटकून माझ्या स्वागताला शेपटी हलवत ,पळत पळत यायची. मग मी तिची पोरे गोळा करुन तिला परत झोपवुन त्यांना लुचायला द्यायचो. त्यावेळी तिच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव असायचे. तिच्याशी मी लपंडाव खेळायचो. मी एक टाळी व एक पाय आपटून इशारा केल्यावर ती लांब पळे. त्यानंतर मी अरुंद पॆसेज मध्ये दार व दगडी भिंत या गॆपमध्ये दाराकडे चिकटुन तोंड व पॆसेजकडे पाठ करुन पुतळ्यासारखा स्तब्ध होउन लपत असे.माझे शरीर जणु भिंतीचाच भाग बनत असे. मग ती भुभी मला शोधायला येत असे. व्हरांड्यातून अनेक चक्कर ती टाकी. वास तर येतोय पण सापडत तर नाही. मग ती शोधुन गारगार नाक माझ्या टाचेला लावी मग गुदगुल्या होउन मी हलत असे व मग ती मला पकडे. आजही भुभुंचे गार गार नाक कानाला लावले कि माझ्या अंगावर रोमांच उभे राहतात. प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

अरेरे

सहज
गुरुवार, 07/17/2008 - 17:15 नवीन
खूपच वाईट वाटले जरी मला भटकी कुत्री नकोशी वाटत असली तरी. :-(
  • Log in or register to post comments

सहमत!

अजिंक्य
गुरुवार, 07/17/2008 - 17:28 नवीन
'सहज' शी सहमत आहे. जरी मला(ही) भटकी कुत्री आवडत नसली, तरीही असा एखादा अनुभव मनाला चटका लावून जातो. -अजिंक्य www.ajinkyagole1986.blogspot.com.
  • Log in or register to post comments

भटका

स्वाती फडणीस
गुरुवार, 07/17/2008 - 19:25 नवीन
या गोष्टीत त्याला भटका ठरवण्यात आल आहे. खर तर त्याला अख्या कॉलनीने पाळले होते..
  • Log in or register to post comments

आवडली स्टोरी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 07/17/2008 - 20:56 नवीन
मुक्या प्राण्यांवरचे प्रेम माणसाला वेडे करते याचा अनुभव मी घेतलाय. आम्ही पाळलेले एक कुत्रे आजारी पडून मरण पावले होते. जिथे तिथे मी कुत्र्याबद्दलच बोलायचो, पण ऐकणा-याला आपल्या भावना पोहचत नाही, हा माझा अनुभव. असो,कुत्र्याचं आम्हाला भयंकर वेड आहे. आमचं हे वेड पाहुन मिपाचे सन्माननीय सदस्य श्री घाटपांडे साहेबांनी आम्हाला एक पुस्तक भेट दिले 'संरक्षक सोबती' आम्ही त्याचा आधार घेऊन आमच्या भू-भू ची काळजी घेतो. Image removed.(माझा 'सॅन्डी')
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा