भंगार, डबडा, पंचर आणि अजुन ही काही !!
पुर्व-प्रकाशित
वपुंच एक वाक्य आहे, की माणूस प्रेमात पडला रे पडला की सर्वात प्रथम काय करतो ते म्हणजे कविता आणी त्यांनी अशीच एका नवकवीची (आनंद बक्षी ..आपल हे..नक्षी...आपल हे..पक्षी : नव प्रेमीची ) कविता ऐकविली.
' देइन मी तुला इडली '
' तु दे मला डोसा '
' पाहिन कोणी आपल्याकडे '
' तर देइन त्याला ठोसा '
अर्थात हे कितपत सत्य आहे ते मला माहीत नाही आणि करुन घ्यायचे पण नाही ! एक तर नुसते कविता म्हटले तरी आजकाल मला अत्यानंद होतो, नाही म्हणजे वाचायला वगैरै म्हणुन ठीक आहे पण अर्थ सांगा म्हटले की त्या पेक्षा गणित,मॅकॅनिकल,कायदा,धर्म , अॅस्ट्रॉनॉमी, उत्खनन आणि मोबाइल टेक,हे सगळे अवघड विषय सोप्पे वाटायला लागतो. पण माझी काव्य-लेखन खुमखुमी (याचा सोयीस्कर अर्थ ' किडे ' असा पण होतो .) मला गप्प बसु देत नाही आणि मग आमच्या लेखणीतून र ला ट कविता प्रसवतात. आता हेच बघा ना
'माझिया प्रियाला प्रित कळेना`
`चुलीमध्ये लाकडं बी जळेना `
`आणि मुडदा बशिवला या कढईचा`
`त्याल ताप-तापवल तरी एक जिलेबी तळेना`
बघा मित्रांनो , किती गहन अर्थ लपविला होता आम्ही या चारोळीत , एक तर प्रियाला प्रित कळत नाही, म्हणुन तिचे जिलेबीने तोंड गोड करण्याच्या नादात प्रियकर कढईत चुलीवर तेल तापवितो आहे, गॅस परवडत नाही, कढई काळपटलेली आहे आणि तेल महागलेले, भेसळलेले ! आता या सामजिक समस्या प्रियेला कश्या कळणार ? विशेष म्हणजे ग्रामीण आणि शहरी भाषेचं आम्ही किती बेमालुमपणे (कसलं डोंबलाचे बेमालुम काय माहीत ! ) मिश्रण केले आहे या कवितेत ! पण आम्ही जेव्हा ही कविता आमच्या कॉलेज-प्रियेला एकविली, तेव्हा तिने आमच्या सहा फुटी शरीराच्या यथायोग्य भागावर तिच्या सॅन्डल चा शिक्का उमटवला आणि वर " भंगार !! " असा एक शब्द उच्चारला आणि चालती झाली.(सध्या आमची हिच कविता थोडासा बदल करुन कुठल्या तरी वाहिनी वर धारावाहिकेच्या आगमन गीताच्या निमीत्ताने अजुन जिवंत आहे असे ऐकिवात आहे. ) पण आम्ही निराश नाही झालो. आम्ही आमच्या जवळपासच्या मित्रांना 'कवी कसे व्हावे ?' असा सल्ला विचारला. ऋणानुबंधाच्या भितीने सल्ले मिळाले. कोणी म्हणे वृत्त बदल तर कोणी म्हणे गण बदल ! एका मित्राने मात्रा बदलायला हवी असे म्हटल्यावर आम्ही त्या दिवशी संध्याकाळी मात्रा बदलण्याकरिता इंग्रजाळलेल्या दुकानात जाण्याऐवजी ' देशप्रेमी ' झालो (आमची बारवाल्या "अण्णा" कडे उधारी बाकी आहे हे धादांत खोटे आहे.) पण काही फरक पडला नाही, सरते शेवटी एका मित्राने मैत्रीण बदल असा सल्ला दिल्यावर आम्ही तत्परतेने तो मानला.
ही गेली आणि ती आली ! आम्ही काही रम्य क्षण काढले आणि पुन्हा र ला ट जोडले आणि तिला खाली दिलेला काव्याविष्कार वाचुन दाखविला.( येथे आम्ही आमची पाठ थोपटून घेतो.)
आठव, तु ,मी आणि ते झाड !
तु माझ्या फासळ्या मोजत होतीस !
आणि मी त्या झाडाच्या फांद्या !
फांद्या भरल्या सात !
दे हातात हात !
करु उत-मात, रानात पिकला भात !
भात-डाळ-लोणचे , एक मामा अठरा भाचे !
त्यातल्या एकाचे नाव मोनु !
आणि तुच माझी सोनु !
.
.
.
.
ती दोन दिवस बेशुध्द होती.ती कॉलेजमधुन नाव काढुन घेणार असल्याचे समजल्याने प्रिन्सिपलने मला बोलावुन घेतले. माझी कविता मला वाचावयास लावली. वाचुन झाल्यावर आधी ते माझ्या पाया पडले व नंतर मला दोन थोबाडीत ठेवून दिल्या. माझ्या डाव्या बाजुला माझ्या मराठीच्या सरांच्या तोंडाला फेस आलेला मला स्पष्ट दिसत होता.मला कॉलेजमधुन सस्पेन्ड करण्याची धमकी दिली.पण माझी खुम-खुमी काही कमी झाली नाही. ध्येयाने पेटलेल्या अवस्थेत मी माझी काव्य प्रतिभा भुमिगत रुपाने सदोदित चालु ठेवली. माझ्या वहीत अश्या कित्येक कविता मी कोरुन ठेवल्या होत्या. पण कालपरवा च माझी वही चोरीला गेली. माझ्या घरा-शेजारच्या इस्पितळात रुग्णांची संख्या का वाढली ते मला समजले नाही.असो ..पण त्या नंतर कॉलेजात मात्र माझा जाम वट वाढला. पोर-टोरं एकमेकांना " जास्त बोललास तर सुहाश्याच्या कविता ऐकवेन !! " असा दम देउ लागले. मी ही महिन्याभरातुन एकदाच दाढी करु लागलो, जोडीला बापाची शबनम रुपी झोळी होतीच. हे सर्व पाहुन बापाने मला मनो-विश्लेषकाकडे नेले. त्यानी काही गोळ्या मला दिल्या मि त्या गटारात फेकून दिल्या त्यामुळे आमचं आधी ड्रेनेज तुंबले आणी नंतर मला बापाने तुंबवुन काढला ...पुन्हा असो..!
हे सर्व पाहून माझ्या एक मित्राने मला एक सुप्रसिध्द कवीकडे नेले, ते मला मार्गदर्शन करतील असे मला सांगितले. मी त्यांच्या पुढ्यात बसलो होतो, माझी व्यथा एकुन घेतल्यावर त्यांनी मला माझी एखादी कविता वाचावयास सांगीतले..' माझ्या ठेचाळलेल्या डाव्या पायाच्या अंगठ्याकडे ...मी सुरु केले, त्यांनी मध्येच मला थांबविले..मला विचारले कुठला छंद आहे. मी म्हंटलं " हाच कविता करण्याचा ! शिवाय हिंडणे, फिरणे " त्यांनी आम्हाला घराबाहेर काढले. पुन्हा एकदा असोच !! आता ही कविता आम्ही आपल्याला ऐकवितो...
माझ्या ठेचाळलेल्या डाव्या पायाच्या
अंगठ्याकडे मीच निरखुन पहात होतो.
दगड म्हणाला मला
रस्त्यात कडमडायला मीच भेटलो का रे ?
नैऋत्येचे वारे, ईशान्याचा मॉल
किरकेटचा बॉल, द्रिविडी वॉल
वॉलला लागला धक्का
माझा मदिना मक्का
झाला इरादा पक्का
तुच माझी मोना
बघा किती छान अर्थ दडविला होता या कवितेत, मक्का मदिने पासुन ते द्रविड वॉल पर्यंत आम्ही आमच्या मोनाला नेले होते, तरी मला सांगा.. या कवितेतील पहिले दोन शब्द एकुन हाकलुन देण्यासारखे काय आहे ? पण " भिक नको पण कविता आवर " या चालीवर आम्हाला जिथुन-तिथुन हाकलुन देण्यात आले. पण आम्ही निराश झालो नाही, मिपा वर आपल्यासारखे आमचे मायबाप जाणकार आहेतच .." उमेश कणकवलीकरांच्या चालीवर मी देखील " मी कवि होणारच " असे करत आम्ही आमचे काव्य प्रसव चालुच ठेवले आहे. आज कित्येक लोक आमच्या पाठीशी उभे आहेत (आणि पाठीवर गुद्दे घालत आहेत.) आज आम्ही कवि झालो आहोत (फक्त त्या कवी या उपाधीच्या आधी भंगार, डबडा आणी पंचर अश्या काही संज्ञा जोडल्या गेल्या आहेत.) त्याची आम्ही तमा बाळगण्याचा प्रश्न च येत नाही..आता हेच बोलता-बोलता एक कविता सुचली...
तुझी स्कूटीवरची छबी पाहुन ,
माझे थोबाड झाले पंचर ,
तु स्कूटीवर दिसे अशी,
जसे सायकलवरी डंपर ..
अरे !!..कुठे चाललात ??? ..अहो....एका तर खर ! ..अहो प्लीज !!....पुढे एका तर खर !!!.........अहो प्लीज.!!!............
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हे लिखाण इथे पूर्वप्रकाशित
ओ विजू भौ, वरील तुमचे वाक्य
??
ऑ.... इथे बहुतेकानी हे लिखाण
ईजुभौ ईजुभौ.... वाश्याने मी
पुनर्वाचनाचा 'लुफ्त' घेतला.
लुत्फ रे
असेच म्हणते
धम्माल आहे!
अन समजा,
मग तुम्हाला स्पॉन्सर
भारी!! आधिचा धागा नव्हता
मस्त साराभाई v/s साराभाई
छान...
सोकाजी नक्कीच बघा मी
अगदी मनातल बोललीस...मला हि
यु त्युब्वारही सगळे भाग
साराभाई v/s साराभाई
मस्त रे
सहमत
सहिच ... अशा कविता लिहिता येण
धसका...
वा वा!!
मजेशीर
मजा आली पुन्हा एकदा.
डाव्या पायाच्या अंगठ्याची
अरेच्चा
हेच म्हणतो..
मस्तै ! येवूद्या आणखी अशा
अशा "उ हं" म्हणणार्या लोकांना कधी कळेल का की ....
हॅ हॅ हॅ
मला वाटलं नेहमीच्या जीवनदर्शन
लय भारी
मस्त मजा आली,आधि वाचला नव्हता
ओ सुहास राव एक काम करा ...
साष्टांग दंडवत.....!